Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 3:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 पण मोशे परमेश्वराला म्हणाला, “मी कोण आहे की मी फारोहकडे जावे आणि इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणावे?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तेव्हा मोशे देवाला म्हणाला, “फारोकडे जाऊन इस्राएलवंशजांना मिसरातून काढून आणणारा असा मी कोण?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 परंतु मोशे देवाला म्हणाला, “फारोकडे जाऊन इस्राएली लोकांस मिसर देशामधून काढून आणणारा असा मी कोण आहे?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 3:11
13 Iomraidhean Croise  

नंतर दावीद राजा आत जाऊन याहवेहसमोर बसला आणि म्हणाले: “हे सार्वभौम याहवेह, मी कोण आहे आणि माझे कुटुंब काय आहे की तुम्ही मला येथवर आणावे?


“तर आता हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, माझे पिता दावीदाच्या जागी आपण मला राजा केले आहे. परंतु मी एक लहान बालक आहे आणि माझ्या जबाबदाऱ्या मी कशा पार पाडाव्या हे मला कळत नाही.


म्हणून आपल्या लोकांवर राज्य करण्यासाठी आणि बरे आणि वाईटाची पारख करण्यासाठी आपण आपल्या सेवकाला विवेकी हृदय द्यावे. कारण आपल्या या मोठ्या प्रजेवर कोण राज्य करू शकेल?”


“परंतु मी कोण, माझी शक्ती आणि माझे लोक कोण, जे तुम्हाला इतक्या उदारतेने दान देऊ शकतील? आमच्याजवळचे सर्वकाही तुमच्याकडूनच मिळालेले आहे आणि तेच आम्ही तुम्हाला देत आहोत.


परंतु मोशे याहवेहला म्हणाला, “मी बोबड्या ओठांचा आहे म्हणून जर इस्राएल लोकच माझे ऐकत नाहीत, तर फारोह माझे का ऐकेल?”


मी म्हटले, “अहो सार्वभौम याहवेह, पाहा, मला तर बोलताही येत नाही; मी केवळ एक कोवळा तरुण आहे.”


एकाला आम्ही असा सुगंध आहोत की ज्यामुळे मरण येते व दुसर्‍याला असा सुगंध आहोत की ज्यामुळे जीवन मिळेल. आणि अशा कामासाठी कोण योग्य आहे?


आम्ही आमच्यामध्ये कार्यक्षम आहोत असे नाही किंवा आम्ही काही दावा करू शकतो असे आम्हाला वाटत नाही; कारण आमची कार्यक्षमता परमेश्वरापासून आहे.


गिदोनाने उत्तर दिले, “महाराज, मला माफ करा, मी इस्राएली लोकांना कसा काय सोडविणार? माझे कुटुंब संपूर्ण मनश्शेह गोत्रातील अत्यंत दुर्बल असे कुटुंब आहे आणि माझ्या पूर्ण कुटुंबात मला अत्यंत कनिष्ठ समजले जाते.”


परंतु दावीद शौलाला म्हणाला, “राजाचा जावई व्हावे असा मी कोण आहे, माझे कुटुंब काय आहे किंवा इस्राएलातील माझे कूळ काय आहे?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan