एज्रा 4:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 पण जरूब्बाबेल, येशूआ व इतर यहूदी पुढार्यांनी उत्तर दिले, “तुम्हाला या कामात भाग घेता येणार नाही. पर्शियाचा राजा कोरेशच्या आज्ञेप्रमाणे याहवेह इस्राएलांच्या परमेश्वराचे मंदिर इस्राएली लोकांनीच बांधले पाहिजे.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 पण जरूब्बाबेल, येशूवा व इस्राएलाच्या पितृकुळांचे इतर प्रमुख त्यांना म्हणाले, “आमच्या देवासाठी मंदिर बांधण्याच्या बाबतीत आमच्याशी तुम्हांला काही कर्तव्य नाही; तर पारसाचा राजा कोरेश ह्याच्या आज्ञेप्रमाणे आम्हीच एकत्र होऊन इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचे मंदिर बांधणार.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 पण जरुब्बाबेल, येशूवा आणि त्यांच्या वडिलांच्या घराण्याचे प्रमुख त्यांना म्हणाले, “तुम्ही नव्हे तर इस्राएलचा देव परमेश्वर याचे मंदिर फक्त आम्हासच बांधायचे आहे. पारसाचा राजा कोरेश याची तशी आज्ञा आहे.” Faic an caibideil |
इस्राएली लोक यरुशलेमला परमेश्वराच्या भवनात आल्यानंतर दुसर्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली. शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल, योसादाकाचा पुत्र येशूआ व त्यांच्याबरोबर त्यांचे याजकबंधू व लेवीबंधू या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली बंदिवासाहून परत आलेले सर्वजण कामास लागले. वीस वर्षे वा अधिक वयाच्या लेव्यांना याहवेहच्या मंदिराची देखरेख करण्यासाठी नेमण्यात आले.