Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 8:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 इस्राएलने जे उत्तम ते नाकारले आहे; शत्रू त्याचा पाठलाग करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 इस्राएलाने चांगल्याचा धिक्कार केला आहे; शत्रू त्याच्या पाठीस लागेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 पण इस्राएलाने जे चांगले ते नाकारले आहे, आणि शत्रू त्याचा पाठलाग करेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 8:3
10 Iomraidhean Croise  

त्यांचा प्रत्येक शब्द कपटाचा आणि अनीतीचा असतो; शहाणपणा आणि चांगुलपणा करण्यात ते अपयशी होतात.


क्रोधाने त्यांचा पाठलाग करा आणि याहवेहच्या आकाशाखालून त्यांना पूर्णपणे नाहीसे करा.


आमचा पाठलाग करणारे आकाशातील गरुडांपेक्षा वेगवान आहेत; ते पर्वतांवरही आम्हाला शोधून काढतात आणि वाळवंटात आमची वाट पाहत दबा धरून बसलेले असतात.


इस्राएल माझा धावा करून आता म्हणतो, ‘आमच्या परमेश्वरा, आम्ही तुमचा स्वीकार करतो!’


त्यांनी माझ्या संमतीशिवाय राजे नेमले आहेत; ते माझ्या मान्येतेशिवाय अधिपतींना निवडतात. त्यांनी आपले चांदी आणि सोने घेऊन स्वतःच्या नाशाकरिता मूर्ती बनविल्या आहेत.


“ ‘तुमच्यातील जे उर्वरित राहतील, त्यांच्या शत्रूंच्या देशात मी त्यांची अंतःकरणे इतकी भयभीत करेन, की वार्‍याने उडून जाणार्‍या पानांचा आवाजसुद्धा त्यांना असा पळ काढावयास लावील की जणू एखादा तलवार घेऊन त्यांच्या पाठीशी लागला आहे आणि कोणीही त्यांचा पाठलाग करत नसले तरी ते पडतील.


याहवेह असे म्हणतात: “एदोमच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून अनुताप करणार नाही. कारण त्याने तलवार घेऊन आपल्या भावाचा पाठलाग केला आणि देशातील स्त्रियांचा वध केला, कारण त्याचा क्रोध निरंतर वाढत होता, आणि त्याच्या क्रोध अनियंत्रित वाढत गेला,


तुमच्या शत्रूंपुढे तुमचा पराभव व्हावा, असे याहवेह करतील. तुम्ही त्यांच्यावर एका दिशेने चाल करून जाल, पण सात दिशांनी गोंधळून पळ काढाल आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांकरिता तुम्ही भयानक विनाशाचे उदाहरण व्हाल.


आणि म्हणून आपली पहिली प्रतिज्ञा मोडल्याबद्दल त्या आपल्यावर दंड ओढवून घेतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan