Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 1:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 पायाच्या तळव्यापासून ते डोक्याच्या टाळूपर्यंत काहीही चांगले तिथे राहिले नाही— फक्त जखमा आणि खरचटलेले, आणि उघडे व्रण आहेत, त्या स्वच्छ केलेल्या किंवा पट्ट्यांनी बांधलेल्या नाहीत किंवा जैतुनाच्या तेलाने त्या पुसलेल्या नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 पायाच्या तळव्यापासून मस्तकापर्यंत काहीच धड नाही; जखमा, चेंचरलेले व पुवळलेले घाय आहेत; ते कोणी पिळून काढत नाही, त्यांवर कोणी पट्टी बांधत नाही, कोणी तेलाने नरम करीत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 पायाच्या तळव्यापायापासून डोक्यापर्यंत ज्याला दुखापत झाली नाही असा भाग राहीला नाही; फक्त जखमा व घाव आणि ताज्या उघड्या जखमा आहेत; त्या स्वच्छ केल्या नाहीत, पट्टी बांधून त्या झाकल्याही नाहीत किंवा तेलाने उपचार केला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 1:6
20 Iomraidhean Croise  

सर्व इस्राएलात सुंदरतेविषयी प्रशंसनीय असा अबशालोमसारखा कोणी नव्हता. डोक्याच्या माथ्यापासून तळपायापर्यंत त्याच्या ठायी काही दोष नव्हता.


कारण ते जखम करतात आणि पट्टीसुध्‍दा तेच बांधतात; ते दुखापत करतात, परंतु त्यांचाच हात आरोग्य देतो.


माझ्या संकटाच्या वेळी मी प्रभूला हाक मारली; रात्रीच्या वेळी न थकता मी त्यांच्याकडे हात पुढे करत राहिलो, तरीही माझे सांत्वन झाले नाही.


जेव्हा याहवेह त्यांच्या लोकांच्या जखमांना बांधतील आणि त्यांनी दिलेल्या जखमा बरे करतील, तेव्हा चंद्र सूर्यासारखा चमकेल आणि सूर्यप्रकाश सात पटीने तेजस्वी होईल, सात पूर्ण दिवसांच्या प्रकाशासारखा तो असेल.


सर्वात कपटी काही असेल तर, ते म्हणजे अंतःकरण आणि ते बरे करण्याच्या पलीकडे आहे. हे कळण्यास कोण समर्थ आहे?


“याहवेह असे म्हणतात: “ ‘तुझी जखम असाध्य आहे, तुझा घाव बरा होण्यापलिकडे आहे.


तुझ्या जखमेबद्दल तू विलाप का करतोस, तुझ्या दुखण्यावर काहीही इलाज नाही का? कारण तुझा अपराध खूप मोठा व तुझी पातके अनेक आहेत म्हणून मी तुझ्याशी असा व्यवहार केला.


“ ‘तरी देखील, मी यरुशलेमला आरोग्य व स्वास्थ्य प्रदान करेन; मी त्यांना आरोग्य देईन व विपुल शांती आणि सुरक्षितेचा आनंद उपभोगू देईन.


माझ्या लोकांच्या घावावर ते असा उपचार करतात की जणू ते फारसे गंभीर नाही. ‘शांती, शांती आहे’ असे ते म्हणतात, परंतु शांती कुठेही नाही.


ज्याप्रमाणे विहिरीच्या झऱ्यातून पाणी बाहेर वाहते, तशी तिची दुष्टाई झर्‍याप्रमाणे उफाळून येते. तिच्या रस्त्यारस्त्यातून हिंसाचार व विनाशाचे आवाज घुमतात; तिचे रोग व तिच्या जखमा सदोदित माझ्या नजरेसमोर आहेत.


तुला कशानेही आरोग्य मिळणार नाही; तुझी जखम घातक आहे. तुझ्या दुर्दशेची बातमी जे कोणी ऐकतील ते सर्वजण आनंदाने टाळ्या वाजवितील, तुझ्या क्रूरतेचा उपद्रव ज्याला झाला नाही, असा कोण आहे?


परंतु तुम्ही जे माझे नाव सन्माननीय मानता, त्या तुम्हासाठी नीतिमत्वाचा सूर्य उगवेल आणि त्याच्या किरणात आरोग्य असेल. मग तुम्ही बाहेर जाल व धष्टपुष्ट वासरांप्रमाणे बागडाल.


हे ऐकून, येशू त्यांना म्हणाले, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नसते, परंतु रोग्यास असते.


त्याच्याजवळ जाऊन त्या मनुष्याने त्याच्या जखमांना तेल व द्राक्षारस लावून पट्ट्या बांधल्या. त्याला आपल्या गाढवावर बसवून तो एका उतारशाळेत आला आणि त्याने त्याची सेवा केली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan