Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 7:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 “ते राजाला आपल्या दुष्टाईने, अधिपतीला आपल्या लबाड्यांनी हर्षित करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 ते राजाला आपल्या दुष्टतेने, ते सरदारांना आपल्या लबाड्यांनी, खूश करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 ते आपल्या वाईटाने राजाला, आणि लबाडीने अधिकाऱ्याला खूश करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 7:3
16 Iomraidhean Croise  

जो दूत मिखायाहला बोलविण्यास गेला होता तो त्याला म्हणाला, “पाहा, सर्व संदेष्टे राजाच्या यशासंबंधी भविष्य सांगत आहेत, तुझे शब्द सुद्धा त्यांच्याशी सहमत होऊ दे आणि राजाच्या बाजूने चांगले बोल.”


तेव्हा इस्राएलच्या राजाने सुमारे चारशे संदेष्ट्यांना एकत्र बोलाविले आणि त्यांना विचारले, “मी रामोथ-गिलआदच्या विरुद्ध युद्धास जावे की नाही?” ते म्हणाले, “जा, कारण प्रभू ते राजाच्या हाती देतील.”


बाबेलचा राजा तुमच्यावर किंवा या देशावर हल्ला करणार नाही, असे तुम्हाला सांगणारे ते संदेष्टे आता कुठे आहेत?


संदेष्टे खोटी भविष्यवाणी करतात, याजक स्वतःचेच अधिकार चालवितात, आणि माझ्या लोकांना ते आवडते. पण शेवटी तुम्ही काय करणार आहात?


बरे झाले असते, जर ओसाड रानात माझ्याकडे या यात्रेकरूंकरिता एखादे आश्रयस्थान असते. जेणेकरून मी माझ्या लोकांचा त्याग करून त्यांच्यापासून दूर गेलो असतो; कारण ते सर्वजण व्यभिचारी आहेत, विश्वासघातकी लोकांचा एक जमाव.


पण तुम्ही दुष्टतेची नांगरणी केली आहे आणि अन्यायाचे पीक काढले आहे, तुम्ही लबाडीचे फळ खाल्ले आहे. कारण तुम्ही स्वतःच्या सामर्थ्यावर आणि आपल्या अनेक योद्धांवर विश्वास ठेवला आहे,


एफ्राईमने मला खोटेपणाने, इस्राएलने फसवेगिरीने वेढून टाकले आहे. आणि यहूदाह उद्धटपणाने परमेश्वराच्या विरोधात आहे, शिवाय जे परमेश्वर विश्वासू व पवित्र आहेत, त्यांच्याविरुद्ध आहे.


या ठिकाणी फक्त शाप, खोटे बोलणे आणि खून, चोरी आणि व्यभिचार आहे; सर्व सीमाबंदी ते मोडून टाकतात, आणि रक्तपातानंतर रक्तपात होतो.


एफ्राईम चिरडला गेला आहे, न्यायात चेंगरलेला आहे. कारण मूर्तीच्या मागे जाण्याचा त्याचा निश्चय आहे.


आमच्या राजाच्या उत्सवाच्या दिवशी अधिपती द्राक्षारसाने धुंद होतात, आणि त्याने आपला हात कुचेष्टा करणार्‍यांबरोबर मिळविला आहे.


तू ओमरीचे नियम आणि अहाबाच्या घराण्याच्या सर्व चालीरीती पाळल्या आहेत; तुम्हीही त्यांच्या रूढी पाळल्या आहेत. म्हणून मी तुझा नाश करेन व तुझ्या प्रजेची थट्टा करेन; तू राष्ट्रांची निंदा सहन करशील.”


वाईट करण्यात दोन्ही हात निपुण आहेत; शासक भेटवस्तूंची मागणी करतो, न्यायाधीश लाच घेतात, सामर्थ्यवान लोक बळजबरीने त्यांच्या इच्छा पूर्ण करतात; ते सर्व मिळून कट रचतात.


अशा गोष्टी करणार्‍यांना मरण रास्त आहे, हा परमेश्वराच्या नीतिमत्वाचा आदेश ठाऊक असूनही, ते या गोष्टी करीतच राहिले, इतकेच नव्हे तर, जे करतात त्यांनाही मान्यता दिली.


हे लोक या जगाचे आहेत आणि म्हणून साहजिकच या जगाच्या गोष्टींबद्दल त्यांना आस्था वाटते आणि जगही त्यांच्याकडे लक्ष देते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan