Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गलतीकरांना 2:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 नंतर चौदा वर्षानंतर मी पुन्हा यरुशलेम येथे गेलो, यावेळेस बर्णबास माझ्याबरोबर होता. मी तीतालाही आमच्याबरोबर घेतले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 नंतर चौदा वर्षांनी बर्णबाबरोबर मी पुन्हा यरुशलेमेस वर गेलो. मी आपल्याबरोबर तीतालाही घेतले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 नंतर, चौदा वर्षांनी मी पुन्हा, बर्णबाबरोबर, यरूशलेम शहरास वर गेलो, मी आपल्याबरोबर तीतालाही नेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 चौदा वर्षांनी बर्णबाबरोबर मी पुन्हा यरुशलेम येथे गेलो. मी माझ्याबरोबर तीतलाही घेतले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गलतीकरांना 2:1
20 Iomraidhean Croise  

त्यानंतर शौलाचा शोध घेण्यासाठी बर्णबा पुढे तार्ससला गेला,


त्याप्रमाणे त्यांनी केले, त्यांच्या देणग्या तेथील वडीलमंडळींना पाठविण्यासाठी त्यांनी शौल व बर्णबाच्या स्वाधीन केल्या.


जेव्हा बर्णबा आणि शौल यांनी यरुशलेममधील त्यांचे सेवाकार्य पूर्ण केले, तेव्हा योहान ज्याला मार्क असेही म्हणत त्याला त्यांच्याबरोबर घेऊन ते परत आले.


हे सर्वजण प्रभूची आराधना आणि उपास करीत असताना, पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, “बर्णबा व शौल यांना ज्या कामासाठी मी पाचारण केले आहे त्यासाठी त्यांना वेगळे करा.”


परंतु यहूदी पुढार्‍यांनी शहरातील उच्च वर्गातील धार्मिक स्त्रियांना व प्रमुख व्यक्तींना चिथविले. त्यांनी पौल व बर्णबा यांचा छळ करून त्यांना त्यांच्या प्रांतातून हाकलून दिले.


बर्णबाला त्याने झूस या नावाने व पौल हा मुख्य वक्ता असल्यामुळे त्याला हेर्मेस असे म्हटले.


तेव्हा आम्ही सर्वांनी ठरविले की आमचे प्रिय बंधू बर्णबा व पौल यांच्याबरोबर काही जणांना निवडून तुमच्याकडे पाठवावे.


फक्त मला आणि बर्णबाला स्वतःच्या उपजीविकेसाठी काम न करण्याचा अधिकार नाही काय?


परंतु माझा बंधू तीत, तिथे मला भेटला नाही, त्यामुळे माझ्या मनाला शांती नव्हती. म्हणून मी तेथील लोकांचा निरोप घेतला व तडक मासेदोनियाकडे गेलो.


जशी मला तुमच्याविषयी कळकळ आहे तशीच तीताच्या हृदयात परमेश्वराने उत्पन्न केली आहे, म्हणून मी परमेश्वराचे आभार मानतो.


तीत तुमच्यामध्ये माझा भागीदार व सहायक आहे आणि त्याच्याबरोबर जे बंधू आहेत, ते येथील मंडळ्यांचे प्रतिनिधी आणि ख्रिस्ताचे गौरव आहेत.


नंतर तीन वर्षानंतर केफाची ओळख करून घेण्यासाठी मी यरुशलेमला गेलो आणि पंधरा दिवस मी त्याच्याबरोबर राहिलो.


बाकीचे यहूदी त्याच्या ढोंगात त्याला सामील झाले, म्हणून त्यांच्या ढोंगीपणामुळे बर्णबासचीसुद्धा चुकीची कल्पना झाली.


माझ्याबरोबर असलेला तीतस ग्रीक होता, तरी त्याची सुंता झाली पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला नाही.


जेव्हा याकोब, केफा आणि योहान असे जे श्रेष्ठ आधारस्तंभ यांना समजले की मला कृपा प्राप्त झाली आहे, तेव्हा त्यांनी माझ्याशी व बर्णबाशी सहभागितेच्या उजव्या हातांनी हस्तांदोलन केले. त्यांनी हे मान्य केले की आम्ही गैरयहूदीयांकडे जावे आणि त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे.


माझ्याबरोबर येथे बंदिवान असलेला अरिस्तार्ख, तसेच बर्णबाचा नातेवाईक मार्कही तुम्हाला आपली शुभेच्छा पाठवितात. मी पूर्वी सूचना दिल्याप्रमाणे मार्क कधी तुमच्याकडे आला, तर त्याचे मनापासून स्वागत करा.


आमच्यासारखाच विश्वासात असलेला माझा खरा पुत्र तीत याला: परमेश्वर पिता आणि आपले तारणकर्ता ख्रिस्त येशू यांच्याकडून कृपा व शांती असो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan