Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 22:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 पण ते जर सूर्योदय झाल्यावर घडले, तर मारणारा रक्तदोषी ठरेल. “ज्याने चोरी केली त्याने खचितच भरपाई करून द्यावी, पण त्याच्याकडे काहीही नसले, तर त्याला चोरीची भरपाई म्हणून विकून टाकावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 पण तो चोरी करत असता सूर्योदय झाला, तर मारणार्‍यावर खुनाचा दोष येईल. चोराने नुकसान अवश्य भरून द्यावे; तो कंगाल असला तर चोरीच्या भरपाईसाठी त्याची विक्री करावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 परंतु तो चोरी करत असता सूर्योदय झाला तर मरणाऱ्यावर खुनाचा दोष येईल. चोराने नुकसान अवश्य भरून द्यावे. त्याच्याजवळ काही नसेल तर चोरीच्या भरपाईसाठी त्याची विक्री करावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 22:3
9 Iomraidhean Croise  

त्या मनुष्याने उत्तर दिले, “ठीक आहे, तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे होईल; परंतु ज्याच्याजवळ तो प्याला सापडेल तोच माझ्या धन्याचा गुलाम होईल; बाकीचे दोषापासून मुक्त होतील.”


“तुम्ही जर एखादा इब्री गुलाम विकत घेतला, तर त्याने तुमची सहा वर्षे सेवा करावी. परंतु सातव्या वर्षी तो काहीही भरपाई न घेता स्वतंत्र होईल.


तर ज्याने तो खड्डा उघडला त्याने जनावराच्या मालकाला त्याची किंमत मोजून द्यावी व त्याबदल्यात ते मेलेले जनावर घ्यावे.


“एखादा चोर घरफोडी करताना सापडला व त्याला मारत असताना तो मेला, तर मारणारा रक्तदोषी राहणार नाही.


यरुशलेम बरोबर कोमलपणे बोला, आणि तिला असे घोषित करा की, तिची कठोर सेवा पूर्ण झाली आहे, तिच्या पापाची परतफेड झाली आहे, याहवेहच्या हातातून तिला तिच्या सर्व पापांसाठी दुप्पट मिळाले आहे.


याहवेह असे म्हणतात: “मी तुमच्या आईला घटस्फोट दिला, जो दाखला देऊन मी तिला पाठविले, तो कुठे आहे? मी तुम्हाला माझ्या कोणत्या कर्जदारांना विकून टाकले? तुमच्या पापांमुळेच तुम्ही विकले गेले आहात; आणि तुमच्या अपराधांमुळे तुमच्या आईला पाठविण्यात आले.


त्या नोकराला हे कर्ज फेडणे अशक्य होते, म्हणून प्रभूने कर्जदार, त्याची पत्नी, त्याची मुले, आणि त्याचे जे सगळे होते ते विकून कर्ज वसूल करण्याची आज्ञा दिली.


यास्तव याहवेहचा राग इस्राएलवर भडकला. त्यांनी त्यांना पलिष्टी आणि अम्मोनी लोकांच्या हाती विकले.


याहवेहचा राग इस्राएलावर भडकला, त्यांनी त्यांना लुटारूंच्या हाती दिले, ज्यांनी त्यांना लुटले. ज्यांचा ते सामना करू शकत नव्हते अशा त्यांच्या सभोवतालच्या सर्व शत्रूच्या हाती विकले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan