Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गलतीकरांना 1:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 परंतु ज्या शुभवार्तेचा प्रचार आम्ही तुम्हाला केला, त्या व्यतिरिक्त जर आम्ही किंवा स्वर्गातून एखादा देवदूतसुद्धा प्रचार करीत असेल तर त्यांच्यावर परमेश्वराचा शाप येवो!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हांला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली, किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितली, तरी तो शापभ्रष्ट असो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तर जे शुभवर्तमान आम्ही तुम्हास सांगितले त्याच्याहून निराळे शुभवर्तमान जर आम्ही सांगितले किंवा स्वर्गातील आलेल्या देवदूतानेही सांगितले, तरी तो शापित असो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 परंतु जे आम्ही तुम्हांला सांगितले त्याच्याहून निराळे शुभवर्तमान आम्ही किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितले तरी तो शापित असो!

Faic an caibideil Dèan lethbhreac




गलतीकरांना 1:8
23 Iomraidhean Croise  

तो म्हणाला, “कनान शापित असो! तो आपल्या भावांच्या गुलामातील सर्वात कनिष्ठ गुलाम होवो.”


त्या वृद्ध संदेष्ट्याने उत्तर दिले, “जसा तू तसाच मीही संदेष्टा आहे, आणि याहवेहच्या वचनाने दूत मला म्हणाला: ‘त्याने भाकर खावी व पाणी प्यावे म्हणून त्याला परत तुझ्या घरी घेऊन ये.’ ” (परंतु तो त्याच्याशी खोटे बोलत होता.)


तेव्हा मी त्यांना धमकाविले, त्यांना शाप दिला. काही पुरुषांना मार दिला व त्यांचे केस उपटून परमेश्वराची शपथ घालून त्यांच्याकडून वचन घेतले व म्हटले, “इतःपर तुम्ही आपल्या कन्यांचा त्यांच्या पुत्रांशी वा त्यांच्या कन्यांचा आपल्या पुत्रांशी विवाह करून देणार नाही.


सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “हे संदेष्टे जे संदेश तुम्हाला सांगतात ते ऐकू नका; ते तुम्हाला खोट्या आशेने भरून टाकतात. ते त्यांच्या मनाचेच दृष्टान्त सांगतात, त्यांचे शब्द याहवेहच्या मुखातील नाहीत!


परंतु ‘परमेश्वराचा संदेश’ हा शब्दप्रयोग तुम्ही पुन्हा करू नये, कारण तुम्हा प्रत्येकाचे वचन तुमचा व्यक्तिगत संदेश होतो. म्हणून तुम्ही जिवंत परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह, आपले परमेश्वर यांच्या वचनाचा विपर्यास करता.


“नंतर तो त्याच्या डावीकडे असलेल्या लोकांना म्हणेल, ‘अहो शापग्रस्त लोकांनो, तुम्ही माझ्यापुढून निघून जा. सैतान आणि त्याच्या दूतांसाठी जो सार्वकालिक अग्नी तयार ठेवला आहे त्यात जा.


हे ऐकून पेत्र शाप देऊ लागला व शपथ घेऊन त्यांना म्हणू लागला, “ज्या माणसाविषयी तुम्ही बोलत आहात, त्या मनुष्याला मी ओळखत सुद्धा नाही.”


नंतर ते महायाजक व वडीलजनांकडे गेले आणि म्हणाले, “पौलाचा वध करेपर्यंत आम्ही अन्न सेवन करणार नाही, अशी कडक शपथ आम्ही घेतली आहे.


आता बंधूंनो व भगिनींनो, मी तुम्हाला आग्रहाने विनंती करतो की, जे शिक्षण तुम्हाला मिळाले आहे त्याविरुद्ध जे फूटी व अडथळे आणणारे आहेत, त्यांच्यावर लक्ष ठेवा; आणि त्यांच्यापासून दूर राहा.


मी माझ्या बंधूंसाठी जे शारीरिक रीतीने माझे स्वजातीय आहेत, त्यांच्यासाठी शापित होऊन ख्रिस्तापासून वेगळे होऊ शकलो असतो तर बरे झाले असते.


याच कारणासाठी तुम्हाला हे समजावे की परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने बोलणारा कोणीही “येशू शापित असो” असे म्हणणार नाही आणि कोणी मनुष्य पवित्र आत्म्याशिवाय, “येशू प्रभू आहे” असेही म्हणणार नाही.


जो कोणी प्रभूवर प्रीती करीत नाही, तो शापित असो. हे प्रभू या!


जसे आम्ही पूर्वी सांगितलेले आहे, म्हणून मी आता पुन्हा सांगतो: जर कोणी तुम्हाला तुम्ही स्वीकारलेल्या शुभवार्ते व्यतिरिक्त दुसरा प्रचार करीत आहेत, तर त्यांच्यावर परमेश्वराचा शाप असो!


जे नियमशास्त्रावर विसंबून आहेत ते सर्वजण शापाच्या बंधनाखाली आहेत. कारण पवित्रशास्त्र स्पष्ट म्हणते: “जो कोणी नियमशास्त्राच्या पुस्तकात जे सर्वकाही लिहिले आहे त्याप्रमाणे करीत नाही तो शापित आहे.”


ख्रिस्ताने आम्हासाठी शाप होऊन, नियमशास्त्राच्या शापापासून आम्हाला खंडणी देऊन सोडविले, कारण असे लिहिले आहे, “जो कोणी खांबावर टांगला आहे, तो शापित आहे.”


तुमच्यामध्ये कोणी तट पाडत असेल, तर त्याला पहिला व दुसरा इशारा दिला जावा, नंतर त्याच्याशी संबंध ठेवू नये.


तुमच्यावर आता शाप आला आहे: तुम्हाला आता माझ्या परमेश्वराच्या घरासाठी लाकडे तोडणारे आणि पाणी वाहणारे या सेवेतून कधीही सोडविले जाणार नाही.”


त्यांच्या नजरेत व्यभिचार भरला असून पाप केल्यावाचून त्यांना राहवत नाही. ते अस्थिर मनाच्या लोकांना मोह घालतात. त्यांची हृदये लोभात निर्ढावलेली असतात; ते शापग्रस्त लोक आहेत!


तर आता माझ्या धन्याने, राजाने आपल्या सेवकाचे म्हणणे ऐकावे. जर याहवेहने तुम्हाला माझ्याविरुद्ध चेताविले आहे, तर आपण अर्पण स्वीकारावे. परंतु जर लोकांनी हे केले आहे, तर ते याहवेहसमोर शापित केले जावोत! कारण मला आज याहवेहच्या वतनाचा वाटा मिळू नये म्हणून त्यांनी मला बाहेर घालवून म्हटले, ‘जा, इतर दैवतांची सेवा कर.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan