Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 11:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 अश्शूरपासून त्यांच्या अवशिष्ट लोकांसाठी जेव्हा ते इजिप्तमधून आले तेव्हा जसा इस्राएलसाठी केला होता, तसा एक राजमार्ग असेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 मिसर देशातून निघण्याच्या वेळी इस्राएलास जसा मार्ग झाला तसा त्याच्या अवशिष्ट लोकांना अश्शूरातून निघून जाण्यास हमरस्ता होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 इस्राएल मिसर देशातून वर आला, तेव्हा त्याचप्रमाणे त्याच्या अवशिष्ट लोकांस अश्शूरातून परतण्यास हमरस्ता होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 11:16
18 Iomraidhean Croise  

तेव्हा इस्राएली लोक, त्यांच्या उजवी व डावीकडे पाण्याची भिंत उभी असताना, समुद्रामधून कोरड्या भूमीवरून चालत गेले.


सर्वसमर्थ याहवेह यांनी जर आमच्यातील काहींना वाचविले नसते तर, आम्ही सदोमासारखे झालो असतो, गमोरासारखी आमची गत झाली असती.


त्या दिवशी इस्राएलचे अवशिष्ट, जिवंत राहिलेले याकोबाचे लोक, ज्याने त्यांना मारून टाकले त्याच्यावर यापुढे अवलंबून राहणार नाहीत, परंतु याहवेह, इस्राएलच्या पवित्र परमेश्वरावर ते खरोखरच भरवसा ठेवतील.


त्या दिवशी प्रभू अश्शूरमधून, इजिप्तच्या खालील भागामधून, इजिप्तच्या वरील भागामधून, कूशमधून, पथरोसमधून, एलाममधून, शिनारमधून, हमाथमधून आणि भूमध्यसागराच्या बेटांमधून त्यांच्या अवशिष्ट लोकांवर पुन्हा हक्क सांगण्यासाठी दुसऱ्या वेळेस त्यांचा हात पुढे करतील.


त्या दिवशी इजिप्तपासून अश्शूराकडे जाणारा एक महामार्ग असेल. अश्शूरचे लोक इजिप्तकडे आणि इजिप्तचे लोक अश्शूरला जातील. इजिप्तचे आणि अश्शूरचे लोक एकत्र भक्ती करतील.


आणि त्या दिवशी मोठा कर्णा वाजू लागेल. ज्यांचा अश्शूरमध्ये नाश होत होता आणि जे इजिप्तमध्ये बंदिवासात गेले होते, ते येतील आणि यरुशलेममधील पवित्र पर्वतावर याहवेहची उपासना करतील.


मी माझ्या सर्व पर्वतांच्या सरळ वाटा करेन, आणि माझे महामार्ग उंचावले जातील.


पाहा, ते दूरच्या ठिकाणांहून येतील— काही उत्तरेकडून, काही पश्चिमेकडून, तर काही सीनीम प्रांतातून येतील.”


ते तुम्हीच नाही का, ज्यांनी समुद्र आटवून कोरडा केला, त्या अति खोल पाण्याला आटविले, ज्यांनी समुद्राच्या खोलीत मार्ग तयार केला जेणेकरून तुमचे सोडविलेले लोक ते पार करतील?


आणि असे म्हणण्यात येईल: “बांधा, बांधा, महामार्ग बांधा! माझ्या लोकांच्या वाटेतील सर्व अडथळे बाजूला करा.”


बाहेर पडा! वेशींच्या बाहेर पडा! माझ्या लोकांसाठी मार्ग तयार करा. बांधा, महामार्ग बांधा! दगडधोंडे काढून टाका. राष्ट्रांकरिता ध्वज उंच फडकवा.


ती भूमी यहूदीयाच्या वंशातील अवशेषाचे वतन होईल; तिथे त्यांची कुरणे असतील. संध्याकाळी ते अष्कलोन येथील घरात विश्रांती घेतील. याहवेह, त्यांचे परमेश्वर आपल्या लोकांची काळजी घेतील; त्यांचे पूर्वीचे वैभव त्यांना परत प्राप्त करून देतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan