Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 8:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 मग फारोहने मोशे व अहरोन यांना बोलावून सांगितले, “याहवेहकडे प्रार्थना करा की त्यांनी माझ्यापासून व माझ्या लोकांपासून बेडूक दूर करावेत, मग मी तुझ्या लोकांनी याहवेहला यज्ञ करावा म्हणून त्यांना जाऊ देईन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मग फारोने मोशे व अहरोन ह्यांना बोलावून आणून म्हटले, “परमेश्वराला विनवणी करा की, माझ्यापासून आणि माझ्या प्रजेपासून त्याने हे बेडूक दूर करावेत, म्हणजे परमेश्वराप्रीत्यर्थ यज्ञ करण्यासाठी मी तुमच्या लोकांना जाऊ देईन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मग फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले. फारो त्यांना म्हणाला, “हे बेडूक माझ्यापासून, व माझ्या लोकांपासून दूर करण्याकरिता तुमच्या परमेश्वरास विनंती करा. मग तुमच्या परमेश्वराची उपासना करण्याकरिता मी तुम्हा लोकांस जाऊ देईन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 8:8
24 Iomraidhean Croise  

तेव्हा राजाने परमेश्वराच्या मनुष्याला म्हटले, “याहवेह तुझ्या परमेश्वराकडे माझ्यासाठी मध्यस्थी कर व माझा हात पूर्ववत व्हावा म्हणून प्रार्थना कर.” तेव्हा परमेश्वराच्या मनुष्याने याहवेहकडे मध्यस्थी केली आणि राजाचा हात बरा होऊन पूर्ववत झाला.


परमेश्वराला म्हणा, “तुमची कृत्ये किती अद्भुत आहेत! तुमच्या सामर्थ्यामुळे तुमचे शत्रू तुम्हाला दबकतात.


मग फारोहने मोशे व अहरोन यांना त्वरेने बोलावून घेतले आणि म्हटले, “मी तुमच्या याहवेह परमेश्वराविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.


परत एकदा माझ्या पापाची मला क्षमा करा आणि तुमच्या याहवेह परमेश्वराने ही पीडा माझ्यापासून दूर करावी म्हणून त्यांच्याकडे विनंती करा.”


मग मोशे फारोह पुढून निघून गेला व त्याने याहवेहकडे प्रार्थना केली;


जेव्हा इजिप्तच्या राजाला सांगितले गेले की ते लोक पळून गेले, फारोहने व त्याच्या अधिकार्‍यांनी त्यांच्याविषयी आपले मन बदलले व ते म्हणाले, “आपण हे काय केले? आपण इस्राएली लोकांना जाऊ दिले व त्यांची सेवा गमावली!”


पण याहवेह त्याचे परमेश्वर यांची कृपादृष्टी व्हावी म्हणून विनंती करत मोशे म्हणाला, “याहवेह, तुमचे लोक ज्यांना तुम्ही महान सामर्थ्याने आणि बलवान हाताने इजिप्तमधून बाहेर आणले, त्यांच्याविरुद्ध तुमचा राग का पेटावा?


यावर फारोह म्हणाला, “हा याहवेह कोण आहे, की मी त्याचे ऐकावे व इस्राएली लोकांना जाऊ द्यावे? मी याहवेहला ओळखत नाही. मी इस्राएलला जाऊ देणार नाही.”


पण सगळे व्यवस्थित झाले असे पाहून फारोहने आपले मन कठीण केले व याहवेहने सांगितल्याप्रमाणे मोशे व अहरोनाचे त्याने ऐकले नाही.


मोशे त्याला म्हणाला, “मी तुला सोडून गेल्याबरोबर याहवेहकडे तुझ्यासाठी विनंती करेन, आणि उद्या गोमाशा फारोहस व त्याच्या अधिकार्‍यांस व त्याच्या लोकास सोडून जातील. लोकांनी याहवेहला यज्ञ करण्यास जाऊ नये म्हणून फारोहने पुन्हा फसवणूक करू नये याची त्याने दक्षता घ्यावी.”


परंतु यावेळी सुद्धा फारोहने आपले हृदय कठीण केले आणि इस्राएली लोकांना जाऊ दिले नाही.


मोशे फारोहला म्हणाला, “हा सन्मान मी तुला देतो, की मी तुझ्यासाठी, तुझ्या अधिकार्‍यांसाठी व लोकांसाठी विनंती करावी अशी वेळ तू नेमून ठेवावी, म्हणजे तुमच्यातून बेडूक नाहीसे होतील, नाईल नदीतील बेडके मात्र राहतील.”


मग फारोहने मोशे व अहरोन यांना बोलावून घेतले, व तो त्यांना म्हणाला, “यावेळी मी पाप केले आहे, याहवेह न्यायी आहेत, परंतु मी व माझे लोक चुकलो.


याहवेहला विनंती करा, कारण मेघांचा हा गडगडाट व गारा आता असह्य झाले आहे. मी तुम्हाला जाऊ देईन व तुम्हाला इथे राहण्याची गरज नाही.”


मग मोशे फारोहपासून निघून शहराबाहेर गेला व त्याने आपले हात याहवेहकडे पसरले; मेघगर्जना व गारांचा वर्षाव थांबला व संपूर्ण देशावर पडणारा पाऊस बंद झाला.


लोक मोशेकडे आले व म्हणाले, “याहवेहविरुद्ध व तुझ्याविरुद्ध बोलून आम्ही पाप केले आहे. याहवेहने हे साप आमच्यापासून दूर घालवून द्यावे म्हणून प्रार्थना कर.” तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली.


तेव्हा शिमोन म्हणाला, “तुम्ही सांगितलेल्या या गोष्टी मजवर येऊ नयेत, यासाठी प्रभूला विनवणी करा.”


सर्व लोक शमुवेलला म्हणाले, “याहवेह तुमचे परमेश्वर यांच्याकडे तुमच्या सेवकांसाठी प्रार्थना करा म्हणजे आम्ही मरणार नाही, कारण राजाची मागणी करून आम्ही आमच्या इतर सर्व पापांमध्ये भर घातली आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan