Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 20:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून व दास्यातून बाहेर आणले, तो मीच याहवेह, तुमचा परमेश्वर आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 ज्याने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मी परमेश्वर तुझा देव आहे. ज्याने तुला मिसर देशातून, गुलामगिरीतून सोडवून आणले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 20:2
50 Iomraidhean Croise  

जेव्हा सर्व लोकांनी हे पाहिले, तेव्हा ते पालथे पडून रडू लागले, “याहवेह हेच परमेश्वर आहे! याहवेह हेच परमेश्वर आहे!”


याहवेहने त्यांना सांगितले होते, “तुम्ही असे करू नये” तरी त्यांनी मूर्तींची उपासना केली.


हे सर्व यासाठी घडले की इस्राएलने याहवेह त्यांच्या परमेश्वराविरुद्ध पाप केले, ज्यांनी त्यांना इजिप्तचा राजा फारोहच्या हातून इजिप्तच्या गुलामगिरीतून सोडवून बाहेर आणले होते, त्यांनी इतर दैवतांची उपासना केली


त्यामुळेच त्याचे परमेश्वर याहवेहनी त्याला अरामच्या राजाच्या हाती सोपविले. अरामी लोकांनी त्याचा पराभव केला आणि त्याच्या अनेक लोकांना कैद करून दिमिष्क येथे आणले. त्याला इस्राएलच्या राजाच्या हातीही सोपविले, ज्याने त्याला भारी हानी पोहोचविली.


“ऐका, माझ्या लोकांनो ऐका, मी बोलत आहे; इस्राएला, मी तुझ्याविरुद्ध साक्ष देत आहे: मी परमेश्वर, तुझा परमेश्वर आहे.


मी याहवेह, तुझा परमेश्वर आहे, ज्याने तुला इजिप्तच्या भूमीतून सोडवून आणले. तू आपले मुख पूर्ण उघड आणि ते मी भरेन.”


परंतु माझ्या लोकांनी माझे ऐकले नाही; इस्राएलने माझी आज्ञा पाळली नाही.


तू संकटाच्या वेळी माझा धावा केलास आणि मी तुला सोडविले; मेघगर्जनेतून मी तुला उत्तर दिले; मरीबाह येथे मी तुझ्या विश्वासाची परीक्षा पाहिली. सेला


“भविष्यकाळात तुमची मुले तुम्हाला विचारतील, ‘याचा अर्थ काय आहे?’ तेव्हा त्यांना सांगा, ‘याहवेहने आपल्या पराक्रमी हाताने आम्हाला इजिप्तमधून, त्यांच्या गुलामगिरीतून बाहेर आणले.


तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, हा दिवस स्मरणात ठेवा, याच दिवशी याहवेहने आपल्या पराक्रमी हाताने इजिप्त देशातून, गुलामगिरीतून तुम्हाला बाहेर आणले. खमीर असलेले तुम्ही काहीही खाऊ नये.


तुम्ही उद्धारलेल्या लोकांना आपल्या प्रेमदयेने चालविणार. आपल्या सामर्थ्याने तुम्ही त्यांना तुमच्या पवित्र निवासस्थानाकडे घेऊन जाणार.


तुमच्या बाहूच्या पराक्रमामुळे भीती व दहशत त्यांच्यावर येऊन पडेल. तुमचे लोक पार करेपर्यंत, हे याहवेह, जे लोक तुम्ही खंडून घेतले आहेत, ते पार होईपर्यंत ते दगडाप्रमाणे स्तब्ध राहतील.


ते म्हणाले, “जर तुम्ही याहवेह, तुमच्या परमेश्वराचा शब्द काळजीपूर्वक ऐकाल व त्यांच्या नजरेत जे योग्य ते कराल, जर त्यांच्या आज्ञांकडे लक्ष देऊन त्यांचे सर्व नियम पाळाल, तर मी इजिप्तवर ज्या पीडा आणल्या होत्या, त्या तुमच्यावर आणणार नाही, कारण मी याहवेह, तुम्हाला आरोग्य देणारा आहे.”


आणि परमेश्वर ही सर्व वचने बोलले:


त्यांना समजेल की, ज्याने त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले तो मी याहवेह त्यांचा परमेश्वर आहे, यासाठी की, मी त्यांच्यामध्ये वस्ती करावी. मी याहवेह त्यांचा परमेश्वर आहे.”


म्हणून इस्राएली लोकांना सांग, “मी याहवेह आहे आणि मी तुम्हाला इजिप्तच्या लोकांच्या ओझ्याखालून बाहेर आणेन, त्यांच्या कष्टप्रद गुलामगिरीतून मी तुम्हाला मुक्त करेन आणि माझ्या लांब केलेल्या बाहूने व न्यायाच्या महान कृत्यांनी तुमची सुटका करेन.


कारण मी याहवेह, तुझा परमेश्वर आहे, इस्राएलचा पवित्र परमेश्वर, तुझा तारणकर्ता; तुझ्या खंडणीसाठी मी इजिप्तला दिले, तुझा मोबदला म्हणून कूश आणि सबा दिले,


“तथापि, असे दिवस येत आहेत,” याहवेह असे म्हणतात, “ ‘ज्या याहवेहने इस्राएलांना इजिप्तमधून आणले त्याच्या जीविताची शपथ’ असे कोणी म्हणणार नाही,


त्यांनी असे विचारले नाही, ‘ज्यांनी आम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले आणि वैराण प्रदेशातून मार्गस्थ केले, वाळवंटातून व दऱ्याखोऱ्यातून नेले, निर्जल आणि गडद अंधकाराच्या भूमीतून नेले, ज्या प्रदेशातून कोणीही प्रवास करीत नाही व जिथे मनुष्यवस्ती नाही त्यातून आम्हाला नेले, ते याहवेह कुठे आहेत?’


याहवेह जाहीर करतात, “त्याकाळी मी इस्राएलमधील सर्व कुळांचा परमेश्वर असेन व ते माझे लोक असतील.”


“परंतु मी इस्राएलाच्या लोकांबरोबर करार करेन तो असा” याहवेह जाहीर करतात, “त्या वेळेनंतर मी माझा नियम त्यांच्या मनात ठेवेन, आणि ते त्यांच्या हृदयावर लिहेन, मी त्यांचा परमेश्वर होईन, आणि ते माझे लोक होतील.


“इस्राएलचे परमेश्वर, याहवेह असे म्हणतात: मी तुमच्या पूर्वजांना इजिप्तमधून बाहेर काढले, त्यांच्या गुलामगिरीतून बाहेर आणले, त्यावेळी मी त्यांच्याशी एक करार केला होता. मी म्हटले,


मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; माझ्या विधींचे अनुसरण करा आणि काळजीपूर्वक माझे नियम पाळा.


आणि त्यांना सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: इस्राएलची मी निवड केली, त्या दिवशी, मी शपथ घेतली व याकोबाच्या वंशजांकडे आपला हात उंच केला व मी स्वतः इजिप्तमध्ये त्यांना प्रकट झालो. उंचावलेल्या हाताने मी त्यांना म्हटले, “मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.”


आणि मी त्यांना म्हटले, “तुम्ही प्रत्येकाने ज्या घृणास्पद मूर्तींवर आपली नजर लावली आहे, त्या टाकून द्या, आणि इजिप्तच्या मूर्तींनी स्वतःस विटाळू नका. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.”


मी संदेष्ट्यांबरोबर बोललो, त्यांना अनेक दृष्टान्त दिले आणि त्यांच्याद्वारे दाखले सांगितले.”


“तू इजिप्तमधून बाहेर आल्यापासून मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; माझ्याशिवाय इतर कोणत्याही परमेश्वराला तू स्वीकारणार नाहीस, माझ्याशिवाय इतर कोणीही तारणारा नाही.


मी याहवेह आहे, ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले यासाठी की मी तुमचा परमेश्वर असावा; म्हणून पवित्र व्हा, कारण मी पवित्र आहे.


तोलण्यात खरे तराजू आणि वजन उपयोगात आणावे आणि मापण्यात तुम्ही खरे एफा आणि हीन उपयोगात आणावे; कारण ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले तो याहवेह मी तुमचा परमेश्वर आहे.


यासाठी की, तुमच्या भावी पिढीला हे कळावे की, जेव्हा मी इस्राएलच्या घराण्याला इजिप्तमधून बाहेर काढले तेव्हा मी त्यांना मंडपात राहायला लावले. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.’ ”


ज्याने तुम्हाला कनान देश देण्यासाठी आणि तुमचा परमेश्वर होण्यासाठी इजिप्त देशातून बाहेर आणले, तो मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.


कारण इस्राएली तर माझे सेवक आहेत, मी त्याला इजिप्त देशातून बाहेर आणले आहे. म्हणून त्याची सर्वसाधारण गुलामाप्रमाणे विक्री केली जाऊ नये.


कारण इस्राएली लोक माझेच सेवक आहेत; मीच त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले; मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.


“ ‘तुम्ही आपणासाठी घडीव मूर्ती किंवा कोरीव मूर्ती किंवा मूर्तिस्तंभ यांची स्थापना करू नये, अथवा आपल्या देशात नतमस्तक होण्यासाठी कोरीव दगड ठेवू नये. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.


इजिप्तच्या लोकांचे तुम्ही गुलाम राहू नये म्हणून ज्याने तुम्हाला इजिप्त देशामधून बाहेर आणले; तो मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. मी तुमच्या बेड्या तोडून टाकल्या आणि तुम्ही ताठ मानेने चालाल असे मी केले आहे.


अमोर्‍यांचा देश तुम्हाला द्यावा म्हणून मी तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले व चाळीस वर्षे तुम्हाला रानात चालविले.


यहूदी व गैरयहूदी यामध्ये फरक नाही; त्या सर्वांचा एकच प्रभू आहे आणि जे त्यांचा धावा करतात त्या सर्वांना ते विपुल आशीर्वाद देतात,


किंवा परमेश्वर केवळ यहूदीयांचाच परमेश्वर आहे का? तो गैरयहूदीयांचा परमेश्वर नाही का? तो गैरयहूदीयांचा सुद्धा आहेच,


त्यांना मरेपर्यंत धोंडमार करावी, कारण ज्यांनी तुम्हाला इजिप्त देशाच्या गुलामगिरीतून बाहेर काढले, त्या याहवेह तुमच्या परमेश्वरापासून तुम्हाला फूस लावून दूर नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.


स्मरण ठेवा, तुम्हीही इजिप्त देशामध्ये गुलाम होता आणि याहवेह तुमच्या परमेश्वराने तुमची सुटका केली. म्हणूनच मी आज तुम्हाला ही आज्ञा देत आहे.


जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूशी युद्ध करण्यास जाल आणि तुमच्यासमोर घोडे व रथ आणि तुमच्या सैन्यापेक्षा फारच मोठे शत्रुसैन्य पाहाल, तेव्हा त्यांना घाबरू नका. कारण ज्यांनी तुम्हाला इजिप्त देशातून सुखरुपपणे बाहेर आणले, ते याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाबरोबर असतील.


तुम्ही इजिप्त देशात गुलाम होता याचे स्मरण करा. याहवेह तुमच्या परमेश्वराच्या सामर्थ्यवान व विस्तारित हातांनी तुम्हाला तिथून बाहेर काढले. यास्तव याहवेह तुमच्या परमेश्वराने शब्बाथ दिवस पाळण्याची आज्ञा केली आहे.


“ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून व दास्यातून बाहेर आणले तो मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.


पण याहवेहची तुमच्यावर प्रीती असल्यामुळे आणि त्यांनी तुमच्या पूर्वजांना दिलेली शपथ पाळावयाची होती, म्हणून त्यांनी तुम्हाला सामर्थ्यशाली हाताने बाहेर काढले आणि इजिप्तचा राजा फारोहच्या दास्यगृहातून तुम्हाला सोडविले.


याहवेहचा दूत गिलगालहून वर बोखीम येथे गेला आणि म्हणाला, “मी तुम्हाला इजिप्त देशातून काढून तुमच्या पूर्वजास शपथपूर्वक देऊ केलेल्या देशात आणले. मी म्हणालो, ‘तुमच्याशी केलेला करार मी कधी मोडणार नाही,


मी तुम्हाला म्हटले, मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; ज्या अमोरी लोकांच्या देशात तुम्ही राहता, त्यांच्या दैवतांची उपासना करू नका. परंतु तुम्ही माझे ऐकले नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan