Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 6:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 परमेश्वर मोशेला म्हणाले, मी याहवेह आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 देव मोशेशी बोलला; तो म्हणाला, “मी परमेश्वर आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मग देव मोशेला म्हणाला, “मी परमेश्वर आहे

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 6:2
19 Iomraidhean Croise  

त्यांनी त्याला सांगितले, “मी याहवेह आहे. मी ही भूमी कायमची वतन करून देण्यासाठी तुला खास्द्यांच्या ऊर या शहरातून येथे आणले आहे.”


“कारण त्याच रात्री मी संपूर्ण इजिप्त देशामधून संचार करेन व सर्व मनुष्यांचे व जनावरांचे प्रथमवत्स मारून टाकेन आणि त्यांच्या सर्व दैवतांवर न्याय आणेन; मी याहवेह आहे.


आणि जेव्हा फारोह, त्याचे रथ व त्याचे घोडेस्वार यांच्याकडून मला गौरव मिळेल, तेव्हा इजिप्तचे लोक जाणतील की मी याहवेह आहे.”


याहवेह योद्धा आहेत; याहवेह त्यांचे नाव आहे.


सर्व इस्राएलाचा समाज सीन रानातून निघून, याहवेहच्या आज्ञेनुसार एका ठिकाणाहून दुसरीकडे प्रवास करीत गेले. मग त्यांनी रफीदीम येथे तळ दिला, पण तिथे लोकांना प्यावयास पाणी नव्हते.


“ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून व दास्यातून बाहेर आणले, तो मीच याहवेह, तुमचा परमेश्वर आहे.


परमेश्वर मोशेला म्हणाले, “जो मी आहे तो मी आहे. इस्राएली लोकांना सांग: ‘मी आहे’ यांनी मला पाठवले आहे.”


परमेश्वर मोशेला आणखी म्हणाले, “इस्राएलास सांग, ‘अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोबाचा परमेश्वर या तुमच्या पूर्वजांचा परमेश्वर याहवेहने मला तुमच्याकडे पाठविले आहे.’ “हेच माझे सनातन नाव आहे, आणि सर्व पिढ्यांपर्यंत याच नावाने तुम्ही मला हाक मारणार.


याहवेह मोशेला म्हणाले, “मी याहवेह आहे. जा व मी तुला जे काही सांगतो ते इजिप्तचा राजा फारोह याला सांग.”


म्हणून इस्राएली लोकांना सांग, “मी याहवेह आहे आणि मी तुम्हाला इजिप्तच्या लोकांच्या ओझ्याखालून बाहेर आणेन, त्यांच्या कष्टप्रद गुलामगिरीतून मी तुम्हाला मुक्त करेन आणि माझ्या लांब केलेल्या बाहूने व न्यायाच्या महान कृत्यांनी तुमची सुटका करेन.


आणि जो देश अब्राहाम, इसहाक व याकोब यांना देण्यास मी हात उंच करून शपथ वाहिली, त्यात मी तुम्हाला आणेन आणि तो तुम्हाला वतन म्हणून देईन. मीच याहवेह आहे.”


“मीच याहवेह आहे; हेच माझे नाव आहे! मी माझे गौरव दुसर्‍या कोणालाही किंवा माझे गौरव मूर्तींना देणार नाही.


मी, केवळ मीच याहवेह आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणीही तारणकर्ता नाही.


मी याहवेह, तुमचा पवित्र परमेश्वर आहे, इस्राएलचा निर्माणकर्ता व तुमचा राजा आहे.”


“सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचा राजा व उद्धारक, याहवेह असे म्हणतात— मी आदि व अंत आहे. माझ्याशिवाय इतर कोणीही परमेश्वर नाही.


जो प्रौढी मिरवतो त्याने याविषयी प्रौढी मिरवावी मी याहवेह, जो कृपा करणारा पृथ्वीवर न्याय आणि नीती करणारा आहे, असे त्यांनी मला खरोखर समजावे, ह्यात मला संतोष आहे, असे याहवेहने म्हणतात.”


आणि त्यांना सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: इस्राएलची मी निवड केली, त्या दिवशी, मी शपथ घेतली व याकोबाच्या वंशजांकडे आपला हात उंच केला व मी स्वतः इजिप्तमध्ये त्यांना प्रकट झालो. उंचावलेल्या हाताने मी त्यांना म्हटले, “मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.”


“मी याहवेह बदलत नाहीत. म्हणून तुम्ही, याकोबाचे वंशज नष्ट झाला नाहीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan