Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 13:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 ते फार दूर देशातून येतात, आकाशाच्या शेवटच्या टोकापासून— याहवेह आणि त्यांच्या क्रोधाची शस्त्रे संपूर्ण देशाचा नाश करण्यासाठी येतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 ते दूर देशातून, दिगंतापासून येत आहेत; परमेश्वर व त्याची क्रोधशस्त्रे देशाचा विध्वंस करण्यास येत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 ते दूर देशातून, दिगंतापासून येत आहेत. परमेश्वर त्याच्या न्यायाच्या शस्त्रांसहीत संपूर्ण देशाचा नाश करावयास येत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 13:5
19 Iomraidhean Croise  

“पाहा, बलवान कसे पडले आहेत! युद्धाची शस्त्रे नष्ट झाली आहेत!”


“अश्शूरचा धिक्कार असो, जो माझ्या क्रोधाची काठी आहे, ज्याच्या हातामध्ये माझ्या क्रोधाचा सोटा आहे!


पाहा, ज्यांना चांदीची पर्वा नाही, आणि जे सोन्यामध्ये आनंद मानत नाहीत त्या मेदिया लोकांना मी त्यांच्याविरुद्ध चिथावणी देईन.


पाहा, याहवेह पृथ्वीचा नाश करणार आहेत आणि ती उद्ध्वस्त करणार आहेत; ते तिचा चेहरा बिघडवून टाकतील आणि तेथील रहिवाशांची पांगापांग करतील—


माझ्या लोकांनो, जा, तुमच्या खोल्यांध्ये जा आणि तुमच्यामागे दारे बंद करा; थोडा वेळ पर्यंत तुम्ही स्वतःला लपवून ठेवा जोपर्यंत त्यांचा राग निघून जात नाही.


पहा, धगधगत्या क्रोधाने आणि धुराच्या दाट ढगांबरोबर, याहवेहचे नाव फार लांबून येत आहे; त्यांचे ओठ क्रोधाने भरलेले आहेत, आणि त्यांची जीभ भस्म करणारा अग्नी आहे.


याहवेह सर्व राष्ट्रांवर रागावले आहेत; त्यांचा क्रोध सर्व सैन्यांवर आला आहे. ते त्यांचा संपूर्णपणे नाश करतील, ते त्यांना वध करणाऱ्यांकडे सोपवून देतील.


“एकत्र या, तुम्ही सर्वजण आणि ऐका: तुमच्या कोणत्या मूर्तीने तुम्हाला हे भविष्य सांगितले होते? याहवेहचा निवडलेला मित्र बाबेलच्या विरुद्ध त्यांचे हेतू साध्य करेल; बाबेलवर ते त्यांचा हात उगारतील.


दूरवरच्या राष्ट्रांसाठी ते एक ध्वज उंचावतात, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत जे आहेत, त्यांना ते शिट्ट्या वाजवून बोलवितात. हे बघा ते आले, तत्काळ आणि वेगाने!


हे तुमच्या नजरेस पडताच, तुम्हाला आनंदाचे भरते येईल व तुम्ही गवतासारखे बहरून जाल; याहवेहचा कल्याणकारी हात त्यांच्या सेवकांस प्रकट होईल, पण त्यांच्या शत्रूंना त्यांचा क्रोध दाखविण्यात येईल.


त्या दिवशी याहवेह इजिप्तमधील नाईल नदीच्या मुखप्रदेशातील माशा आणि अश्शूर देशामधील मधमाशांना शिट्टी वाजवून बोलावतील.


याहवेहने आपले शस्त्रागार उघडले व आपल्या क्रोधाचा स्फोट करण्यासाठी शस्त्रे बाहेर काढली, कारण सार्वभौम सर्वसमर्थ याहवेहस बाबेलच्या भूमीवर कार्य करावयाचे आहे.


तिच्यावर उत्तरेकडून एक राष्ट्र हल्ला करेल आणि तिच्या भूमीचा विध्वंस करेल. तिथे पुन्हा कोणीही राहणार नाही; लोक आणि पशू पलायन करतील.


कारण मी उत्तरेकडील महान राष्ट्रांना एकवटून बाबेलवर हल्ला करण्यास प्रेरित करणार. ते बाबेलवर हल्ला करण्यास सज्ज होतील, आणि उत्तरेकडून तिचा पाडाव होईल. त्यांचे बाण लक्ष्यवेधी योद्ध्यांसारखे असतील ते रिकाम्या हाताने परत जात नसतात.


“बाणांना धार लावा, ढाली उचलून घ्या! याहवेहनी मेदियाच्या राजाला प्रेरित केले आहे, कारण त्यांचा हेतू बाबेलचा नाश करण्याचा आहे. याहवेह बाबेल्यांचा सूड उगवतील, हा त्यांच्या मंदिराबद्दलचा सूड आहे.


माझ्या लोकांचे आक्रोश ऐका दूर देशातून ते ऐकू येत आहे: “सीयोनेत याहवेह नाहीत काय? तिचा राजा तिथे नाही काय?” “त्यांनी कोरीव मूर्ती करून मला का संताप आणला, त्यांनी व्यर्थ परकीय दैवत का पुजले?”


म्हणून मी त्यांच्यावर माझा क्रोध ओतेन आणि माझ्या कोपाग्नीने त्यांना भस्म करेन त्यांनी जे काही केले ते मी त्यांच्याच माथ्यावर आणेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”


तो कर्ण्यांच्या महानादाबरोबर आकाशांच्या या टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत आणि चारही दिशेकडून त्याच्या निवडलेल्या लोकांना एकत्र करण्यासाठी आपल्या दूतांस पाठवेल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan