Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 13:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 उघड्या टेकडीच्या शिखरावर ध्वज उंच करा, मान्यवर लोकांच्या फाटकांमधून प्रवेश करण्यासाठी त्यांना ओरडून सांगा; खुणा करून त्यांना बोलवा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 उघड्या डोंगरावर ध्वज उभारा, लोकांना मोठ्याने हाका मारा; हाताने खुणवा म्हणजे ते सरदारांच्या वेशीत प्रवेश करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 उघडया डोंगरावर इशारा देणारा ध्वज उभारा, त्यांना मोठयाने हाक मारा, त्यांनी सरदारांच्या द्वारात यावे म्हणून त्यांना हाताने खुणवा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 13:2
15 Iomraidhean Croise  

परंतु तुम्ही आपल्या भय बाळगणार्‍यांकरिता एक झेंडा उंचाविला आहे की तो आमच्या शत्रुंविरुद्ध प्रदर्शित करू. सेला


आज ते नोब येथे थांबतील; सीयोन कन्येच्या डोंगराकडे, यरुशलेमच्या टेकडीकडे ते त्यांच्या मुठी वळवतील.


राष्ट्रांसाठी ते एक ध्वज उभा करतील आणि इस्राएलच्या बंदिवासात गेलेल्यांना एकत्र करतील; पृथ्वीच्या चारही कोपऱ्यातून यहूदीयाच्या विखुरलेल्या लोकांना ते एकत्र जमवतील.


याहवेह, इजिप्तच्या समुद्राचे आखात कोरडे करतील; होरपळणाऱ्या वाऱ्याने ते फरात नदीवर हात झटकून टाकतील. ते त्याचे सात ओढे पाडतील जेणेकरून पायतणे घालूनही ती ओलांडता येईल.


अहो तुम्ही जगातील सर्व लोकहो, तुम्ही जे पृथ्वीवर राहता, जेव्हा पर्वतांवर झेंडा उभारला जाईल, तेव्हा तुम्हाला तो दिसेल, आणि जेव्हा तुतारी वाजेल तेव्हा तुम्ही ती ऐकाल.


त्या दिवशी इजिप्तचे लोक दुर्बल होतील. सर्वसमर्थ याहवेहनी त्यांच्याविरुद्ध उगारलेल्या हाताच्या धाकामुळे ते घाबरून थरकापतील.


दहशतीमुळे त्यांचा किल्ला पडून जाईल; युद्धाच्या ध्वजाचे दृश्य पाहून त्यांचे सेनापती भयभीत होतील,” ज्या याहवेहचा अग्नी सीयोनमध्ये आहे, ज्यांची भट्टी यरुशलेममध्ये आहे, ते अशी घोषणा करतात.


दूरवरच्या राष्ट्रांसाठी ते एक ध्वज उंचावतात, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत जे आहेत, त्यांना ते शिट्ट्या वाजवून बोलवितात. हे बघा ते आले, तत्काळ आणि वेगाने!


“राष्ट्रांमध्ये जाहीर कर व घोषणा कर, ध्वज उंचावून घोषणा कर; काहीही मागे सोडू नको, पण म्हण, ‘बाबेलचा पाडाव होणार आहे; तिचे दैवत बेल लज्जित करण्यात येणार आहे, मरोदख भयाने व्याप्त होणार. तिच्या मूर्ती लज्जित करण्यात येणार आहेत तिची दैवते भयाने व्याप्त होणार आहेत.’


“पाहा, उत्तरेकडील देशातून सैन्य येत आहे; पृथ्वीच्या शेवटापासून एक मोठे राष्ट्र व अनेक राजे भडकविले जात आहेत.


बाबेलच्या तटबंदीविरुद्ध तुमचे झेंडे उंच करा! पहारेकऱ्यांची कुमक पाठवून मजबूत करा, पहारेकऱ्यांना स्थानबद्ध करा, दबा धरून बसण्याची तयारी करा! याहवेहनी बाबेलच्या लोकांविरुद्ध दिलेल्या फर्मानाचा हेतू ते सिद्धीस नेतील.


“हे संहारक पर्वता, तू जो संपूर्ण पृथ्वीचा विध्वंस करतो, मी तुझ्याविरुद्ध आहे,” याहवेह जाहीर करतात, “मी माझा हात तुझ्याविरुद्ध उगारेन, तुला कडेलोट करेन, आणि तुला भस्म झालेला डोंगर करेन.


सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “बाबेलची दुर्गम तटबंदी भुईसपाट होईल आणि तिच्या उंच वेशी अग्नीने भस्म करण्यात येतील; लोकांचे कष्ट व्यर्थ ठरतील, देशाने केलेले श्रम अग्नीचे जळण होईल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan