Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 13:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 मी जगाला त्याच्या दुष्टाईबद्दल दुष्टांना त्यांच्या पापांबद्दल शिक्षा करेन. मी गर्विष्ठांचा अहंकार नाहीसा करेन आणि निर्दयी अभिमानींना मी लीन करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मी जगाचे त्याच्या दुष्टतेबद्दल व पातक्यांचे त्यांच्या अन्यायाबद्दल पारिपत्य करीन; गर्विष्ठांचा दिमाख बंद करीन, जुलम्यांचा तोरा उतरवीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मी जगाला त्यांच्या वाईटासाठी आणि दुष्टांला त्यांच्या अपराधासाठी शिक्षा करीन. मी गर्विष्ठांचा उद्धटपणा आणि निर्दयांचा गर्व उतरवील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 13:11
30 Iomraidhean Croise  

जे अहंकारी आहेत त्या सर्वांकडे पाहा आणि त्यांना नम्र कर. दुष्ट जिथे उभे राहतात, तिथेच त्यांना पायाखाली तुडव.


जर नीतिमान लोकांना पृथ्वीवरच प्रतिफळ मिळते, तर मग अनीतिमान व पापी लोकांना किती मोठ्या प्रमाणात मिळेल!


याहवेहचे भय धरणे म्हणजे वाईटाचा द्वेष करणे होय. गर्विष्ठपणा आणि उद्धटपणा, वाईट आचरण आणि विकृत भाषण यांचा मी तिरस्कार करते.


परंतु ते नीतिमत्त्वाने गरजवंत लोकांचा न्याय करतील, न्यायाने ते पृथ्वीवरील गरिबांसाठी निर्णय देतील. ते त्यांच्या मुखाच्या काठीने पृथ्वीवर हल्ला करतील; ते त्यांच्या ओठांच्या श्वासाने दुष्टांचा वध करतील.


भूमीचे वतन मिळविण्यासाठी ते उठू नये आणि त्यांच्या शहरांनी पृथ्वी व्यापली जाऊ नये, म्हणून त्याच्या पूर्वजांनी केलेल्या पापांसाठी त्याच्या मुलांना मारून टाकण्यासाठी जागा तयार करा.


कारण याहवेहने दुष्टांची काठी, व तुझा दुष्टाईचा राजदंड मोडला आहे,


उन्मताची नजर नमविली जाईल, आणि मनुष्याचा गर्व उतरविला जाईल; त्या दिवशी याहवेह एकटेच गौरविले जातील.


गर्विष्ठ आणि उद्धट लोकांना, जे सर्वकाही उच्च करण्यात आले आहे त्यांना नम्र करण्यासाठी, सर्वसमर्थ याहवेहने एक दिवस निर्धारित केला आहे—


मनुष्याचा सर्व अहंकार नमविला जाईल आणि मनुष्याचा गर्व खाली करण्यात येईल; त्या दिवशी याहवेह एकटेच गौरविले जातील.


सर्वसमर्थ याहवेहनी माझ्या ऐकण्यात हे प्रकट केले आहे: “तुझ्या मरणाच्या दिवसापर्यंत या पापाचे प्रायश्चित्त केले जाणार नाही,” असे प्रभू सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.


सर्वसमर्थ याहवेहनी ती योजना केली आहे, तिच्या सर्व वैभवाचा गर्व कमी करण्यासाठी आणि पृथ्वीवर नामांकित असलेल्या सर्वांना नम्र करण्यासाठी.


त्या दिवशी याहवेह, वर आकाशातील अधिपतींना आणि खाली पृथ्वीवरील राजांना शिक्षा करतील.


म्हणून बलवान लोक तुमचा सन्मान करतील; निर्दयी राष्ट्रांची नगरे तुमचा आदर करतील.


आणि वाळवंटातील उष्णतेसारखा. परदेश्यांची गर्जना तुम्ही शांत करता; जशी ढगाच्या सावलीने उष्णता कमी होते, तसे निर्दयी लोकांचे हर्षगीत शांत होते.


पाहा, पृथ्वीवरील लोकांना त्यांच्या पापाबद्दल शिक्षा देण्याकरिता, याहवेह त्यांच्या निवासस्थानातून बाहेर येत आहेत तिच्यावर झालेला रक्तपात पृथ्वी प्रगट करेल; तिच्यावर वधलेले यापुढे पृथ्वी लपवून ठेवणार नाही.


निर्दयी नाहीसे होतील, आणि उपहास करणारे दिसेनासे होतील, वाईट नजर ठेवणाऱ्याचा सर्वांचा नाश होईल—


परंतु तुमचे पुष्कळ शत्रू बारीक धुळीसारखे होतील, उडालेल्या भुशासारखे निर्दयी लोकांच्या झुंडी. अचानक, एका क्षणातच,


दुष्टांचा धिक्कार असो! अरिष्ट त्यांच्यावर येत आहे! त्यांनी केलेल्या कृत्याचा, त्यांना मोबदला मिळणार.


म्हणून लोकांची अधोगती होईल आणि प्रत्येकजण नम्र केला जाईल, गर्विष्ठांची नजर लीन केली जाईल.


“आम्ही मोआबच्या गर्वाविषयी ऐकले आहे— तिचा गर्व किती मोठा आहे— तिचा उर्मटपणा, तिचा उन्मत्तपणा, तिचा अहंभाव आणि तिच्या अंतःकरणाची मग्रुरीही सर्व आम्हाला माहीत आहे.


निर्धारित कालखंडाच्या शेवटी, मी, नबुखद्नेस्सरने माझी नजर वर स्वर्गाकडे वळवली आणि माझी बुद्धी मला पुन्हा लाभली. मग मी परात्पर परमेश्वराची महिमा केली; त्यांना आदर आणि गौरव दिला, जे सदासर्वकाळ जिवंत आहेत, त्यांची सत्ता शाश्वत आहे. त्यांचे साम्राज्य पिढ्यान् पिढ्या राहणारे आहे.


“बघ, शत्रू फुशारक्या मारत आहे; त्याच्या इच्छा दुष्ट आहेत— पण नीतिमान व्यक्ती त्याच्या विश्वासयोग्यतेमुळे जगेल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan