Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 21:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 “तू त्यांच्यासमोर मांडावयाचे नियम हे आहेत:

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 आता जे नियम तू त्यांना लावून द्यावेत ते हेच :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 आता जे इतर नियम तू इस्राएल लोकांस लावून द्यावेत ते हेच:

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 21:1
27 Iomraidhean Croise  

“तू बांधत असलेले हे जे मंदिर आहे त्याबाबत, जर तू माझ्या विधींचे अनुसरण केले, माझे नियम पाळले व माझ्या आज्ञा मानून त्यांचे पालन केले तर, तुझा पिता दावीदाला दिलेल्या अभिवचनांची मी तुझ्याद्वारे पूर्तता करेन.


शहरात राहणाऱ्या तुमच्या लोकांकडून तुमच्यासमोर येणार्‍या प्रत्येक बाबतीत—मग तो रक्तपात असो किंवा कायद्याच्या संबंधात, आज्ञा, हुकूम किंवा नियम—तुम्ही याहवेहविरुद्ध पाप करू नका अशी ताकीद तुम्ही त्यांना द्यावी; नाहीतर त्यांचा राग तुमच्यावर आणि तुमच्या लोकांवर येईल. हे असे करा म्हणजे तुम्ही पातक करणार नाही.


त्यांच्या सहकारी इस्राएली म्हणजे सरदारांसोबत एकत्र आले व त्यांनी परमेश्वराचा सेवक मोशेद्वारे मिळालेले परमेश्वराचे नियम अनुसरण्याची व याहवेह आमच्या प्रभूच्या आज्ञा, आदेश व कायदे काळजीपूर्वकरित्या पाळण्याची शपथ घेतली आणि पाळल्या नाहीत तर परमेश्वराचा श्राप स्वतःवर बंधनकारक केला.


त्यांनी आपले वचन याकोबाला विदित केलेले आहेत आणि विधी व नियम इस्राएलला स्पष्ट केले आहेत.


तेव्हा मोशेने इस्राएली पुढार्‍यांना बोलावून ज्यागोष्टी याहवेहने सांगाव्या म्हणून आज्ञापिल्या होत्या, त्या त्यांना सांगितल्या.


त्यांना मी माझे विधी दिले आणि त्यांना माझे नियम कळविले, ज्यामुळे जे लोक त्याचे पालन करतील ते जगतील.


म्हणून मी त्यांना इतर जे चांगले नाहीत असे कायदे दिले आणि असे नियम ज्यामुळे ते जगणार नाहीत;


म्हणून तुम्ही माझे नियम व विधी पाळा आणि वर उल्लेख केलेल्या कोणत्याही ओंगळ गोष्टी करू नका. हे नियम इस्राएली लोकांना व तुमच्यात राहत असलेल्या विदेशी लोकांनाही लागू आहेत,


तुम्ही माझ्या आज्ञा आणि नियमांचे पालन करा, कारण जो व्यक्ती त्यांचे पालन करतो, तो त्यामुळे जिवंत राहील. मी याहवेह आहे.


“ ‘माझे सर्व विधी आणि माझे सर्व नियम याकडे तुम्ही लक्ष द्यावे आणि त्यांचे पालन करावे. मी याहवेह आहे.’ ”


“ ‘तुम्ही माझे विधी व नियम पाळले तर मी वस्ती करून राहण्यासाठी ज्या देशात तुम्हाला नेत आहे, ती भूमी तुम्हाला बाहेर ओकून देणार नाही.


“होरेब पर्वतावर माझा सेवक मोशेमार्फत सर्व इस्राएली लोकांसाठी मी जे नियमशास्त्र दिले त्याची आठवण ठेवा.


म्हणून मंडळीने या नियमानुसार आरोपी आणि रक्ताचा सूड घेणारा यांच्यात न्याय करावा.


मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देनकडे मोशेद्वारे याहवेहने इस्राएली लोकांसाठी ज्या आज्ञा व नियम लावून दिले ते हेच आहेत.


आणि मी तुम्हाला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांना सर्वकाही पाळावयास शिकवा आणि मी सदैव, युगाच्या अंतापर्यंत तुमच्याबरोबर आहे.”


जर तुमच्यापैकी कोणी—इब्री पुरुष किंवा इब्री स्त्री—दास म्हणून स्वतःला विकले आणि सहा वर्षे त्यांनी तुमची सेवा केल्यानंतर सातव्या वर्षी त्यांना मुक्त करावे.


आणि त्यावेळी याहवेहने मला आज्ञा केली की तुम्ही यार्देन ओलांडून जो देश ताब्यात घेणार आहात तिथे तुम्हाला जे विधी व नियम पाळायचे आहेत ते शिकवावे.


ज्यावेळी इस्राएली लोकांनी इजिप्त देश सोडला, त्यांना मोशेने या अटी, विधी व नियम दिले


पाहा, मी तुम्हाला याहवेह माझ्या परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे दिलेले विधी व नियम यासाठी शिकविले की जो देश तुम्ही ताब्यात घेणार आहात, त्या देशात तुमचा प्रवेश होईल, त्यावेळी ते तुम्ही पाळावे.


आणि एवढे महान राष्ट्र कोणते आहे, ज्याचे विधी आणि नियम या नियमशास्त्रासारखे न्याय्य आहेत, जे मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे?


मोशेने सर्व इस्राएली लोकांना बोलाविले आणि म्हटले: इस्राएली लोकांनो, ज्या विधी व नियमांची आज मी घोषणा करीत आहे व तुम्हाला ऐकवीत आहे, ते शिका आणि निश्चितपणे त्याचे पालन करा.


पण तू माझ्याबरोबर इथेच थांब, म्हणजे मी तुला माझ्या सर्व आज्ञा, विधी व नियम देईन आणि ते त्यांना शिकव म्हणजे जो देश मी त्यांना वतन म्हणून देणार आहे तिथे त्यांचे पालन करावे.”


यार्देन ओलांडून त्या वचनदत्त देश ताब्यात घ्यायचा आहे, त्या देशात तुम्हाला पाळावयास शिकविण्यासाठी याहवेह तुमच्या परमेश्वराने मला सांगितलेल्या आज्ञा, विधी व नियम हे आहेत,


भविष्यात जेव्हा तुमचा पुत्र तुम्हाला विचारेल, “याहवेह आपल्या परमेश्वराने या आज्ञा, ही बोधवचने, विधी व नियम तुम्हाला दिले आहेत, त्यांचा अर्थ काय?”


प्रिय बंधू आणि भगिनींनो, इतर गोष्टीसंबंधाने आम्ही तुम्हाला आज्ञा केली होती की परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी कसे जीवन जगावे आणि ते तुम्ही जगतच आहात आणि आता आम्ही तुम्हाला सांगतो व प्रभू येशूंमध्ये विनंती करतो की तुम्ही अधिकाधिक वाढ करावी.


Lean sinn:

Sanasan


Sanasan