Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गलतीकरांना 4:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 परंतु काळाची पूर्णता झाल्यावर परमेश्वराने आपल्या पुत्राला पाठविले; ते स्त्रीपासून जन्मलेले, नियमांच्या अधीन असे जन्मले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 परंतु काळाची पूर्णता झाली, तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले; तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 पण काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले; तो स्त्रीपासून जन्मास आला, नियमशास्त्राधीन असा जन्मास आला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले, तो स्त्रीपासून, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गलतीकरांना 4:4
44 Iomraidhean Croise  

तू आणि स्त्री, तुझी संतती आणि तिची संतती यामध्ये मी शत्रुत्व निर्माण करेन; तिचे संतान तुझे मस्तक चिरडेल आणि तू त्याची टाच फोडशील.”


यहूदाहपासून राजदंड कधीही वेगळा होणार नाही, किंवा अधिकाराची काठी त्याच्या पायामधून निघून जाणार नाही, ज्याचे जे आहे तो येईपर्यंत, राष्ट्रे त्याची आज्ञा पाळतील.


“माझ्याजवळ या व हे लक्षपूर्वक ऐका: “माझ्या पहिल्या घोषणेपासूनच मी गुप्तपणे बोललो नाही; ज्यावेळी ते घडेल, मी तिथे हजर आहे.” आणि आता सार्वभौम याहवेहने, त्यांच्या पवित्र आत्म्याची देणगी देऊन मला पाठविले आहे.


म्हणून प्रभू स्वतः तुम्हाला एक चिन्ह देतील: कुमारी गर्भवती होईल आणि ती एक पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील.


अगे विश्वासघातकी कन्ये, तू कुठवर भटकत राहणार? याहवेह पृथ्वीवर नवीन गोष्ट घडविणार आहेत— स्त्री पुरुषाकडे परत येईल.”


त्याला सांग की सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, ‘हा तो पुरुष आहे, ज्याचे नाव “शाखा” आहे, जो त्याच्या ठिकाणापासून शाखा काढेल आणि याहवेहचे मंदिर बांधेल.


“मी माझा संदेष्टा पाठवेन, जो माझ्यापुढे मार्ग तयार करेल. मग ज्यांची तुम्ही वाट पाहत आहात, ते प्रभू अकस्मात त्यांच्या मंदिरात येतील; ते कराराचे संदेशवाहक, ज्यांची तुम्ही फार आतुरतेने इच्छा करीत आहात ते येतील,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.


आणि तुमच्यासाठी प्रायश्चित व्हावे म्हणून एक बोकड पापार्पण म्हणून अर्पावा.


“कुमारी गर्भवती होईल आणि ती एक पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील” (इम्मानुएलचा अर्थ “परमेश्वर आम्हाबरोबर”).


येशू त्याला म्हणाले, “आता असेच होऊ दे, कारण सर्व नीतिमत्व अशाप्रकारे पूर्ण करणे आपल्याला योग्य आहे.” तेव्हा योहानाने त्यांचा बाप्तिस्मा केला.


“मी मोशेचे नियमशास्त्र व संदेष्ट्यांची भाकिते रद्द करण्यासाठी नाही, तर ती पूर्ण करण्यासाठी आलो आहे.


ते म्हणाले, “वेळ आली आहे,” व “परमेश्वराचे राज्य जवळ आले आहे. पश्चात्ताप करा आणि शुभवार्तेवर विश्वास ठेवा!”


तू गर्भधारण करून पुत्राला जन्म देशील आणि त्याचे नाव येशू ठेवावे.


यावर देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर उतरेल आणि सर्वोच्च परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. त्यामुळे जो पवित्र पुत्र तुला होणार आहे त्यांना परमेश्वराचा पुत्र म्हणतील.


आणि तिने आपल्या प्रथमपुत्राला जन्म दिला. तिने त्याला गोठ्यातील गव्हाणीत ठेवले, कारण तिथे त्यांच्यासाठी विश्रांतिगृह उपलब्ध नव्हते.


दावीदच ख्रिस्ताला ‘प्रभू’ म्हणतो तर तो त्याचा पुत्र कसा असू शकेल?”


शब्दाने मानवी शरीर धारण केले व आमच्यामध्ये त्यांनी वास्तव्य केले. आम्ही त्यांचे गौरव पाहिले, ते गौरव एकमेव पुत्राचे, जो पित्यापासून आला व अनुग्रह व सत्याने परिपूर्ण होता त्यांचे होते.


तर ज्याला पित्याने स्वतः वेगळे करून जगात पाठविले, तो जर म्हणतो की, ‘मी परमेश्वराचा पुत्र आहे,’ तर त्या विधानाला तुम्ही दुर्भाषण, असे कसे म्हणता?


कारण परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की, जो कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.


कारण माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्यांनी मला पाठविले आहे, त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी स्वर्गातून उतरलो आहे.


येशूंनी त्यांना म्हटले, “परमेश्वर तुमचा पिता असता, तर तुम्ही मजवर प्रीती केली असती, कारण मी परमेश्वरापासून आलो आहे. मी स्वतः होऊन आलो नाही; परमेश्वराने मला पाठविले आहे.


ते त्यांना म्हणाले, “पित्याने वेळ व तारीख आपल्या अधिकाराने निश्चित केली आहे आणि त्याबद्दल तुम्हाला जाणून घेण्याची गरज नाही.


त्यांच्या पुत्राविषयी, जे शारीरिक दृष्टीने दावीदाचे वंशज होते,


कारण मी तुम्हाला सांगतो की, ख्रिस्त परमेश्वराचे सत्य प्रस्थापित करण्याकरिता यहूदीयांचे सेवक झाले आहे, यासाठी की परमेश्वराने आपल्या पूर्वजांना दिलेली अभिवचने पूर्ण करावी,


आपण अगदी दुर्बल होतो तेव्हा ख्रिस्त योग्य वेळी, अधर्मी लोकांसाठी मरण पावले.


कारण आपल्या पापी स्वभावामुळे आपल्याला वाचविण्यास नियम असमर्थ होते, तेव्हा परमेश्वराने स्वतःच्या पुत्राला पापमय मनुष्यासारखे व पापबली म्हणून पाठविले व मानवी स्वभावात जे पाप राज्य करीत होते त्याला दोषी ठरविले.


पूर्वज हे त्यांचेच आहेत, त्यांच्याद्वारे ख्रिस्ताची, जे सर्वोच्च परमेश्वर आहेत, शारीरिक वंशावळी समजते. त्यांची सर्वकाळ स्तुती असो! आमेन.


ही योजना काळाच्या पूर्णतेची होती, यासाठी की स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्वगोष्टी ख्रिस्तामध्ये एकत्र व्हाव्या.


आपल्याविरुद्ध असलेले व आपल्याला आरोपी ठरविणारे विधिलेख, त्यांनी आम्हापासून दूर करून क्रूसावर खिळ्यांनी ठोकून कायमचे रद्द केले,


त्यांनी सर्वांसाठी स्वतःला खंडणी म्हणून दिले ही साक्ष नेमलेल्या काळी देणे होय.


सुभक्तीचे रहस्य निर्विवाद गंभीर आहे: परमेश्वर मानव शरीरात प्रकट झाले, आत्म्यात नीतिमान ठरले; देवदूतांच्या पाहण्यात आले, राष्ट्रांमध्ये गाजविले गेले, जगात त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात आला आणि गौरवात पुन्हा वर घेतले गेले.


आणि ज्याअर्थी लेकरे रक्तमांसाची आहेत, त्याअर्थी तेही रक्तमांसाचे भागीदार झाले; यासाठी की त्यांच्या मरणाद्वारे सैतानाकडे जे मृत्यूचे सामर्थ्य होते, ते त्याचे सामर्थ्य मोडून काढावे.


हे विधी केवळ अन्न व पाणी तसेच निरनिराळ्या प्रकारच्या शुद्ध करण्याच्या विधी याबाबत आहेत—बाह्य नियम नवा काळ येईपर्यंत लावून दिले आहेत.


आम्ही पाहिले आहे आणि अशी साक्ष देतो की, पित्याने त्यांच्या पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठविले आहे.


याप्रकारे तुम्ही परमेश्वराचा आत्मा ओळखू शकता: जो प्रत्येक आत्मा, येशू ख्रिस्त देह धारण करून आले होते हे स्वीकारतो, तो परमेश्वरापासून आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan