Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 14:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 अनेक राष्ट्रे त्यांना सहकार्य करतील व त्यांना त्यांच्या जागी आणतील. आणि इस्राएल राष्ट्रांवर ताबा मिळवतील, व याहवेहच्या भूमीत त्यांच्या स्त्रिया व पुरुषांना आपले सेवक बनवतील, त्यांना बंदिवासात नेलेल्यांना ते बंदी करतील त्यांना पीडलेल्यांवर ते राज्य करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 विदेशी लोक त्यांना नेऊन स्वस्थानी पोचवतील; आणि इस्राएलाचे घराणे परमेश्वराच्या भूमीत त्यांना दासदासी करून ठेवील; ज्यांनी त्यांना बंदिवान करून नेले होते त्यांना ते बंदीत ठेवतील; असे ते आपणांस पिडणार्‍यांवर स्वामित्व करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 राष्ट्रे त्यांना आपल्या स्वतःच्या ठिकाणावर आणतील. मग इस्राएलाचे घराणे त्यांना परमेश्वराच्या देशात दास व दासी करून ठेवतील. ज्यांनी त्यास बंदिवान करून नेले होते त्यास ते बंदीत ठेवतील आणि ते आपल्या पीडणाऱ्यावर राज्य करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 14:2
34 Iomraidhean Croise  

याशिवाय त्यांचे 7,337 दास व दासी व 200 गायक व गायिका होत्या.


जेव्हा तुम्ही उच्चस्थानी आरोहण करता, तुम्ही अनेक बंदिवान नेले; मनुष्यासाठी तुम्ही नजराणे स्वीकारता; अगदी एकेकाळच्या बंडखोरांपासून सुद्धा— जेणेकरून येथे याहवेह परमेश्वर आमच्यामध्ये वस्ती करतील.


त्याकाळी सर्वसमर्थ याहवेहसाठी सीयोनातून भेटी आणल्या जातील धिप्पाड आणि तुळतुळीत त्वचेच्या लोकांकडून, ज्यांचे भय आहे अशा दूरवरच्या लोकांकडून, विक्षिप्त भाषण करणाऱ्या आक्रमक राष्ट्राकडून, ज्यांची भूमी नद्यांमुळे विभागली गेली आहे. अशा लोकांकडून सर्वसमर्थ याहवेह यांच्यासाठी भेटी आणल्या जातील.


“अश्शूर मानवी तलवारीने पडणार नाही; एक तलवार, जी मर्त्य मानवांची नाही, ती त्यांना गिळून टाकेल. तलवार पाहून ते पळून जातील आणि त्यांच्या तरुणांना जबरदस्तीने मजुरीच्या कामाला ठेवले जाईल.


याहवेह असे म्हणतात: “इजिप्तचे उत्पादन आणि कूशचा सर्व व्यापारी माल व शबाईचे ते उंच लोक— ते तुमच्याकडे येतील ते सर्वकाही तुमचेच होईल. बेड्या घातलेल्या बंदिवानाप्रमाणे ते पाय ओढत तुमच्यामागे चालतील ते साखळदंडाने बांधलेले तुमच्याकडे येतील. तुम्हाला नमन करतील व विनंती करून म्हणतील, ‘निश्चितच परमेश्वर तुमच्याबरोबर आहे, दुसरे कोणी नाही; त्यांच्याशिवाय दुसरा देव नाही.’ ”


सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “पाहा, मी राष्ट्रांना इशारा करेन, मी माझा झेंडा लोकांपुढे उंचावेन; ते तुझ्या पुत्रांना खांद्यांवर उचलून आणतील व तुझ्या कन्यांना कडेवर घेऊन आणतील.


राजे तुला उपपित्यासमान होतील, व त्यांच्या राण्या तुला उपमातेसमान होतील. ती तुझ्यासमोर भुईपर्यंत लवून मुजरा करतील; आणि तुझी पायधूळ चाटतील. तेव्हा मीच याहवेह आहे, हे तुला समजेल. माझ्यावर आशा ठेवणारा, कधीच निराश होणार नाही.”


परंतु याहवेह हे असे म्हणतात: “होय, योद्ध्याच्या हातून बंदिवान सोडविले जातील, व अत्याचारीकडून लूट हिसकावून घेतली जाईल; तुमच्याशी झगडणाऱ्यांशी मी झगडेन, आणि मी तुमच्या मुलांना वाचवेन.


कारण तू उजवीकडे व डावीकडे पसरशील; तुझे वंशज इतर राष्ट्रांना हुसकावून लावतील आणि त्यांची उजाड झालेली नगरे पुन्हा वसवतील.


तुमच्यावर अत्याचार करणार्‍यांचे पुत्र येऊन तुला नमन करतील; जे सर्व तुझा तिरस्कार करीत, ते तुझ्या पायावर लोटांगण घालतील. ते तुला याहवेहचे शहर, आणि इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराचे सीयोन असे म्हणतील.


“आपली दृष्टी वर कर आणि सभोवती पाहा: सर्व सभा एकत्र येऊन तुझ्याकडे येत आहे; तुझे पुत्र दूरवरून येत आहेत, तुझ्या कन्या कमरेवर उचलून आणण्यात येत आहेत.


अपरिचित लोक तुमचे कळप राखतील; विदेशी तुमची शेते व द्राक्षमळ्यांची निगा राखतील.


कारण याहवेह असे म्हणतात: “मी तिच्या शांततेस नदीप्रमाणे वाढवेन, आणि राष्ट्रांची समृद्धी ओसंडून वाहणाऱ्या झऱ्यांसारखी करेन; तुमचे संगोपन होईल व तुम्ही तिच्या कडेवर बसून फिराल, आणि तिच्या मांडीवर जोजवले जाल.


“ ‘परंतु ज्यांनी तुला गिळंकृत केले, ते गिळंकृत केले जातील; तुझे सर्व शत्रू बंदिवासात जातील. ज्यांनी तुला लुटले, तेच लुटले जातील; ज्यांनी तुला लुबाडले, तेच लुबाडल्या जातील.


याहवेह जाहीर करतात, असे दिवस येत आहेत, जेव्हा मी अम्मोन्यांच्या राब्बाह नगराविरुद्ध रणगर्जना करेन, ते नासाडीचा ढिगारा होईल, आणि त्याच्या सभोवतीची सर्व गावे जाळून टाकली जातील. मग इस्राएली येईल आणि आपला देश तुमच्याकडून परत घेतील. मग ज्यांनी इस्राएलला हाकलून लावले, त्या सर्वांना ती हाकलून लावेल.” असे याहवेह म्हणतात.


रानातून लाकडे गोळा करण्याची किंवा जंगलातील झाडे तोडण्याची त्यांना गरज नसणार, कारण ते हत्यारांचा उपयोग इंधन म्हणून करतील आणि ज्यांनी त्यांची लूट घेतली त्यांना ते लुटतील आणि ज्यांनी त्यांना लुबाडले, त्यांना ते लुबाडतील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.


तरी परमोच्च परमेश्वराच्या पवित्र जणांना राज्य मिळेल आणि ते सदासर्वकाळ त्याच्या ताब्यात राहतील—होय, सदासर्वकाळ.’


मी तुमचे पुत्र व तुमच्या कन्या यहूदीयातील लोकांना विकून टाकेन आणि ते त्यांना दूरच्या शबाई लोकांस विकतील.” याहवेहने हे म्हटले आहे.


“ ‘तुमचे पुरुष आणि स्त्री गुलाम तुमच्या सभोवतालच्या राष्ट्रांमधून यावेत; तुम्ही त्यांच्याकडून गुलाम विकत घेऊ शकता.


पण सीयोन पर्वतावर तारण होईल; ते पवित्र होईल, आणि याकोबास त्याचे वतन मिळेल.


हे सर्व मानवजाती, याहवेहपुढे स्तब्ध राहा, कारण ते आपल्या पवित्र निवासस्थानातून जागृत झाले आहेत.”


मी निश्चितच त्यांच्याविरुद्ध माझा हात उगारेन, म्हणजे त्यांचेच गुलाम त्यांची लुटालूट करतील. मग तुम्हाला कळेल की सर्वसमर्थ याहवेहने मला पाठविले आहे.


परंतु जो सेवक आपल्या मनात म्हणेल, ‘माझा धनी येण्यास पुष्कळ विलंब होत आहे,’ आणि तो सोबतीच्या दासांना व दासींना मारहाण करू लागेल आणि पिणार्‍यांबरोबर खाऊ आणि पिऊ लागेल.


हे त्यांनी अतिशय आनंदाने केले. आपण ॠणी आहोत असे त्यांना वाटते. गैरयहूदीयांना यहूदीयांद्वारे आध्यात्मिक आशीर्वाद प्राप्त झाले आहेत, या अद्भुत आध्यात्मिक दानाची अंशतः फेड म्हणून हे भौतिक दान द्यावे, असे त्यांनी ठरविले.


आम्ही वाद व परमेश्वराच्या ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले सर्वकाही पाडून टाकतो आणि प्रत्येक विचाराला बंदिस्त करून ख्रिस्ताच्या आज्ञेखाली स्वाधीन करतो.


बंधू व भगिनींनो, तुम्हाला स्वतंत्र होण्यासाठी बोलाविले आहे. पण तुमचे स्वातंत्र्य देहवासना पूर्ण करण्यासाठी वापरू नका, तर प्रीतीने व नम्रपणाने एकमेकांची सेवा करा.


यामुळे असे म्हटले आहे: “जेव्हा त्यांनी उच्चस्थानी आरोहण केले, त्यांनी अनेक बंदिवान नेले आणि त्यांच्या लोकांना दाने दिली.”


जे सैतानाच्या सभास्थानातील असून स्वतःला यहूदी म्हणतात पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात. त्यांना मी तुमच्या स्वाधीन करेन. पाहा, ते तुमच्या पाया पडतील व मी तुमच्यावर प्रीती केली आहे हे ते स्वीकारतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan