Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 1:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 बैल त्याच्या मालकाला ओळखतो, गाढव त्याच्या मालकाचा गोठा ओळखतो, परंतु इस्राएल ओळखत नाही, माझ्या लोकांना समजत नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 बैल आपल्या धन्याला ओळखतो, गाढव आपल्या मालकाचे ठाण ओळखतो; पण इस्राएल ओळखत नाही, माझे लोक विचार करीत नाहीत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 बैल आपल्या धन्याला ओळखतो, आणि गाढव आपल्या मालकाचे खाण्याचे कुंड ओळखतो, परंतु इस्राएल ओळखत नाही, इस्राएलास समजत नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 1:3
24 Iomraidhean Croise  

विचार करा, या लोकांमधील मूर्खांनो; निर्बुद्ध्यांनो, तुम्हाला शहाणपण कधी येणार?


योग्य ते काय आहे हे दुष्टकर्म करणाऱ्यांना समजत नाही, परंतु जे याहवेहचा शोध घेतात, त्यांना ते पूर्णपणे समजते.


अरे आळशा, मुंगीकडे जा; तिचे मार्ग लक्षात घे आणि शहाणा हो!


जेव्हा झाडाच्या फांद्या वाळून शुष्क होतात व मोडतात आणि स्त्रिया येतात व ते सरपण म्हणून जाळतात. तसे हे लोक असमंजस आहेत; म्हणून त्यांना घडविणाऱ्याला त्यांची दया येत नाही आणि त्यांचा निर्माणकर्ता त्यांच्यावर कृपा करीत नाही.


तुम्ही बऱ्याच गोष्टी बघितल्या आहेत, परंतु तुम्ही त्याकडे लक्ष देत नाही; तुमचे कान उघडे आहेत, परंतु तुम्हाला ऐकावयास येत नाही.”


ते अज्ञानी आहेत, त्यांना काहीही कळत नाही; त्यांनी बघू नये म्हणून त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे. त्यांना समज येऊ नये म्हणून त्यांची अंतःकरणे बधिर केली आहेत.


त्यांच्या मेजवानीत त्यांच्याकडे वीणा आणि सारंगी आहेत, वाद्ये आणि डफ आणि द्राक्षमद्य आहे, परंतु याहवेहनी केलेल्या कृत्यांकडे त्यांचे लक्ष नाही. याहवेहच्या हातांनी केलेल्या कार्यांचा ते आदर करीत नाहीत.


म्हणून असमजंसपणामुळे माझे लोक बंदिवासात नेले जातील; उच्च पदावरील लोक भुकेने मरतील आणि सर्वसाधारण लोक तहानेने कोरडे पडतील.


ते कुत्र्याप्रमाणे खूप खादाड आहेत; त्यांची तृप्ती कधीही होत नाही. ते असमंजस मेंढपाळ आहेत; ते सर्व आपल्याच मर्जीने चालतात, केवळ स्वतःच्या स्वार्थाची काळजी घेतात.


प्रत्येक मनुष्य असमंजस व ज्ञानहीन आहे; प्रत्येक सोनार त्याच्या मूर्तींनी लज्जित झाला आहे. त्याने घडविलेल्या प्रतिमा खोट्या आहेत. त्यांच्यामध्ये श्वास नाही.


लाकडाच्या व्यर्थ मूर्तींद्वारे ज्यांना शिक्षण मिळते, ते सर्व निर्बुद्ध व मूर्ख आहेत;


रेखाबचा पुत्र यहोनादाबच्या वंशजांनी आपल्या पित्याच्या आज्ञा संपूर्णपणे पाळल्या आहेत, पण या लोकांनी माझ्या आज्ञा पाळण्यास नकार दिला आहे.’


“माझे लोक मूर्ख आहेत; ते मला ओळखत नाही. ते असमंजस मुलांसारखे आहेत. त्यांना समज अजिबात नाही. दुष्ट कामे करण्यात त्यांचा हातखंडा आहे; त्यांना चांगले कार्य करावयाचे माहीत नाही.”


“माझे लोक हरवलेली मेंढरे होती; त्यांच्या मेंढपाळांनीच त्यांची वाट चुकविली त्यांना डोंगरांवर भटकण्यासाठी सोडून दिले होते. ते डोंगर व पर्वतावर भटकत राहिले व त्यांच्या मेंढवाड्यास ते विसरले.


आकाशातील करकोचाला तिचे निवडलेले ऋतू माहीत आहे, आणि तसेच कबुतर, बगळा व निळवी देखील त्यांच्या स्थलांतराच्या वेळेकडे लक्ष ठेऊन असतात. परंतु माझ्या लोकांना माहीतच नाही याहवेहच्या काय अपेक्षा आहेत.


“ ‘सार्वभौम याहवेह जाहीर करतात की, जेव्हा तू या सर्व गोष्टी करीत एका निर्लज्ज वेश्येप्रमाणे वागतेस, तेव्हा मी तुझ्याविरुद्ध क्रोधाने भरतो!


सर्व इस्राएली लोकांनी तुमच्या नियमांचे आज्ञाभंग केले आहे आणि तुमची आज्ञा पाळण्यास आपली पाठ फिरविली आहे. “म्हणूनच परमेश्वराचा सेवक मोशे याच्या नियमशास्त्रात लिहून ठेवलेले शाप आणि शपथेवरचा दंड आमच्यावर ओतला गेला आहे, कारण आम्ही तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.


तिने ओळखले नाही की, तो मीच होतो ज्याने तिला धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल दिले, ज्याने उदारहस्ते तिला चांदी आणि सोने दिले; जे त्यांनी बआलसाठी वापरले.


वाटेवर पडलेले बी अशा हृदयाच्या लोकांचे प्रतीक आहे की, ते परमेश्वराच्या राज्याची शुभवार्ता ऐकतात पण त्यातील त्यांना काहीही समजत नाही. मग सैतान येतो आणि त्यांच्या हृदयात पेरलेले वचन हिरावून नेतो.


यानंतरही, परमेश्वराचे ज्ञान राखून ठेवावे हे त्यांना उचित वाटले नाही, म्हणून परमेश्वरानेही त्यांची मने दुष्टतेच्या स्वाधीन केली, यासाठी की जे करू नये ते त्यांनी करावे.


परंतु ते बुद्धिपुरस्सर हे विसरतात की, फार पूर्वी परमेश्वराच्या शब्दाने आकाशमंडळ अस्तित्वात आले आणि पृथ्वी पाण्यातून व पाण्याद्वारे घडविली गेली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan