Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 26:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 “निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या तागाच्या व रेशमी तागाच्या दहा पडद्यांनी निवासमंडप तयार करावा, त्यावर कुशल कारागिरांकडून करूब विणून घ्यावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 निवासमंडप दहा पडद्यांचा कर. ते कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या सुताचे तयार करावेत व त्यांवर कुशल कारागिरांकडून करूब काढवावेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 निवासमंडप दहा पडद्यांचा कर. ते कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुतापासून तयार करावेत. व त्यावर कुशल कारागिराकडून करुब काढावेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 26:1
29 Iomraidhean Croise  

राजाने नाथान संदेष्ट्याला म्हटले, “पाहा, मी येथे गंधसरूच्या भवनात राहतो आणि परमेश्वराचा कोश एका तंबूत आहे!”


मंदिराच्या आतील व बाहेरील खोल्यांच्या भिंतीवर सभोवार करूब, खजुरीची झाडे व उमललेली फुले कोरली होती.


जेव्हा दावीद आपल्या राजवाड्यात राहत असताना, त्याने नाथान संदेष्ट्यास म्हटले, “पाहा, येथे मी गंधसरूच्या भवनात राहतो, परंतु याहवेहच्या कराराचा कोश एका तंबूत आहे!”


मोशेने रानात याहवेहसाठी केलेला सभामंडप आणि होमबलीची वेदी या दोन्ही गिबोनच्या टेकडीवर होती.


मग झाकणाच्या टोकांना घडवून घेतलेल्या सोन्याचे दोन करूब करून ठेवावेत.


निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत आणि रेशमी ताग, बोकडाचे केस;


“मग मी त्यांच्यामध्ये वस्ती करावी, म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्रस्थान बनवावे.


सर्व पडद्यांची लांबी अठ्ठावीस हात व रुंदी चार हात असावी.


“निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या कातलेल्या रेशमी तागाचा पडदा करून त्यावर कुशल कारागिरांकडून करूब विणून घ्यावेत.


“निवासमंडपाच्या प्रवेशद्वारासाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या रेशमी तागाचा नक्षीदार पडदा बनवावा.


“जसे सभामंडप, कराराच्या नियमाचा कोश व त्यावरील प्रायश्चिताचे झाकण, आणि तंबूचे इतर सर्व साहित्य:


“निवासमंडप, त्याचा तंबू आणि त्याचे आच्छादन, आकडे, फळ्या, अडसर, खांब व बैठका;


याहवेहने त्यांना सर्वप्रकारचे कोरीव काम, कारागिरीचे काम, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सुती व रेशमी तागावर भरतकाम, विणकाम; अशा सर्वप्रकारच्या विणकरांना कारागिरीचे—कौशल्याचे—काम करण्याच्या दानांनी भरले आहे.


निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत आणि रेशमी ताग; बोकडाचे केस;


मग त्यांनी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या तागाच्या व रेशमी तागाचे पडदे बनविले व त्यावर कुशल कारागिरांकडून करूब विणून घेतले.


त्यांनी सोने ठोकून त्याचे पातळ पत्रे बनविले आणि निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाच्या धाग्यात आणि रेशमी ताग कातून—कुशल कारागिराच्या हातांनी बनविले.


“पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी निवासमंडप, सभामंडप उभा करावा.


सभामंडपात गेर्षोनी लोकांची जबाबदारी ही होती की, त्यांनी निवासमंडप व तंबू, त्याचे आच्छादन, सभामंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा,


त्यांनी निवासमंडपाचे पडदे, सभामंडप व त्याचे आच्छादन व त्याचे टिकाऊ चर्माचे बाहेरील आच्छादन, सभामंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा वाहून न्यावा.


शब्दाने मानवी शरीर धारण केले व आमच्यामध्ये त्यांनी वास्तव्य केले. आम्ही त्यांचे गौरव पाहिले, ते गौरव एकमेव पुत्राचे, जो पित्यापासून आला व अनुग्रह व सत्याने परिपूर्ण होता त्यांचे होते.


परंतु मंदिर म्हणजे स्वतःच्या शरीरा संदर्भात ते बोलत होते.


प्रभूने उभारलेला खरा मंडप जो केवळ मानवाद्वारे बांधलेला नाही, त्या मंदिरात ते सेवा करीत आहेत.


एक मंडप तयार केला होता. त्याच्या पहिल्या खोलीत सोन्याचा दीपवृक्ष, एक मेज व त्या मेजावर समर्पित भाकरी होत्या; या भागाला पवित्रस्थान म्हणत.


हे वर्तमान काळासाठी उदाहरण आहे, तिथे अर्पण केलेली दाने व अर्पणे उपासकाची विवेकबुद्धी शुद्ध करीत नाही.


तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र परिधान करावयास दिले आहे,” ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र लोकांची नीतिकृत्ये आहेत.


राजासनावरून मला एक मोठी वाणी ऐकू आली. ती म्हणाली, “पाहा! परमेश्वराचे वसतिस्थान आता मनुष्यांबरोबर आहे; ते स्वतः त्यांच्याबरोबर राहतील; ते त्यांचे लोक होतील; आणि ते त्यांचे परमेश्वर होतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan