Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 1:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 “या आता, आपण वाद मिटवू या,” असे याहवेह म्हणतात. “जरी तुमची पापे लाखेसारखी असली, तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; जरी ती किरमिजाप्रमाणे लाल असली, तरी ती लोकरीसारखी होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 परमेश्वर म्हणतो, चला, या, आपण बुद्धिवाद करू; तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 परमेश्वर म्हणतो, “आता या, व एकमेकांशी संवाद करून हे जाणून घ्या; जरी तुमची पातके लाखेसारखी लाल असली, तरीही ती बर्फाप्रमाणे शुभ्र होतील; जरी ती किरमिजी रंगासारखी लाल असली, तरी ती शुभ्र लोकरीसारखी होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 1:18
23 Iomraidhean Croise  

परंतु आमच्यामध्ये जर कोणी मध्यस्थी करणारा असता, कोणी आम्हाला एकत्र आणणारा असता,


एजोबाने मला स्वच्छ करा, म्हणजे मी शुद्ध होईन; मला धुवा, म्हणजे मी हिमाहून पांढरा होईन.


माझ्या पातकांपासून आपले मुख फिरवा आणि माझे सर्व अपराध पुसून टाका.


तुमचे राज्यकर्ते बंडखोर आहेत, चोरांचे भागीदार आहेत; त्या सर्वांना लाच घ्यायला आवडते, आणि ते बक्षिसांच्या मागे पळतात. ते अनाथांच्या बाजूचे रक्षण करीत नाहीत; विधवांचा खटल्याचे समर्थन करीत नाहीत.


याहवेह त्यांच्या न्यायसभेत स्थानापन्न होतात; ते लोकांचा न्याय करण्यासाठी उभे राहतात.


“हे बेटांनो, तुम्ही माझ्यासमोर शांत राहा! राष्ट्रांना त्यांच्या सामर्थ्याचे नूतनीकरण करू द्या! त्यांना पुढे येऊन बोलू द्या; न्यायनिवाड्यासाठी आपण एकत्र भेटू या.


“तुमचा वाद पुढे आणा,” असे याहवेह म्हणतात. “तुमचा विवाद पुढे चालवा” असे याकोबाचा राजा म्हणतो.


मी तुझी पापे आकाशातील मेघांप्रमाणे, सकाळच्या धुक्याप्रमाणे विरून टाकली आहेत. माझ्याकडे परत ये, मी खंडणी भरून तुला मुक्त केले आहे.”


मला न्याय देणारे माझ्या निकट आहेत. मग माझ्याविरुद्ध कोण आरोप करेल? चला आपण एकमेकांचा सामना करू या! माझ्यावर आरोप करणारा कोण आहे? त्याने माझा सामना करावा!


दुष्टांनी आपले दुष्टमार्ग सोडून द्यावे अनीतिमानांनी त्यांचे विचार मनातून काढावे. त्यांनी याहवेहकडे वळावे, म्हणजे ते त्यांच्यावर दया करतील, आपल्या परमेश्वराकडे धाव घ्यावी, म्हणजे ते त्यांना मुक्तपणे क्षमा करतील.


याहवेह असे म्हणतात: “तुमच्या पूर्वजांना माझ्याठायी असा कोणता अन्याय दिसला की ते माझ्यापासून इतके दूर गेले? आणि ते व्यर्थ मूर्तींना अनुसरू लागले, आणि स्वतःही तसेच निरुपयोगी बनले?


परंतु जर एखादा दुष्ट व्यक्ती त्यांनी केलेल्या दुष्टाईपासून वळेल आणि जे न्याययुक्त व योग्य ते करेल, तर ते त्याचा जीव वाचवेल.


पूर्वी केलेल्या कोणत्याही पापांची त्यांच्याविरुद्ध आठवण केली जाणार नाही. जे न्याययुक्त व योग्य ते त्यांनी केले आहे; त्यामुळे ते खचितच जगतील.


“हे पर्वतांनो, याहवेहने केलेल्या आरोपाकडे लक्ष द्या; हे पृथ्वीच्या अढळ पाया, तूही ऐक. कारण याहवेहचा त्यांच्या लोकांविरुद्ध एक दावा आहे. ते इस्राएली लोकांविरुद्ध वाद दाखल करीत आहेत.


आपल्या रीतीप्रमाणे, पौल सभागृहामध्ये गेला आणि लागोपाठ तीन शब्बाथ दिवस त्याने धर्मशास्त्रावरून त्यांच्याशी संवाद केला,


प्रत्येक शब्बाथ दिवशी सभागृहात यहूदी आणि ग्रीक यांची खात्री करून देण्यासाठी तो प्रयत्न करीत असे.


तो जेव्हा नीतिमत्व, इंद्रियदमन आणि भावी न्याय या गोष्टीसंबंधाने बोलत होता, तेव्हा फेलिक्स भयभीत झाला आणि म्हणाला, “आतासाठी हे पुरे आहे! तू जाऊ शकतोस. मला पुढे अधिक सवड लाभली, तर मी तुला पुन्हा बोलावेन.”


पापाची जाणीव वाढावी म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला, कारण जिथे पाप वाढले, तिथे कृपा अति विपुल झाली,


मी म्हटले, “महाराज, ते तुम्हाला माहीत आहे.” तेव्हा ते म्हणाले, “जे महान संकटातून निभावून येतात, ते हे आहेत. त्यांनी आपले झगे कोकर्‍याच्या रक्ताने धुऊन शुभ्र केले आहेत.


तर आता येथे उभे राहा, कारण याहवेहने तुमच्यासाठी आणि तुमच्या पूर्वजांसाठी केलेली सर्व नीतिमान कृत्ये त्याविषयी मी तुम्हाला याहवेहसमोर बोध करतो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan