Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 32:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 मोशेला पर्वतावरून खाली येण्यास उशीर होत आहे असे लोकांनी पाहिले, तेव्हा ते अहरोना सभोवती गोळा झाले व म्हणाले, “ये, आमच्यापुढे जातील अशी दैवते आमच्यासाठी बनव. हा मनुष्य ज्याने आम्हाला इजिप्तच्या बाहेर आणले, त्या मोशेचे काय झाले हे आम्हाला माहीत नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मोशेला पर्वतावरून उतरण्यास विलंब लागला असे लोकांनी पाहिले तेव्हा ते अहरोनाभोवती जमून त्याला म्हणाले, “ऊठ, आमच्यापुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनव; कारण आम्हांला मिसर देशातून बाहेर आणणारा हा मनुष्य मोशे ह्याचे काय झाले हे आम्हांला कळत नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 मोशेला पर्वतावरून उतरण्यास बराच विलंब लागला आहे असे लोकांनी पाहिले तेव्हा सर्व लोक अहरोनाभोवती जमले व त्यास म्हणाले, “पाहा, मोशेने आम्हांला मिसर देशातून बाहेर आणले आहे. परंतु मोशेचे काय झाले ते आम्हांला कळत नाही, म्हणून आमच्यापुढे चालतील असे देव आमच्यासाठी तयार कर.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 32:1
35 Iomraidhean Croise  

तेव्हा लोट आपल्या जावयांकडे गेला, जे त्याच्या मुलींशी विवाह करण्यास वचनबद्ध होते. तो म्हणाला, “घाई करा आणि या ठिकाणातून बाहेर चला, कारण याहवेह या शहराचा नाश करणार आहेत!” पण त्याच्या जावयांना वाटले की, तो विनोद करीत आहे.


“हे तर मी पहिल्यांदाच ऐकत आहे,” अबीमेलेख राजाने उद्गार काढले, “आणि याला कोण जबाबदार आहे याची मला काहीच कल्पना नाही. हे तू मला आधी का सांगितले नाहीस?”


योसेफाने तिला नाकारले. तो तिला म्हणाला. “हे पाहा, मी कारभारी असताना माझे धनी या घरातील कोणत्याही गोष्टीची काळजी करीत नाही, त्यांच्या मालकीचे सर्वकाही त्यांनी माझ्या हाती सोपविले आहे.


योसेफाने विचारले, “तुम्ही हे काय केले? माझ्यासारखा मनुष्य शकुन पाहून या गोष्टी जाणून घेऊ शकतो हे तुम्हाला माहिती नव्हते का?”


पण ते शहराच्या बाहेर पडतात न पडतात तोच योसेफ त्याच्या कारभार्‍यास म्हणाला, “त्यांचा पाठलाग करा आणि त्यांना थांबवून विचारा, ‘तुम्ही चांगल्याची फेड वाईटाने का केली?


होरेब येथे त्यांनी एका वासराची मूर्ती घडविली, आणि त्या धातूच्या मूर्तीची आराधना केली.


दिवस व रात्र ते प्रवास करू शकतील, म्हणून दिवसा मेघस्तंभातून त्यांचे मार्गदर्शन करीत व रात्री अग्निस्तंभातून प्रकाश देत याहवेह त्यांच्या पुढे चालले.


ते मोशेला म्हणाले, “इजिप्त देशात कबरा नव्हत्या म्हणून तू आम्हाला या रानात मरायला आणले काय? इजिप्तमधून आम्हास बाहेर आणून तू हे काय केले?


इस्राएली लोक त्यांना म्हणाले, “इजिप्तमध्ये असतानाच याहवेहच्या हाताने आम्ही मेलो असतो तर किती बरे असते! तिथे आम्ही मांसाच्या भांड्याभोवती बसून हवे ते अन्न खाल्ले, पण तू हा सर्व समाज मरावा म्हणून आम्हाला या अरण्यात आणले आहे.”


माझ्या खेरीज इतर कोणतेही देव बनवू नका; तुमच्यासाठी चांदीच्या किंवा सोन्याच्या मूर्त्या बनवू नका.


मग याहवेह मोशेला म्हणाले, “तू पर्वतावर माझ्याकडे ये आणि येथेच राहा आणि लोकांसाठी सूचना म्हणून नियम आणि आज्ञा ज्या मी दगडी पाट्यांवर लिहिल्या आहेत त्या मी तुला देईन.”


मग मोशेने मेघांमधून पर्वतावर प्रवेश केला आणि तो तिथे चाळीस दिवस व चाळीस रात्री राहिला.


पण याहवेह त्याचे परमेश्वर यांची कृपादृष्टी व्हावी म्हणून विनंती करत मोशे म्हणाला, “याहवेह, तुमचे लोक ज्यांना तुम्ही महान सामर्थ्याने आणि बलवान हाताने इजिप्तमधून बाहेर आणले, त्यांच्याविरुद्ध तुमचा राग का पेटावा?


अहरोन म्हणाला, “माझ्या स्वामी, क्रोधित होऊ नको, तुला माहीत आहे की हे लोक कसे दुष्टतेकडे प्रवृत्त होतात.


ते मला म्हणाले, ‘आमच्यापुढे जातील अशी दैवते आमच्यासाठी बनव. हा मनुष्य ज्याने आम्हाला इजिप्तच्या बाहेर आणले, त्या मोशेचे काय झाले हे आम्हाला माहीत नाही.’


मग याहवेह मोशेला म्हणाले, “खाली जा, कारण तुझे लोक, ज्यांना तू इजिप्तमधून बाहेर आणलेस, ते भ्रष्ट झाले आहेत.


दूध व मध वाहत असलेल्या देशाकडे जा. परंतु मी तुमच्याबरोबर येणार नाही, कारण तुम्ही ताठ मानेचे लोक आहात आणि कदाचित वाटेत मी तुमचा नाश करेन.”


“ ‘परंतु त्यांनी माझ्याविरुद्ध बंड केले आणि माझा शब्द मानला नाही; ज्या घृणास्पद मूर्तींवर त्यांनी आपली नजर लावली होती, त्यांना त्यांनी टाकून दिले नाही, ना त्यांनी इजिप्तच्या मूर्तींचा त्याग केला. त्यामुळे मी म्हणालो मी त्यांच्यावर माझा क्रोध ओतेन आणि इजिप्तमध्ये मी त्यांच्यावर माझा कोप दाखवेन.


याहवेहने इजिप्तमधून इस्राएलला बाहेर काढण्यासाठी संदेष्ट्याच्या उपयोग केला, एका संदेष्ट्याच्या मार्फत त्याची काळजी घेतली.


मी तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर काढले आणि तुम्हाला गुलामगिरीतून देशातून मुक्त केले. मी मोशेला तुमचे नेतृत्व करण्यास पाठवले, अहरोन आणि मिर्यामलाही पाठवले.


ज्यांनी माझे वैभव आणि मी इजिप्तमध्ये व रानात केलेले चमत्कार पाहिले आहेत आणि तरीही माझा आज्ञाभंग केला व दहा वेळा माझी परीक्षा पाहिली;


पण एक गोष्ट नीट समजून घ्या की चोर रात्रीच्या कोणत्या घटकेला येणार ती घरधन्याला आधी समजली असती, तर त्याने पहारा ठेवला असता आणि आपले घर फोडू दिले नसते.


परंतु समजा तो दुष्ट दास आपल्या मनात म्हणेल, ‘माझा धनी येण्यास पुष्कळ विलंब होत आहे,’


“यास्तव जर आपण परमेश्वराची संतती आहोत, तर मग आपण असा विचार कधीही करू नये की परमेश्वर म्हणजे मानवाच्या कलाकृतीने व कौशल्याने, सोने किंवा चांदी या धातूपासून अथवा दगडापासून तयार केलेल्या प्रतिमेसारखा आहे.


तुम्ही पाहता व ऐकता की इफिसातच केवळ नव्हे तर बहुतेक सर्व आशिया देशातील बहुसंख्य लोकांची या पौलाने खात्री पटवली आहे व त्यांना चुकीची कल्पना करून दिली आहे. तो म्हणतो की मानवी हातांनी तयार केलेली दैवते मुळीच परमेश्वर नाहीत.


त्यांनी अहरोनाला सांगितले, ‘आमच्यापुढे जातील अशी दैवते आमच्यासाठी बनव—ज्याने आम्हाला इजिप्तच्या बाहेर आणले, त्या मोशेचे काय झाले हे आम्हाला माहीत नाही!’


याहवेह स्वतः तुझ्यापुढे चालतील आणि तुझ्याबरोबर राहतील; ते तुला कधीही सोडणार नाही किंवा त्यागणार नाहीत. भिऊ नकोस; निरुत्साही होऊ नकोस.”


हे इस्राएला, ऐक: तुम्ही आता यार्देन पार करून पलीकडे आत जाणार आहात आणि ज्यांच्या शहरांची तटबंदी आकाशापर्यंत आहेत, अशा तुमच्यापेक्षा महान आणि अधिक बलवान लोकांना हाकलून देणार आहात.


याहवेहने तुमच्याशी केलेल्या कराराच्या दगडी पाट्या स्वीकारण्यासाठी मी त्या पर्वतावर चढून गेलो होतो. तिथे मी चाळीस दिवस व चाळीस रात्री होतो; त्या काळात मी भाकर खाल्ली नाही आणि पाणीदेखील प्यालो नाही.


“तर ऊठ, लोकांना शुद्ध कर, त्यांना सांग, तुमच्यापैकी प्रत्येकाने उद्यासाठी स्वतःला शुद्ध करून घ्या, कारण याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: अहो इस्राएली लोकहो, तुमच्यामध्ये समर्पित केलेल्या वस्तू आहेत. त्या वस्तू काढून टाकेपर्यंत तुम्ही तुमच्या शत्रूपुढे उभे राहू शकणार नाही.


ते म्हणतील, “त्यांच्या येण्याचे दिलेले ‘येत आहे’ हे वचन आता कुठे आहे? आमचे पूर्वज मरण पावले, तरी सर्वकाही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan