एज्रा 1:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “पर्शियाचा राजा कोरेश, असे जाहीर करतो की: “ ‘याहवेह, जे स्वर्गाचे परमेश्वर आहेत, त्यांनी पृथ्वीवरील सर्व राज्ये माझ्याकडे दिली आहेत आणि यहूदीयातील यरुशलेमात त्यांचे मंदिर बांधण्यास माझी नियुक्ती केली आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “पारसाचा राजा कोरेश असे म्हणतो, स्वर्गींचा देव परमेश्वर ह्याने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली असून अशी आज्ञा केली आहे की यहूदा प्रांतातील यरुशलेमेत माझ्याप्रीत्यर्थ एक मंदिर बांध; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “पारसाचा राजा कोरेश म्हणतो, स्वर्गातील परमेश्वर देवाने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली आहेत आणि यहूदातील यरूशलेमात त्याचे मंदिर बांधण्यासाठी त्याने मला निवडले आहे. Faic an caibideil |
नंतर त्यांनी गवंडी व सुतार मोलमजुरीने लावले व सोर आणि सीदोन येथील लोकांकडून गंधसरूचे ओंडके विकत घेतले आणि त्याबद्दल त्यांनी त्यांना धान्य, द्राक्षारस व जैतुनाचे तेल दिले. हे ओंडके लबानोन पर्वतावरून आणण्यात आले व भूमध्य समुद्राच्या किनार्याने जलमार्गाने त्यांना याफो येथे पोचते करण्यात आले. हे सर्व पर्शियाचा राजा कोरेशच्या परवानगीने करण्यात आले.
तुम्हाला लोकांमधून हाकलून देण्यात येईल आणि तुम्ही वन्यप्राण्यांबरोबर राहाल; तुम्ही बैलाप्रमाणे गवत खाल आणि आकाशाच्या दवाने भिजून जाल. सात कालखंड संपेपर्यंत तुम्ही या स्थितीत राहाल आणि मग तुमचा असा विश्वास असेल की सार्वभौम परमेश्वर हे पृथ्वीवरील सर्व राज्यांवर सर्वोच्च परमेश्वर आहेत आणि ते ज्याला इच्छितात त्याला ही राज्ये देतात.
त्याऐवजी तुम्ही स्वर्गाच्या प्रभूच्या विरोधात उभे राहिले. त्यांच्या मंदिरातील पात्रे तुम्ही आपल्याकडे आणली. आपण स्वतः आणि आपले अधिकारी, राण्या, उपपत्नीसह द्राक्षारस प्याले. चांदी आणि सोने, कास्य, लोखंड, लाकूड आणि दगड या दैवतांची, ज्यांना पाहता येत नाही की ऐकता येत नाही की समजत नाही, त्यांची स्तुती केली. पण ज्यांच्या हातात तुमचे जीवन आणि तुमचे संपूर्ण मार्ग आहे त्या परमेश्वराचा तुम्ही आदर केला नाही.