Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 15:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 म्हणून त्यांनी मिळवलेली आणि साठविलेली संपत्ती ते वाळुंजाच्या खोऱ्यापलीकडे घेऊन जातात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 ह्यास्तव त्यांनी वाचवलेले व साठवलेले धन ते वाळुंजाच्या ओहळापलीकडे नेत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 यास्तव त्यांनी वाढवलेली विपुलता आणि साठवलेले आहे ते, वाळुंजाच्या ओढ्यापलीकडे घेऊन जात आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 15:7
9 Iomraidhean Croise  

जसा कोणी घरट्यात पोहोचतो, तसेच राष्ट्रांच्या संपत्तीसाठी माझा हात पोहोचला. जसे लोक सोडून दिलेली अंडी गोळा करतात, तसे मी सर्व देशांना एकत्र केले; कोणीही पंख फडफडविला नाही, किंवा किलबिल करण्यासाठी तोंड उघडले नाही.’ ”


मी त्याला अधार्मिक राष्ट्राविरुद्ध पाठवितो, मला जे संताप आणतात, अशा लोकांविरुद्ध पाठवितो, त्यांची लूटमार करण्यासाठी आणि लूट हिसकावून घेण्यासाठी, आणि त्यांना रस्त्यांवरील चिखलाप्रमाणे तुडविण्यासाठी.


त्यांच्या आक्रोशाचे प्रतिध्वनी मोआबच्या सीमेपर्यंत येतात. त्यांचे आक्रंदन एग्लाइमपर्यंत पोहोचते, त्यांचा विलाप बीर एलिमपर्यंत पोहोचतो.


नेगेवच्या प्राण्यांबद्दलची भविष्यवाणी: कठीण परिश्रम आणि संकटाच्या भूमीतून, सिंह आणि सिंहीण, फुरसे आणि उडणारे साप, दूत आपली संपत्ती गाढवांच्या पाठीवर, त्यांचे खजिने उंटांच्या कुबड्यांवर लादून, त्या लाभहीन राष्ट्राकडे घेऊन जातात,


त्यांची गर्जना एखाद्या सिंहासारखी आहे, तरुण सिंहाप्रमाणे ते गर्जना करतात; ते गुरगुरतात व त्यांचे सावज पकडतात, आणि ते घेऊन जातात तेव्हा कोणीही सोडविण्यास येत नाही.


“माझे अंतःकरण मोआबसाठी जणू बासरीवर शोकगीत गात आहे; कीर-हरेसेथसाठी विलापाने बासरीगत गीत गात आहे. त्यांनी साठविलेली विपुल संपत्ती नाहीशी झाली आहे.


पहिल्या दिवशी तुम्ही दाट पाने असलेल्या झाडांच्या फांद्या—खजुरीच्या झावळ्या, वाळुंजे, आणि भरपूर पाने असलेली इतर झाडांच्या फांद्या—घेऊन याहवेह तुमच्या परमेश्वरापुढे सात दिवस आनंदोत्सव करावा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan