Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 21:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 तर त्याच्या मालकाने त्याला न्यायाधीशांसमोर आणावे. मग त्याने त्याला दरवाजाकडे किंवा दरवाजाच्या चौकटीजवळ आणावे व आरीने त्याचा कान टोचावा. यानंतर तो त्याचा जीवनभर गुलाम म्हणून राहील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तर त्याच्या धन्याने त्याला देवासमोर1 आणून दाराजवळ किंवा दाराच्या चौकटीजवळ उभे करावे व आरीने त्याचा कान टोचावा म्हणजे तो आयुष्यभर त्याची चाकरी करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तर त्याच्या मालकाने त्यास देवासमोर अथवा त्यास दाराच्या चौकटीजवळ उभे करावे व अरीने त्याचा कान टोचावा. मग तो त्याची आयुष्यभर चाकरी करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 21:6
24 Iomraidhean Croise  

तर आरी घेऊन, त्याचा कान दरवाजावर धरून, तो आरपार टोचावा. मग तो तुमचा कायमचाच दास होईल. तुमच्या दासीचेही असेच करावे.


तर रोजदारीवर ठेवलेल्या नोकराप्रमाणे किंवा तुमच्या आश्रिताप्रमाणे तुम्ही त्याला वागणूक द्यावी आणि योबेल वर्षापर्यंत तो तुमची सेवा करेल.


दावीद म्हणाला, “तर आपला दास काय करू शकतो, हे आपण पाहाल.” आखीशने उत्तर दिले, “फार चांगले, मी तुला आयुष्यभर माझा अंगरक्षक करेन.”


तिच्यामध्ये असलेले तिचे अधिकारी गर्जना करणार्‍या सिंहासारखे आहेत; तिचे शासनकर्ते निशाचर लांडगे आहेत ते सकाळपर्यंत काहीही शिल्लक राहू देत नाहीत.


त्यांनी उत्तर दिले, “आज जर तुम्ही त्यांचा सेवक होऊन त्यांची सेवा केली व त्यांना अनुकूल उत्तर दिले, तर ते नेहमीच तुमचे सेवक म्हणून राहतील.”


आखीशने दावीदावर भरवसा ठेवला आणि स्वतःशीच म्हणाला, “तो आपल्या इस्राएली लोकांच्या दृष्टीत इतका घृणास्पद झाला आहे की, तो आयुष्यभर माझा सेवक म्हणून राहील.”


तेव्हा हन्नाह गेली नाही. ती तिच्या पतीला म्हणाली, “मुलाचे दूध तोडल्यानंतर, मी त्याला घेऊन जाईन आणि त्याला याहवेहसमोर सादर करेन आणि तो सदैव तिथेच राहील.”


याहवेह तुमचे परमेश्वर जी सर्व शहरे तुमच्या प्रत्येक गोत्राला देणार आहेत, त्या सर्व शहरांमध्ये न्यायाधीश आणि शास्ते यांची तुम्ही नेमणूक करावी व त्यांनी लोकांचा न्याय नीतीने करावा.


आणि त्यावेळी मी तुमच्या न्यायाधीशांना आज्ञा केली, “तुमच्या लोकांचा वाद ऐकून त्यावर न्याय करावा, मग तो दोन इस्राएली लोकांमधील असो किंवा इस्राएली आणि तुमच्यामध्ये राहणारे परदेशी यांच्यातील असो.


“ ‘तुम्ही जमीन कायमचीच विकू नये. कारण जमीन माझी आहे आणि तुम्ही माझ्या भूमीवर परदेशी आणि परके म्हणून राहत आहात.


“तुम्ही परमेश्वराची निंदा करू नये किंवा तुमच्या लोकांच्या पुढार्‍यांपैकी कोणाला शाप देऊ नये.


“कोणी मारामारी करीत असताना एखाद्या गरोदर स्त्रीला धक्का लागला व त्यामुळे तिचा गर्भपात झाला, पण तिला गंभीर इजा झाली नाही, तर तिचा पती मागेल व न्यायाधीश मान्य करेल तितकी रक्कम अपराध्याने द्यावी.


“कारण त्याच रात्री मी संपूर्ण इजिप्त देशामधून संचार करेन व सर्व मनुष्यांचे व जनावरांचे प्रथमवत्स मारून टाकेन आणि त्यांच्या सर्व दैवतांवर न्याय आणेन; मी याहवेह आहे.


मी तुमच्या पुढाऱ्यांना परत पूर्वस्थितीत आणेन, तुमचे राज्यकर्त्ये सुरुवातीला होते तसेच त्यांना परत करेन. त्यानंतर तुम्हाला, धार्मिकतेचे शहर, विश्वासू शहर असे म्हटले जाईल.”


“पण जर तो गुलाम जाहीर करतो की, मी माझ्या मालकावर, माझ्या पत्नीवर व माझ्या लेकरांवर प्रीती करतो आणि तुम्हाला सोडून जाण्याची माझी इच्छा नाही,


“एखाद्या मनुष्याने आपली मुलगी गुलाम म्हणून विकली, तर पुरुष केले जातात त्याप्रमाणे ती स्वतंत्र केली जाणार नाही.


परंतु तुमच्या दासाची तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रीती असेल आणि त्याला तुमच्या घरी राहण्यात आनंद वाटत असेल आणि तो तुम्हाला म्हणेल की “तुम्हाला सोडून जाण्याची माझी इच्छा नाही,”


परमेश्वराने महासभेत आपले स्थान ग्रहण केले आहे; त्यांनी “दैवतांसमोर” आपला न्याय जाहीर केला आहे:


Lean sinn:

Sanasan


Sanasan