Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 2:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “तुम्ही आपल्या आईला रागवा, तिला रागवाच, कारण ती माझी पत्नी नाही, आणि मी तिचा पती नाही. ती आपल्या मुखावरून तिचे व्यभिचारी रूप आणि अविश्वासूपणा तिच्या स्तनांमधून दूर करो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “तुम्ही आपल्या आईची चांगली कानउघाडणी करा, तिचे कान चांगले उघडा; कारण ती माझी पत्नी नव्हे व मी तिचा पती नव्हे; ती आपले शिंदळचाळे आपल्या मुखावरून, व्यभिचाराचे प्रकार आपल्या स्तनांवरून दूर करो;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तुमच्या आईविरुध्द वाद घाला, वादच घाला, कारण ती माझी पत्नी नाही, आणि मी तीचा पती नाही. ती आपल्या वेश्यावृत्तीचे काम स्वत:पासून सोडून देवो आणि व्याभिचाराचे कामे तिच्या उरांपासून दूर होवो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 2:2
22 Iomraidhean Croise  

राष्ट्रांसाठी ते एक ध्वज उभा करतील आणि इस्राएलच्या बंदिवासात गेलेल्यांना एकत्र करतील; पृथ्वीच्या चारही कोपऱ्यातून यहूदीयाच्या विखुरलेल्या लोकांना ते एकत्र जमवतील.


याहवेह असे म्हणतात: “मी तुमच्या आईला घटस्फोट दिला, जो दाखला देऊन मी तिला पाठविले, तो कुठे आहे? मी तुम्हाला माझ्या कोणत्या कर्जदारांना विकून टाकले? तुमच्या पापांमुळेच तुम्ही विकले गेले आहात; आणि तुमच्या अपराधांमुळे तुमच्या आईला पाठविण्यात आले.


“उंच स्वरात गर्जना करा, रोखून ठेऊ नका. रणशिंगाच्या निनादाप्रमाणे तुमचा आवाज उंच करा. माझ्या लोकांची बंडखोरी आणि याकोबाच्या वंशजांना त्यांची पापे जाहीर करा.


आणि म्हण, अहो यहूदीयाच्या राजांनो, आणि यरुशलेमच्या लोकांनो, याहवेहचे वचन ऐका! सर्वसमर्थ याहवेह इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: या स्थानावर मी असे भयंकर अरिष्ट आणेन की त्याविषयी जे ऐकतील त्यांचे कान भणभणतील.


“जा आणि यरुशलेमच्या लोकांस याची घोषणा कर: “याहवेह असे म्हणतात: “ ‘मला आठवण आहे, मला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही एखाद्या नववधूप्रमाणे मजवर कशी प्रीती केली. आणि रानात व पेरणीरहित भूमीत देखील मला अनुसरला.


“जर एखाद्या पुरुषाने आपल्या स्त्रीला घटस्फोट दिला आणि त्या स्त्रीने दुसऱ्या पुरुषाशी लग्न केले, तर तिच्या पहिल्या पतीकडे तिच्याकडे परत जावे काय? असे करण्याने ही भूमी पूर्णपणे भ्रष्ट होणार नाही काय? परंतु तू एका वेश्येप्रमाणे अनेक प्रियकरांसह राहिलीस— तू माझ्याकडे आता परत येणार का?” असे याहवेह म्हणतात.


केवळ तुम्ही आपली पापे स्वीकार करा— तुमचे याहवेह परमेश्वर यांच्याविरुद्ध तुम्ही बंड केले आहे, इतर परकीय दैवतांची तुम्ही उपासना केली प्रत्येक विस्तृत वृक्षाखाली, माझे आज्ञापालन केले नाही,’ ” असे याहवेह म्हणतात.


त्या दिवसामध्ये यहूदीयाचे लोक इस्राएलच्या लोकांसोबत येतील, आणि ते लोक उत्तरेकडून एकत्र येईल. त्यांच्या पूर्वजांना मी कायमचे वतन म्हणून दिलेल्या देशात ते परत येतील.


“ ‘आणि ज्यांना माझ्यापासून जन्म दिला ते आपले पुत्र व कन्यांना तू मूर्तींना अन्न म्हणून अर्पण केले. तुझी वेश्यावृत्ती पुरेशी नव्हती काय?


प्रत्येक रस्त्याच्या कोपर्‍यावर तू आपली उच्च स्थाने बनविली आणि तिथून जात येत असलेल्या प्रत्येकासमोर आपले पाय पसरून वाढत्या व्यभिचाराने आपल्या सौंदर्याचा अवमान केला.


“तू त्यांचा न्याय करशील काय? हे मानवपुत्रा, तू त्यांचा न्याय करशील काय? तर त्यांच्या पूर्वजांच्या अमंगळ कृत्यांविषयी त्यांचा निषेध कर


तेव्हा जी स्त्री व्यभिचार करून निकामी झाली होती तिच्याविषयी म्हटले, ‘वेश्या म्हणून त्यांनी तिचा उपयोग करावा, कारण ती वेश्याच तर आहे.’


परंतु ज्या व्यभिचार करतात आणि रक्त सांडतात, त्या स्त्रियांना नीतिमान न्यायाधीश दंड देतील, कारण त्या व्यभिचारी आहेत आणि त्यांचे हात रक्ताने भरले आहेत.


जेव्हा याहवेहने प्रथम होशेयद्वारे बोलण्यास प्रारंभ केला, तेव्हा याहवेह त्याला म्हणाले, “जा आणि एखाद्या व्यभिचारी स्त्रीबरोबर विवाह कर आणि तिच्यापासून लेकरे जन्माला घाल. कारण हा देश एका व्यभिचारी पत्नीप्रमाणे याहवेहशी अविश्वासूपणाचा दोषी आहे.”


“तुमच्या बंधूंना, ‘माझे लोक’ आणि तुमच्या भगिनींना, ‘माझी प्रिय व्यक्ती.’ असे म्हणा.


कारण त्यांची आई अविश्वासू आहे आणि तिने लाजिरवाणी गोष्ट करून त्यांचे गर्भधारणा केली आहे. ती म्हणाली, ‘मी माझ्या प्रियकरांच्या मागे जाईन, जे मला माझे अन्न आणि माझे पाणी, माझी लोकर आणि माझे ताग, माझे जैतुनाचे तेल आणि माझे पेय देतात.’


तुम्ही दिवस व रात्र अडखळता, आणि संदेष्टेही तुमच्याबरोबर अडखळतात. म्हणून मी तुमच्या आईचा नाश करेन—


जे कुंपण तोडून मार्ग उघडणारे त्यांच्या पुढे जातील; ते द्वार तोडून त्यातून बाहेर जातील. त्यांचा राजा त्यांच्या पुढे जाईल, याहवेह त्यांचे पुढारी असतील.”


येथून पुढे ऐहिक दृष्टीने आम्ही कोणाकडे पाहत नाही. आम्ही ख्रिस्ताकडे त्यादृष्टीने पाहत होतो पण आता तसे पाहत नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan