Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 10:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 दंड मिळण्याच्या दिवशी तुम्ही काय कराल, जेव्हा फार दुरून संकट येईल? तुम्ही कोणाकडे मदतीसाठी धावणार आहात? तुम्ही तुमची संपत्ती कुठे सोडून देणार?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 पारिपत्याच्या दिवशी व दुरून नाशकारक वादळ येईल तेव्हा काय कराल? तुम्ही साहाय्यार्थ कोणाकडे धाव घ्याल? आपले ऐश्वर्य कोठे ठेवून जाल?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 न्यायाच्या दिवशी जेव्हा विध्वंस दुरून येईल तेव्हा तुम्ही काय कराल? मदतीकरिता कोणाकडे पळाल आणि तुमची संपत्ती कोठे ठेवाल?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 10:3
40 Iomraidhean Croise  

याकोबाने लाबानाच्या पुत्रांचे म्हणणे ऐकले, “आमच्या वडिलांचे जे सर्वकाही होते ते याकोबाने घेतले आहे आणि ही सर्व संपत्ती त्याला जी मिळाली आहे ती आमच्या वडिलांची होती.”


ते यार्देनपर्यंत त्यांच्यामागे गेले आणि अरामी लोकांचे कपडे व सामान मार्गावर पसरलेले त्यांना आढळले, जे अरामी लोकांनी पळून जात असता फेकून दिले होते. दूत परत आले आणि राजाला हे वर्तमान कळवले.


तर मी परमेश्वराला सामोरे कसे जाणार? मला जाब विचारावयास बोलाविले असता, मी काय उत्तर देणार?


प्रकोपाच्या दिवशी संपत्ती निरुपयोगी असते, परंतु नीतिमत्व मृत्यूपासून सोडविते.


आक्रोश करा, कारण याहवेहचा दिवस जवळ आला आहे; तो दिवस सर्वसमर्थ यांच्याकडून नाशाप्रमाणे येईल.


“त्या दिवशी याकोबाचे वैभव कमी होईल; त्याच्या शरीरातील चरबी व्यर्थ जाईल.


त्या दिवशी या किनार्‍यावर राहणारे लोक असे म्हणतील की, ‘ज्यांच्यावर आम्ही विसंबून होतो, पहा हे त्यांचे काय झाले आहे. ज्यांच्याकडे आम्ही मदतीसाठी आणि अश्शूरच्या राजापासून आमची सुटका व्हावी यासाठी धाव घेतली होती, तर आता आमची सुटका कशी होईल?’ ”


ते आता मरण पावले आहेत, ते आता जगणार नाहीत. त्यांचे मृतात्मे उठत नाहीत. तुम्ही त्यांना शिक्षा केली आणि त्यांचा नाश केला; तुम्ही त्यांच्या सर्व आठवणी पुसून टाकल्या.


पाहा, पृथ्वीवरील लोकांना त्यांच्या पापाबद्दल शिक्षा देण्याकरिता, याहवेह त्यांच्या निवासस्थानातून बाहेर येत आहेत तिच्यावर झालेला रक्तपात पृथ्वी प्रगट करेल; तिच्यावर वधलेले यापुढे पृथ्वी लपवून ठेवणार नाही.


तुमचे अंथरूण फारच आखूड आहे, तुमचे पांघरूण अगदी अरुंद आहे.


सर्वसमर्थ याहवेह येतील मेघगर्जना आणि भूकंप आणि प्रचंड गर्जनेसह, सोसाट्याच्या वाऱ्याची वावटळ, वादळ आणि गिळंकृत करणाऱ्या अग्निज्वालांसह येतील.


तुम्ही असे म्हणाला की, ‘नाही, आम्ही घोड्यांवर स्वार होऊन पळून जाऊ.’ म्हणून तुम्ही पळून जाल! तुम्ही असे म्हणाला, ‘आम्ही वेगवान घोड्यांवर स्वार होऊ.’ म्हणून तुमचे पाठलाग करणारे चपळ होतील!


तरी प्रत्येकाला लज्जित करण्यात येईल कारण त्यांच्यासाठी ते निरुपयोगी लोक आहेत, जे काहीही मदत किंवा लाभ आणत नाहीत. परंतु केवळ लज्जा आणि अपमान.”


इजिप्तकडे, ज्यांनी दिलेली अभिवचने निरुपयोगी आहेत. म्हणून मी इजिप्तला निरुपयोगी राहाब म्हणतो.


सीयोनमध्ये असलेले पापी जन घाबरले आहेत; देवहीन लोक थरथर कापत आहेत: “भस्म करणाऱ्या अग्नीमध्ये आमच्यामधील कोण राहू शकेल? सार्वकालिक अग्नीत आमच्यामधील कोण जळत राहू शकेल काय?”


तेव्हा यशायाह संदेष्टा राजा हिज्कीयाहकडे गेला आणि त्याने विचारले, “ती माणसे काय म्हणाली आणि ती कुठून आली होती?” हिज्कीयाहने उत्तर दिले, “दूरवरील देशातून, ते बाबेलहून माझ्याकडे आले आहेत.”


म्हणून मृत्यू त्याचे जबडे पसरवितो, त्याचे तोंड मोठे करून उघडतो. त्यांचे उच्चकुलीन आणि जनसमूह, त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व भांडखोर आणि चंगळ करणारे त्यामध्ये उतरतील.


दूरवरच्या राष्ट्रांसाठी ते एक ध्वज उंचावतात, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत जे आहेत, त्यांना ते शिट्ट्या वाजवून बोलवितात. हे बघा ते आले, तत्काळ आणि वेगाने!


मी तुझ्याविरुद्ध विध्वंसकांची टोळी पाठवेन, प्रत्येक मनुष्य आपल्या शस्त्रांनी सुसज्ज असेल, ते तुझ्या सर्व उत्तम गंधसरूच्या तुळया कापतील आणि त्या तोडून अग्नीत टाकतील.


हे उद्ध्वस्त झालेल्या, तू काय करीत आहे? कशासाठी तू ही गडद वस्त्रे परिधान केली आहेस आणि अंगावर सोन्याचे दागिने चढविले आहेस? आपल्या डोळ्यांत काजळ घालून ते सजविले आहेस? या सर्व शृंगारांचा तुला काही एक उपयोग होणार नाही. तुझे प्रियकर तुझा तिरस्कार करतात; तुला ठार करण्याची त्यांची इच्छा आहे.


संदेष्टे खोटी भविष्यवाणी करतात, याजक स्वतःचेच अधिकार चालवितात, आणि माझ्या लोकांना ते आवडते. पण शेवटी तुम्ही काय करणार आहात?


अशा गोष्टीबद्दल मी त्यांना शासन करू नये का?” अशी याहवेह घोषणा करतात. “या अशा राष्ट्रावर मी स्वतः सूड उगवू नये काय?”


“ज्यावेळी एफ्राईमने त्याचा आजार पाहिला, आणि यहूदाहने त्याची जखम पाहिली, तेव्हा एफ्राईम अश्शूराकडे वळला, आणि महान राजाकडे मदतीसाठी विनंती केली. परंतु तो तुला बरे करू शकत नाही, तुझ्या जखमाही बर्‍या करू शकत नाही.


मग तू ठरविलेल्या उत्सवाच्या दिवशी, याहवेहच्या सणाच्या दिवशी काय करशील?


शासन करण्याची वेळ जवळ आली आहे; प्रतिफळ घेण्याचे दिवस जवळ आले आहेत. इस्राएलला हे समजून यावे. कारण तुमची पापे अधिक आहेत आणि तुमचे शत्रुत्व जास्त आहे, संदेष्टा मूर्ख ठरत आहे, प्रेरित वेडा समजला जातो.


जसे काय एखादा मनुष्य सिंहापासून पळाला आणि त्याला अस्वलाने गाठले, किंवा जसे काय आपल्या घरात येऊन त्याने हात भिंतीला टेकविला आणि त्याला साप चावला.


त्यांच्यामध्ये जो सर्वोत्कृष्ट मानला जातो तो काटेरी झुडूप आणि जो नीतिमान तो काट्याच्या कुंपणापेक्षाही वाईट आहे. परमेश्वराने तुमच्याकडे येण्याचा दिवस आला आहे, म्हणजेच तुमच्या पहारेकऱ्याने आवाज देण्याची वेळ आली आहे. आता तुमच्या गोंधळाची वेळ आली आहे.


त्यांचे सोने किंवा त्यांची चांदी त्यांना याहवेहच्या क्रोधापासून वाचवू शकणार नाही.” त्यांच्या ईर्षेच्या अग्नीने संपूर्ण पृथ्वी भस्म होईल, कारण जे सर्व पृथ्वीवर रहिवास करतात त्यांचा ते अकस्मातपणे अंत करतील.


ते तुला जमीनदोस्त करून टाकतील, तुला आणि तुझ्या मुलांना भिंतींमध्ये गाडतील. ते एका दगडावर दुसरा दगड राहू देणार नाहीत, कारण परमेश्वराची तुझ्याकडे येण्याची वेळ तू ओळखली नाहीस.”


याहवेह तुमच्यावर दुरून, पृथ्वीच्या सीमेवरून एक राष्ट्र पाठवतील, ते गरुडाप्रमाणे झेप घेऊन तुमच्यावर तुटून पडतील, ते असे राष्ट्र असेल ज्यांची भाषा तुम्हाला समजणार नाही,


अनीतिमान लोकांमध्ये अशा प्रकारचे चांगले जीवन जगा, की अयोग्य कृत्ये करण्याचा ते तुमच्यावर आरोप करीत असतील, तरी ते तुमची चांगली कामे पाहतील आणि परमेश्वराच्या येण्याच्या दिवशी ते त्यांचे गौरव करतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan