Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 2:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 नाही तर मी तिचे वस्त्र काढून तिला नग्न करेन, जशी तिच्या जन्माच्या दिवशी ती नग्न होती; तिला मी वैराण प्रदेशासारखी करेन, निर्जल भूमीसारखी ठेवेन व तिला तहानेने जिवे मारीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 नाहीतर मी तिला वस्त्ररहित करून ती जन्माच्या दिवशी होती तशी तिला नग्न ठेवीन, तिला वैराणासारखी करीन, तिला निर्जल भूमीसारखी ठेवीन, तिला तहानेने ठार मारीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 जर नाही, तर मी तिला नग्न करून जन्माच्या वेळी होती तशी नग्न करीन, मी तिला ओसाड, रुक्ष भूमी सारखे करीन आणि मी तिला तहानेने मारीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 2:3
27 Iomraidhean Croise  

पण तिथे लोकांना फारच तहान लागली होती आणि ते मोशेविरुद्ध कुरकुर करीत म्हणाले, “आम्ही व आमची मुलेबाळे व पशू तहानेने मरून जावे म्हणून तू आम्हाला इजिप्त देशाबाहेर आणलेस का?”


भूमी शुष्क होत आहे आणि ओसाड झाली आहे, लबानोन शरमिंदा झाला आहे आणि कोमेजला आहे; शारोनची कुरणे अरबी वाळवंटसारखी झाली आहेत, आणि बाशान व कर्मेल त्यांची पाने गळून पडत आहेत.


तुझ्या नग्नतेचे प्रदर्शन होईल, आणि तुझी लज्जा अनावृत होईल. मी सूड उगवेन; मी कोणा मनुष्याला सोडणार नाही.”


तुमची पवित्र शहरे ओसाड झाली आहेत; सीयोनही ओसाड झाले आहे, यरुशलेम तर उजाड रान झाले आहे.


अनेक मेंढपाळ माझ्या द्राक्षमळ्यांची नासाडी करतील मळा पायाखाली तुडवतील; ते माझा रमणीय मळा ओसाड करतील.


“हे सर्व माझ्यावर का ओढवले?” असा प्रश्न तू जर स्वतःला विचारलास— तर तुझ्या घोर पापांमुळे हे घडत आहे तुझी वस्त्रे फाडण्यात आली तुझ्या शरीरास दुष्टतेने वागविले आहे.


म्हणून मी तुझी वस्त्रे वर ओढून तुझ्या चेहऱ्यावर टाकेन जेणेकरून तुझी लाज उघडी पडेल—


त्यातील प्रतिष्ठित लोक विहिरीतून पाणी आणण्यासाठी आपले दास पाठवितात; ते विहिरीवर जातात परंतु त्यांना पाणी मिळत नाही. ते रिकामी घागरी घेऊन परत येतात; गोंधळून व निराश होऊन आपली डोकी झाकून घेतात.


तो मनुष्य वैराण वाळवंटातील खुरट्या झुडूपासारखा आहे; उन्नतीचे चांगले दिवस त्यांना कधीच दिसणार नाहीत. ते वाळवंटातील उजाड भूमीमध्ये, ज्या क्षारभूमीत जीवन नसेल, तिथे राहतील.


“या पिढीच्या लोकांनो, याहवेहच्या वचनावर विचार करा: “मी इस्राएलशी एखाद्यावर निर्जन प्रदेशाप्रमाणे किंवा अंधाऱ्याप्रदेशाप्रमाणे वागलो काय? माझे लोक असे का म्हणतात, ‘आम्ही मन मानेल तसे भटकण्यास मोकळे आहोत; आता पुन्हा आम्ही तुमच्याशी संबंध ठेवणार नाही’?


त्यांनी असे विचारले नाही, ‘ज्यांनी आम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले आणि वैराण प्रदेशातून मार्गस्थ केले, वाळवंटातून व दऱ्याखोऱ्यातून नेले, निर्जल आणि गडद अंधकाराच्या भूमीतून नेले, ज्या प्रदेशातून कोणीही प्रवास करीत नाही व जिथे मनुष्यवस्ती नाही त्यातून आम्हाला नेले, ते याहवेह कुठे आहेत?’


कारण या यहूदीयांच्या राजवाड्यासंबंधी, याहवेह असे म्हणाले: “जरी तू मला गिलआद प्रांतासारखा आहे, व लबानोनच्या शिखरासारखा आहेस, मी निश्चितच तुझा विध्वंस करून तुला ओसाड आणि निर्जन नगरीसारखे करेन.


सुपीक जमीन ही एक वाळवंट झाली होती; आणि येथील सर्व नगरे उद्ध्वस्त होती याहवेहच्या समोर, त्यांच्या भयंकर क्रोधाग्नीपुढे.


तिची शहरे ओसाड होतील, ती एक शुष्क व निर्जन भूमी होईल, एक अशी भूमी जिथे कोणी मनुष्य राहत नाही, जिच्यामधून कोणीही प्रवास करीत नाही.


त्यांची भूमी इस्राएलच्या पवित्र परमेश्वरासमोर जरी तिच्या अपराधाने भरलेली आहे तरीही त्यांचे परमेश्वर सर्वसमर्थ याहवेह यांनी इस्राएल व यहूदीयाचा त्याग केला नाही.


तुझी सर्व अमंगळ कृत्ये आणि तुझी वेश्यावृत्ती यामध्ये तुझे तारुण्यातील दिवस, जेव्हा तू नग्न व उघडी, तुझ्या रक्तात लोळत होती त्याची आठवण तुला राहिली नाही.


आता ती वेल वाळवंटात, कोरड्या व तहानेल्या भूमीवर लावली आहे.


जरी तो त्याच्या भावांमध्ये अत्यंत फलद्रूप होता, परंतु याहवेहकडून पूर्वेकडील वारा येईल, तो वाळवंटातून येईल; त्याचे झरे सुकून जातील आणि त्याची विहीर कोरडी पडेल. त्याच्या भांडारातील सर्व खजिना लुटला जाईल.


म्हणून मी आता तिची अश्लीलता तिच्या प्रियकरांसमोर उघडी करेन; माझ्या हातून तिला कोणीही वाचवू शकणार नाही.


तो पशू व जी दहा शिंगे तू पाहिली, ते वेश्येचा द्वेष करतात; ते तिच्यावर हल्ला करतील आणि तिला नग्न करून तिचे मांस खातील व तिला अग्नीने जाळून टाकतील.


त्याला अतिशय तहान लागली होती, तेव्हा त्याने याहवेहचा धावा केला, “तुम्ही आपल्या सेवकाला हा मोठा विजय दिला आहे. आता मी तहानेने मरावे काय आणि बेसुंती लोकांच्या हाती पडावे काय?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan