Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गलतीकरांना 1:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 प्रेषित पौल, ज्याला मनुष्यांनी नाही किंवा एका मनुष्याने पाठवले नाही, परंतु येशू ख्रिस्त आणि परमेश्वर पिता ज्यांनी येशूंना मरणातून उठविले त्यांच्याद्वारे पाठवण्यात आलेला, त्या माझ्याकडून

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1-2 गलतीयातील मंडळ्यांना : मनुष्यांकडून नव्हे, किंवा कोणा माणसाच्या द्वारेही नव्हे, तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यांतून उठवले तो देवपिता, ह्यांच्या द्वारे प्रेषित झालेला पौल, त्या माझ्याकडून व माझ्या-बरोबरच्या सर्व बंधूंकडून :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1-2 गलती प्रांतातील मंडळ्यांस; मनुष्यांकडून किंवा मनुष्यांच्याद्वारे नव्हे, तर येशू ख्रिस्ताच्याद्वारे आणि ज्याने त्यास मरण पावलेल्यातून उठवले तो देवपिता, ह्याच्याद्वारे झालेला प्रेषित पौल, याच्याकडून आणि माझ्या सोबतीचे सर्व बंधूकडून,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1-2 मनुष्याकडून नव्हे किंवा कोणा माणसाद्वारेही नव्हे, तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यांतून उठविले तो देवपिता, ह्यांच्याद्वारे प्रेषित झालेला पौल, त्या माझ्याकडून व माझ्याबरोबरच्या सर्व बंधूंकडून: गलतीया येथील ख्रिस्तमंडळीला

Faic an caibideil Dèan lethbhreac




गलतीकरांना 1:1
35 Iomraidhean Croise  

मी आणि माझे पिता एक आहोत.”


पुन्हा येशू म्हणाले, “तुम्हाला शांती असो! जसे पित्याने मला पाठविले तसे मीही तुम्हाला पाठवितो.”


येशूंनी त्यांना असे उत्तर दिले: “मी तुम्हाला निश्चित सांगतो, पुत्राला स्वतः होऊन काही करता येत नाही; तो पित्याला जे काही करताना पाहतो, तेच तो करतो, कारण जे काही पिता करतो, तेच पुत्रही करतो.


“मी विचारले, ‘प्रभू मी काय करावे?’ “प्रभू म्हणाले, ‘आता उठून उभा राहा आणि दिमिष्कमध्ये जा, जे काही तुला करावयाचे आहे, ते तुला तिथे सांगण्यात येईल.’


तुम्ही प्रत्यक्ष जीवनाच्या निर्माणकर्त्यालाच जिवे मारले, परंतु परमेश्वराने त्यांना मरणातून पुन्हा उठविले, याचे आम्ही साक्षी आहोत.


तर आता उठून उभा राहा आणि शहरामध्ये जा आणि जे काही तुला करणे अगत्याचे आहे ते तुला सांगण्यात येईल.”


मी पौल, ख्रिस्त येशूंचा दास, प्रेषित होण्यास पाचारलेला आणि परमेश्वराच्या शुभवार्तेसाठी वेगळा केलेला


“येशू प्रभू आहे,” असे तुम्ही मुखाने जाहीर कराल व परमेश्वराने त्यांना मेलेल्यातून उठविले असा तुमच्या अंतःकरणात विश्वास धराल, तर तुमचे तारण होईल.


ख्रिस्त याचसाठी मृत्यू पावले व पुन्हा जिवंत झाले की त्यांनी मेलेल्यांचा व जिवंतांचाही प्रभू असावे.


परमेश्वराच्या इच्छेने ख्रिस्त येशूंचा प्रेषित होण्यासाठी बोलविलेला पौल आणि बंधू सोस्थनेस यांच्याकडून,


परमेश्वराच्या इच्छेने, ख्रिस्त येशूंचा प्रेषित झालेला पौल आणि आपला बंधू तीमथ्य याजकडून, करिंथ येथील परमेश्वराची मंडळी आणि अखया प्रांतातील चहूकडील सर्व पवित्र लोकांस:


परंतु जेव्हा परमेश्वराने मला माझ्या मातेच्या उदरात असतानाच निवडले आणि त्यांच्या कृपेने मला बोलाविले, त्यांना हे योग्य वाटले की


माझ्या आधी जे प्रेषित होते त्यांना भेटण्यासाठी मी यरुशलेमपर्यंत गेलो नाही, परंतु मी अरबस्थानात गेलो. नंतर मी दिमिष्कास परत आलो.


मी जो प्रभूच्या लोकांमध्ये लहानात लहान, त्या मला गैरयहूदीयांना ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीच्या शुभवार्तेचा प्रचार करण्याची कृपा देण्यात आली.


ख्रिस्त येशूंमधील जीवनाच्या अभिवचनानुसार, परमेश्वराच्या इच्छेने ख्रिस्ताचा प्रेषित पौल याच्याकडून,


आणि आता त्यांच्या नियोजित वेळेनुसार प्रचाराद्वारे ते प्रकाशात आणले, जे आपल्या तारणार्‍या परमेश्वराच्या आज्ञेने मला सोपविण्यात आले.


आता ज्या शांतीच्या परमेश्वराने, सार्वकालिक कराराच्या रक्ताने, आपले प्रभू येशू, जे मेंढरांचे महान मेंढपाळ आहेत,


जेव्हा ते गिलआद येथे रऊबेन, गाद, आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडे गेले; आणि त्यांना म्हणाले:


त्यांच्याद्वारे तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता, ज्यांना परमेश्वराने मरणातून उठविले आणि त्यांचे गौरव केले, म्हणून तुमचा विश्वास आणि तुमची आशा परमेश्वरामध्ये आहे.


आणि जे विश्वसनीय साक्षीदार, मृतातील प्रथमफळ आणि पृथ्वीवरील राजांचे शासक आहेत त्या येशू ख्रिस्तापासून तुम्हास कृपा आणि शांती लाभो. त्यांना, जे आमच्यावर प्रीती करतात आणि ज्यांच्या रक्ताद्वारे आमची पापांपासून सुटका झाली आहे


“स्मुर्णा येथील मंडळीच्या देवदूताला लिही: जे पहिले व शेवटचे, जे मरण पावले होते व जिवंत झाले, ते असे म्हणतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan