Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 4:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 याहवेह त्याला म्हणाले, “मनुष्यांना मुख कोणी दिले? त्यांना बहिरा किंवा मुका कोण करतो? त्याला कोण दृष्टी देतो? किंवा कोण आंधळे करतो? तो मी याहवेह नाही का?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “मनुष्याचे तोंड कोणी केले आहे? मनुष्याला मुका, बहिरा, डोळस किंवा आंधळा कोण करतो? मी परमेश्वरच की नाही?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मग परमेश्वर त्यास म्हणाला, “मनुष्याचे तोंड कोणी केले? मनुष्यास मुका किंवा बहिरा, आंधळा किंवा डोळस कोण करतो? मी परमेश्वरच की नाही?

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 4:11
18 Iomraidhean Croise  

चला, आपण खाली जाऊ आणि त्यांच्या भाषेत वेगवेगळ्या भाषांची सरमिसळ करू, म्हणजे त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाही.”


याहवेहला कोणतीही गोष्ट असाध्य आहे काय? मी सांगितल्याप्रमाणे पुढील वर्षी निश्चित वेळेत परत येईल आणि साराहला एक पुत्र होईल.”


ते आंधळ्यास दृष्टी प्रदान करतात, याहवेह ओझ्याखाली वाकलेल्यास उचलून उभे करतात, परमेश्वराला नीतिमान प्रिय आहेत.


प्रभू, माझे ओठ उघडा, म्हणजे माझे मुख तुमची स्तुती करेल.


ज्यांनी कान जडले ते बहिरे आहेत काय? ज्यांनी डोळे घडविले त्यांना दृष्टी नाही काय?


पाहणारे डोळे व ऐकणारे कान— दोन्हीही याहवेहचीच निर्मिती आहे.


जे डोळे अंध आहेत, ते उघडणारे आणि बंदीशाळेत आहेत, त्यांना सोडविणारे अंधारात बसलेल्यांची सुटका करणारे असे करेन.


माझ्या ओठांना निखाऱ्याने स्पर्श करून तो म्हणाला, “हा निखारा तुझ्या ओठाला लागला आहे, म्हणून तुझ्यातील दोष आता नाहीसा झाला आहे. तुझ्या पातकांसाठी प्रायश्चित करण्यात आले आहे.”


मी म्हटले, “अहो सार्वभौम याहवेह, पाहा, मला तर बोलताही येत नाही; मी केवळ एक कोवळा तरुण आहे.”


तेव्हा याहवेहने माझ्या मुखाला त्यांच्या हातांनी स्पर्श केला आणि मला म्हटले, “माझे वचन मी तुझ्या मुखात टाकले आहे.


तो मनुष्य आला त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी, याहवेहचा हात माझ्यावर होता आणि याहवेहने सकाळी तो मनुष्य माझ्याकडे येण्यापूर्वी माझे तोंड उघडले. म्हणून माझे तोंड उघडलेले होते आणि मी आणखी शांत नव्हतो.


नगरात जेव्हा रणशिंगाचा आवाज येतो, तेव्हा लोक घाबरत नाही काय? शहरात विपत्ती आली तर, ती याहवेहने घडवून आणली नाही काय?


आंधळ्यांना दृष्टी मिळते, लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिर्‍यांना ऐकू येते, मेलेले जिवंत होतात आणि गरीब लोकांना शुभवार्ता सांगितली जाते.


आणि आता हे पूर्ण होईल त्या दिवसापर्यंत तू मुका होशील व तुला बोलता येणार नाही, कारण नेमलेल्या समयी माझे शब्द खरे होतील या माझ्या शब्दांवर तू विश्वास ठेवला नाही.”


तत्क्षणी जखर्‍याहचे तोंड उघडले व त्याची जीभ मोकळी झाली आणि तो बोलू लागला व परमेश्वराची स्तुती करू लागला.


तर इतर म्हणाले, “ही वचने ज्याला भूत लागलेले आहे त्या माणसाची नाहीत. भुताला आंधळ्यांचे डोळे उघडता येतील काय?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan