Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 3:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 आणि आता इस्राएली लोकांचे रडणे माझ्यापर्यंत पोहोचले आहे आणि इजिप्तचे लोक त्यांच्यावर कसा अत्याचार करीत आहेत हे मी पाहिले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 पाहा, इस्राएलवंशजांचा आक्रोश माझ्यापर्यंत आला आहे; मिसरी लोक त्यांच्यावर कसा जाचजुलूम करीत आहेत हेही मी प्रत्यक्ष पाहिले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तर आता पाहा, मी इस्राएली लोकांचा आक्रोश ऐकला आहे आणि मिसरी ज्या जुलूमाने त्यांना जाचत आहेत तेही मी पाहिले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 3:9
22 Iomraidhean Croise  

याहवेहच्या दूताने तिला आणखी म्हटले, “आता तू गर्भवती आहेस आणि तुला एक पुत्र होईल. तू त्याचे नाव इश्माएल असे ठेव, कारण याहवेहने तुझे दुःख ऐकले आहे.


आणि त्यांनी मला सांगितले, ‘तुझी नजर वर कर आणि पाहा की, फळविणारे बोकड पट्टेदार, डाग असलेले व ठिपकेदार आहेत. कारण लाबानाने तुझ्याशी कसा व्यवहार केला हे सर्व मी पाहिले आहे.


तेव्हा यहोआहाजाने याहवेहकडे विनवणी केली आणि याहवेहने त्याचे ऐकले, कारण अरामचा राजा इस्राएलाचा अत्यंत क्रूरपणे छळ करीत होता हे त्यांनी पाहिले.


“परत जा आणि माझ्या लोकांचा अधिपती हिज्कीयाहला सांग, ‘तुझे पूर्वज दावीदाचे परमेश्वर, याहवेह असे म्हणतात: मी तुझी प्रार्थना ऐकली आणि तुझे अश्रू पाहिले आहेत; आजपासून तिसर्‍या दिवशी तू याहवेहच्या मंदिरात जाशील. मी तुझ्या आयुष्यात पंधरा वर्षांची भर घालेन.


“इजिप्तमध्ये आमच्या पूर्वजांच्या हालअपेष्टा तुम्ही पाहिल्या; तांबड्या समुद्राच्या जवळ त्यांनी केलेला तुमचा धावा तुम्ही ऐकला.


याहवेह म्हणतात, “कारण गरिबांना लुटले आहे व गरजवंत कण्हत आहेत. म्हणून मी आता उठेन आणि त्यांची िनंदा करणाऱ्यापासून त्यांना संरक्षण देईन.”


मग मी सीयोनकन्येच्या वेशींवर तुमची स्तुतीची घोषणा करेन, आणि तुमच्या तारणात आनंद करेन.


म्हणून त्यांनी इस्राएली लोकांवर गुलाम मुकादम ठेवले व त्यांच्याकडून जुलमाने फारोहसाठी पीथोम व रामसेस ही भंडारांची नगरे बांधून घेतली.


मग फारोहने आपल्या सर्व लोकांना हुकूम दिला, “इब्य्रांना होईल तो प्रत्येक मुलगा नाईल नदीत फेकून द्यावा, परंतु प्रत्येक मुलीला जिवंत राहू द्यावे.”


नंतर एक नवीन राजा इजिप्तच्या गादीवर आला, त्याच्या दृष्टीने योसेफ कोणीही नव्हता.


बराच काळ लोटल्यानंतर इजिप्तचा राजा मरण पावला. इस्राएली लोक क्लेशाने विव्हळत होते व आपल्या गुलामगिरीत रडून परमेश्वराचा धावा करीत होते; आणि त्यांच्या कष्टप्रद गुलामगिरीतील त्यांचा धावा परमेश्वराकडे पोहोचला.


परमेश्वराने इस्राएली लोकांना पाहिले आणि त्यांना त्यांची आस्था वाटली.


नंतर याहवेहने त्याला सांगितले, “इजिप्त देशातील माझ्या लोकांचे हाल मी बघितले आहे. त्यांच्या मुकादमांच्या त्रासामुळे त्यांचे रडणे मी ऐकले आहे आणि त्यांच्या दुःखाविषयी मला चिंता आहे.


मी पुन्हा पाहिले आणि मला सूर्याखाली होत असलेला जुलूम दिसला: पीडितांचे अश्रू मी पाहिले— आणि त्यांचे सांत्वन करणारा असा कोणी नाही. छळ करणार्‍यांच्या हाती अधिकार होते— आणि त्यांचे सांत्वन करणारे कोणी नव्हते.


आपल्या नगरात गरिबांवर अत्याचार होत असताना किंवा त्यांना न्याय आणि त्यांचे हक्क नाकारले जात असताना दिसल्यास त्याबद्दल आश्चर्य बाळगू नकोस; एक अधिकाऱ्याचे निरीक्षण करणारा वरिष्ठ अधिकारी आहे, आणि दोघांवर त्यांचा उच्चाधिकारी आहे.


शोमरोनच्या डोंगरावर राहणार्‍या बाशानच्या गाईंनो हे वचन ऐका, तुम्ही स्त्रिया, ज्या तुम्ही गरिबांवर अत्याचार करता आणि गरजवंतांना चिरडता आणि आपल्या नवर्‍यांना म्हणता, “आम्हाला काही पेय आणा!”


तेव्हा आम्ही याहवेहचा, आमच्या पूर्वजांच्या परमेश्वराचा धावा केला आणि याहवेहने आमचे गार्‍हाणे ऐकले, आमच्या अडचणी जाणल्या आणि आमच्यावर होत असलेला जुलूम व अत्याचार त्यांनी पाहिला.


“याच वेळेस उद्या मी तुझ्याकडे बिन्यामीनच्या प्रदेशातील एक मनुष्य पाठवेन. माझ्या इस्राएल लोकांवर शासनकर्ता म्हणून त्याचा अभिषेक कर; तो माझ्या लोकांना पलिष्ट्यांच्या हातून सोडवेल. मी माझ्या लोकांकडे पाहिले आहे, कारण त्यांचा आकांत माझ्यापर्यंत पोहोचला आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan