Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 13:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 आक्रोश करा, कारण याहवेहचा दिवस जवळ आला आहे; तो दिवस सर्वसमर्थ यांच्याकडून नाशाप्रमाणे येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 आक्रोश करा, कारण परमेश्वराचा दिवस समीप आला आहे; सर्वसमर्थाकडून हा एक विनाशच येत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 आक्रोश करा, कारण परमेश्वराचा दिवस समीप आहे; सर्वसमर्थाकडून विनाशासहीत तो येत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 13:6
39 Iomraidhean Croise  

कारण परमेश्वरापासून आलेल्या विपत्तीने मला भयभीत केले आहे, आणि त्यांच्या वैभवाच्या भयनिमित्ताने या सर्वगोष्टी मी केल्या नाहीत.


तुमच्याविरुद्ध असलेला माझा राग लवकरच संपेल आणि माझा क्रोध त्यांच्या नाशाच्या मार्गाकडे वळेल.”


दंड मिळण्याच्या दिवशी तुम्ही काय कराल, जेव्हा फार दुरून संकट येईल? तुम्ही कोणाकडे मदतीसाठी धावणार आहात? तुम्ही तुमची संपत्ती कुठे सोडून देणार?


पाहा, याहवेहचा दिवस येत आहे —एक कठोर दिवस, क्रोधाचा आणि घोर संतापाचा— भूमी उजाड करण्यासाठी आणि तेथील पापी लोकांचा नाश करण्यासाठी.


“मी तिला घुबडांचे निवासस्थान आणि दलदलीचा प्रदेश करेन; मी तिला नाशाच्या झाडूने झाडून टाकेन,” असे सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात.


वेशींनो, आक्रोश करा! नगरांनो विलाप करा! पलिष्टी लोकांनो, भयाने वितळून जा! कारण उत्तरेकडून धुराचा लोट येत आहे, त्यांच्या पलटणींत कोणीही रेंगाळणारे नाहीत.


गर्विष्ठ आणि उद्धट लोकांना, जे सर्वकाही उच्च करण्यात आले आहे त्यांना नम्र करण्यासाठी, सर्वसमर्थ याहवेहने एक दिवस निर्धारित केला आहे—


सोरविरुद्ध भविष्यवाणी: तार्शीशच्या जहाजांनो, विलाप करा! कारण सोरचा नाश झाला आहे आणि तिथे घर किंवा बंदर असे काहीच राहिले नाही. कित्तीम देशाकडून हे वचन त्यांच्याकडे आले आहे.


याहवेह सर्व राष्ट्रांवर रागावले आहेत; त्यांचा क्रोध सर्व सैन्यांवर आला आहे. ते त्यांचा संपूर्णपणे नाश करतील, ते त्यांना वध करणाऱ्यांकडे सोपवून देतील.


कारण याहवेहकडे सूड घेण्याचा एक दिवस आहे, सीयोनला पाठिंबा देण्यासाठी शिक्षा देणारे वर्ष.


तुझ्यावर आपत्ती कोसळेल आणि ती हातचलाखी करून कशी उलटावी हे तुला कळणार नाही. तुझ्यावर संकट कोसळेल खंडणी भरूनही त्याचे निवारण करता येणार नाही; जी येईल असे वाटले नाही अशी एक घोर विपत्ती अकस्मात तुझ्यावर येईल.


याहवेह घोषणा करतात, “आणि आता माझ्याकडे काय राहिले आहे? माझ्या लोकांना विनामूल्य नेण्यात आले आहे, आणि जे त्यांच्यावर सत्ता गाजवितात ते त्यांचा उपहास करतात,” याहवेह घोषणा करतात, “संपूर्ण दिवसभर माझ्या नावाची सतत निंदा करण्यात येते.


याहवेहच्या कृपेचे वर्ष आणि परमेश्वराचा सूड घेण्याचा दिवस आला आहे, हे जाहीर करण्यास, आणि जे सर्व विलाप करतात त्यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांनी मला पाठविले आहे.


माझ्याकरिता तो सूड घेण्याचा दिवस होता; आणि ते उद्धार करण्याचे वर्ष आले होते.


त्यांच्या अंतःकरणातून उफाळणार्‍या आनंदाने माझे सेवक गाणी गातील, पण अंतःकरणातील क्लेशांनी तुम्ही विव्हळाल आणि भग्नहृदयी होऊन हृदयाच्या वेदनेने आकांत कराल.


अहो मेंढपाळांनो, दुःखाने रडा आणि विलाप करा; मानवजातीच्या कळपांच्या पुढार्‍यांनो, धुळीत लोळा. कारण तुमचा वध होण्याची वेळ आता आली आहे; मातीच्या उत्तम भांड्यासारखे तुम्ही सर्व कोसळून पडाल.


“हेशबोना, आकांत कर, कारण आय शहर नष्ट झाले आहे! राब्बाहच्या रहिवाशांनो, तुम्ही आक्रोश करा! गोणपाटाची वस्त्रे धारण करून विलाप करा; भिंतीच्या आत इकडे तिकडे धावाधाव करा, कारण त्याच्या सरदारांसह व पुजार्‍यांसह दैवत मोलेख बंदिवासात जाईल.


बाबिलोनचे अचानक पतन होईल व ती मोडली जाईल. तिच्यासाठी विलाप करा! तिच्या वेदना जाण्यासाठी औषध आणा; कदाचित ती बरी होऊ शकेल.


याहवेहच्या दिवशी युद्धात टिकून उभे राहावे म्हणून इस्राएलच्या लोकांसाठी भिंतींच्या खिंडारांना दुरुस्त करावयाला तुम्ही वरती गेला नाही.


हे मानवपुत्रा, मोठ्याने रड आणि विलाप कर, कारण हे माझ्या लोकांविरुद्ध आहे; ते इस्राएलच्या सर्व राजपुत्रांविरुद्ध आहे. माझ्या लोकांसहित त्यांनासुद्धा तलवारीस देण्यात आले आहे. म्हणून तू आपले ऊर बडव.


“या शब्दांचा अर्थ हा असा: “मने: परमेश्वराने आपल्या राजवटीचे दिवस मोजले आहेत आणि त्याचा अंत केला आहे.


यामुळे राजा बेलशस्सर अत्यंत भयभीत झाला आणि त्याचा चेहरा अधिक पांढराफटक झाला. त्याचे अधिकारीदेखील गोंधळून गेले.


अहो, शेतकर्‍यांनो, लज्जित व्हा, द्राक्षमळ्यांची मशागत करणार्‍यांनो, आकांत करा; गहू व जव याकरिता विलाप करा, कारण शेतातील पिके नष्ट झाली आहेत.


अहो याजकांनो, गोणपाट परिधान करा आणि शोक करा; वेदीची सेवा करणार्‍यांनो, विलाप करा. तुम्ही जी परमेश्वराची सेवा करता, या, गोणपाट परिधान करीत रात्र घालावा; कारण अन्नार्पणे व पेयार्पणे तुमच्या परमेश्वराच्या भवनात येणे बंद झाले आहेत.


त्या दिवसाबद्दल हाय! याहवेहचा दिवस जवळ आहे; सर्वसमर्थापासून जसा नाश तसे ते येतील.


अहो मद्यप्यांनो, जागे व्हा आणि रडा! हे सर्व द्राक्षारस पिणार्‍यांनो विलाप करा; नवीन द्राक्षारसाकरिता विलाप करा कारण तो तुमच्या ओठातून काढून घेतला आहे.


सीयोनात कर्णा वाजवा; माझ्या पवित्र पर्वतावर धोक्याची घंटा वाजवा. देशात राहणार्‍या प्रत्येकाचा भीतीने थरकाप होवो, कारण याहवेहचा दिवस येत आहे. तो अगदी हाताशी आहे—


याहवेह आपल्या सैन्यापुढे गर्जना करीत चालतात; त्यांचे सैन्य असंख्य आहेत, आणि त्यांची आज्ञा मानणारे बलवान सैन्य आहे. याहवेहचा दिवस महान आहे; अति भयंकर दिवस आहे. त्यास कोण सहन करू शकेल?


याहवेहचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल.


जे याहवेहच्या दिवसाची इच्छा बाळगतात त्यांच्या धिक्कार असो! तुम्ही याहवेहच्या दिवसाची इच्छा का बाळगता? कारण तो दिवस प्रकाशाचा नाही तर अंधाराचा असेल.


याहवेहचा तो भयावह दिवस जवळ— तो वेगाने अगदी जवळ येत आहे. याहवेहच्या दिवसाची गर्जना मर्मभेदक आहे; सामर्थ्यशाली योद्धे त्याची रणगर्जना करतील.


सार्वभौम याहवेहपुढे स्तब्ध राहा. कारण त्यांच्या न्यायाचा दिवस जवळ आला आहे; याहवेहने अर्पण सिद्ध केले आहे; ज्यांना त्यांनी आमंत्रित केले, त्यांचे पवित्रीकरण केले आहे.


याहवेहचा दिवस येत आहे, ज्या दिवशी तुमची संपत्ती लुटली जाईल आणि तुमच्याच भिंतीच्या आत त्याची वाटणी केली जाईल.


“पाहा! याहवेहचा तो महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी, मी तुमच्याकडे संदेष्टा एलीयाहला पाठवेन.


श्रीमंत लोकांनो, ऐका, जी आपत्ती तुमच्यावर येणार आहे त्यामुळे रडा आणि विलाप करा.


तेव्हा ते तिच्याकरिता ऊर बडवून शोक करतील. ते म्हणतील: “ ‘हाय हाय! महान बाबिलोन नगरी, ती सामर्थ्यशाली नगरी! एका क्षणात तिच्यावर न्यायाची कुर्‍हाड कोसळली आहे!’


Lean sinn:

Sanasan


Sanasan