Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 10:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 जेव्हा प्रभूने सीयोन पर्वत आणि यरुशलेमविरुद्ध त्यांचे सर्व कार्य पूर्ण केले, तेव्हा ते म्हणतील, “मी अश्शूरच्या राजाला त्याच्या अंतःकरणाच्या हेतुपुरस्सर अभिमानाबद्दल आणि त्याच्या नजरेतील गर्विष्ठपणाबद्दल शिक्षा करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 ह्यास्तव प्रभूने सीयोन डोंगर यरुशलेम ह्यासंबंधाने आपले समग्र कार्य समाप्त केल्यावर असे होईल की अश्शूरचा राजा ह्याच्या मनातील गर्वाचा परिणाम व त्याच्या उन्मत्त दृष्टीचा दिमाख ह्यांचा बदला मी घेईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 सीयोन डोंगर व यरूशलेम यासंबंधीचे आपले कार्य संपले तेव्हा प्रभू म्हणेल, अश्शूरच्या राजाच्या उन्मत्त हृदयाचे भाषण व त्याच्या गर्वीष्ठ दृष्टीला मी शिक्षा करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 10:12
44 Iomraidhean Croise  

यरुशलेममधून अवशिष्ट लोक येतील, सीयोन पर्वतातून वाचलेल्याची टोळी येईल. सर्वसमर्थ याहवेहच्या आवेशाने हे सर्व घडून येईल.


नम्रजनांचा तुम्ही उद्धार करता, परंतु उन्मत्त दृष्टीच्या लोकांचा तुम्ही पात करता.


तुम्ही त्यांची संतती पृथ्वीवरून, त्यांचे वंशज मानवजातीतून कायमचे नाहीसे कराल.


खचित तुमचा मनुष्यावरचा क्रोध तुमच्या स्तुतीस कारणीभूत होईल, आणि तुमच्या रोषाने उर्वरितांना रोखण्यात आले.


प्रबळांची लूटमार झाली आहे, ते मृत्यूची निद्रा घेत आहेत; त्यांच्यातील एकाही योद्ध्याला हात उचलता येत नाही.


गर्विष्ठ दृष्टी आणि अभिमानी अंतःकरण— दुष्टांचे नांगर न चालविलेले शेत—पाप उत्पन्न करतात.


काही लोकांचे डोळे नेहमीच मग्रुरीत असतात, ज्यांच्या नजरा तिरस्काराने भरलेल्या असतात;


उन्मताची नजर नमविली जाईल, आणि मनुष्याचा गर्व उतरविला जाईल; त्या दिवशी याहवेह एकटेच गौरविले जातील.


गर्विष्ठ आणि उद्धट लोकांना, जे सर्वकाही उच्च करण्यात आले आहे त्यांना नम्र करण्यासाठी, सर्वसमर्थ याहवेहने एक दिवस निर्धारित केला आहे—


त्या दिवशी याहवेह, वर आकाशातील अधिपतींना आणि खाली पृथ्वीवरील राजांना शिक्षा करतील.


याहवेहनी तिच्यावर हल्ला केला आहे का, ज्यांनी तिच्यावर हल्ला केला, तिच्यावर याहवेहने हल्ला केला होता का? तिला मारण्यात आले आहे का, ज्यांनी तिला मारले, त्यांना मारण्यात आले आहे का?


तेव्हा याप्रकारे याकोबाच्या अपराधाचे प्रायश्चित्त होईल, आणि त्याचे पाप काढून टाकल्याचे हे पूर्ण फळ असेल: जेव्हा ते वेदीच्या सर्व दगडाचे चुनखडीसारखे चूर्ण करतील. अशेरा दैवतेचे स्तंभ किंवा धूपवेद्या तशाच उभ्या सोडतील.


म्हणून मी पुन्हा एकदा या लोकांना विस्मित करेन. चमत्कारानंतर चमत्कार करून; ज्ञानी लोकांचे ज्ञान नष्ट होईल, बुद्धिमानाची बुद्धी नाहीशी होईल.”


हे विनाशका, तुझा धिक्कार असो, तू, ज्याचा नाश करण्यात आला नाही! हे विश्वासघातक्यांनो, तुमचा धिक्कार असो, तुम्ही, ज्यांचा विश्वासघात करण्यात आला नाही! जेव्हा तुम्ही नाश करणे थांबवाल, तेव्हा तुमचा नाश होईल; जेव्हा तुम्ही विश्वासघात करणे थांबवाल, तेव्हा तुमचा विश्वासघात केला जाईल.


तू कोणाचा उपहास व निंदा केलीस? तू कोणाविरुद्ध उंच आवाजात बोललास, गर्विष्ठपणाने कोणाकडे नजर उचलून बघितलेस? इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराविरुद्ध तू हे केलेस!


कारण तू माझ्यावर संतापतो व तुझा उन्मत्तपणा माझ्या कानावर आल्यामुळे, मी तुझ्या नाकात वेसण अडकवेन व तुझ्या तोंडात लगाम घालेन आणि मग तू आलास त्याच वाटेने तुझ्याच देशात तुला परत नेईन.


म्हणून लोकांची अधोगती होईल आणि प्रत्येकजण नम्र केला जाईल, गर्विष्ठांची नजर लीन केली जाईल.


परंतु आता, तुम्ही जे अग्नी प्रज्वलित करता आणि स्वतःला जळत्या मशालीचा पुरवठा करता, जा, तुम्ही स्वतः प्रज्वलित केलेल्या, आणि तुम्ही ज्वलंत केलेल्या मशालीच्या प्रकाशात चला, माझ्यापासून मात्र तुम्हाला हे प्राप्त होईल: तुम्ही यातनामध्ये पडून राहाल.


सर्व लोकांना ते माहीत होईल— एफ्राईम आणि शोमरोन येथील नागरिक— जे अभिमानाने आणि अंतःकरणाच्या उद्धटपणाने असे म्हणतात,


माझे नाव धारण करणाऱ्या नगरावर मी विपत्ती आणत आहे, आणि मग तुम्ही शिक्षेवाचून राहाल काय? तुम्हाला शिक्षा चुकवता येणार नाही, कारण पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांविरुद्ध मी तलवार चालविणार आहे, असे सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.’


म्हणून सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: “मी बाबेलच्या राजाला व त्याच्या भूमीला शिक्षा देईन, अश्शूरच्या राजाला व त्याच्या भूमीला शिक्षा देईन.


गर्विष्ठ अडखळतील व पडतील, तिला मदतीचा हात देऊन कोणीही उठविणार नाही; मी तिच्या नगरांमध्ये अग्नी पेटवेन तो अग्नी सभोवतालचे सर्वकाही गिळंकृत करेल.”


“ ‘यास्तव सार्वभौम याहवेह म्हणतात: मोठे देवदारू दाट झाडींच्या वर उंच झाले आणि त्याला त्याच्या उंचीचा गर्व झाला,


म्हणून पाण्याजवळ असलेले कोणतेही झाड यापुढे दाट झाडींच्या वर गर्वाने उंच वाढणार नाही. भरपूर पाणी मिळालेल्या झाडांपैकी कोणतेही झाड तेवढ्या उंचीपर्यंत वाढणार नाही; ते मरणास नेमलेले आहेत, पृथ्वीच्या खाली, मेलेल्यांमध्ये, जे मृतलोकात उतरले आहेत त्या लोकांत त्यांची जागा आहे.


समुद्राच्या मध्यभागी असलेल्या सुंदर पवित्र पर्वताजवळ तो आपला शाही तंबू उभारेल. तरीही त्याचा अंत होईल आणि त्याच्या साहाय्यासाठी कोणीही नसेल.


आता मी, नबुखद्नेस्सर, स्वर्गाच्या राजाधिराजाची स्तुती, गौरव व सन्मान करतो, कारण ते जे काही करतात ते योग्य करतात आणि त्यांचे सर्व मार्ग न्याय्य आहेत. आणि जे गर्वाने चालतात त्यांना ते नम्र करण्यास समर्थ आहेत.


कित्तीमाच्या किनार्‍यावरून जहाजे येतील; ते अश्शूर व एबर यांच्यावर जुलूम करतील, परंतु त्यांचाही नाश होईल.”


“जर झाड चांगले असेल तर त्याचे फळ देखील चांगले असते आणि जर झाड चांगले नसेल तर त्याचे फळ देखील चांगले नसते. झाड त्याच्या फळावरून ओळखले जाते.


कारण हृदयातून दुष्ट विचार, खून, जारकर्म, व्यभिचार, चोरी, खोटी साक्ष, निंदा ही बाहेर पडतात;


पण मला शत्रूच्या फुशारक्यांची धास्ती वाटली, ते कदाचित गैरसमज करतील, आणि म्हणतील, ‘आम्ही आमच्या बाहुबलानेच विजय मिळविला आहे; याहवेहने यातील काहीही केले नाही.’ ”


कारण ही वेळ न्यायनिवाडा करण्याची आहे आणि त्याची सुरुवात परमेश्वराच्या घराण्यातील लोकांपासून होत आहे; आणि जर त्याची सुरुवात आपल्यापासून झाली तर, जे परमेश्वराच्या शुभवार्तेप्रमाणे चालत नाहीत त्यांचे काय होईल?


Lean sinn:

Sanasan


Sanasan