Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 17:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तेव्हा लोक मोशेशी भांडण करीत म्हणाले, “आम्हाला प्यावयास पाणी दे.” मोशे त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्याशी का भांडता? तुम्ही याहवेहची परीक्षा का पाहता?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 म्हणून ते मोशेशी भांडू लागले व म्हणाले, “आम्हांला प्यायला पाणी दे.” तेव्हा मोशे त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्याशी का भांडता? परमेश्वराची परीक्षा का पाहता?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तेव्हा इस्राएल लोक मोशेविरूद्ध उठले व त्याच्याशी भांडू लागले. ते म्हणाले, “आम्हांला प्यावयास पाणी दे.” मोशे त्यांना म्हणाला, “तुम्ही मजशी का भांडता? तुम्ही परमेश्वराची परीक्षा का पाहत आहात?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 17:2
32 Iomraidhean Croise  

परंतु त्यांनी केलेले कार्य ते लवकर विसरले, त्यांनी केलेली योजना पूर्ण होण्याची त्यांनी वाट पाहिली नाही.


ओसाड भूमीत त्यांनी आपल्या उत्कट इच्छांना मोकळी वाट करून दिली; वाळवंटात परमेश्वराची परीक्षा पाहिली.


ज्या अन्नासाठी ते आसुसलेले होते त्याचा आग्रह धरून त्यांनी स्वेच्छेने आपल्या मनात परमेश्वराची परीक्षा घेतली.


पुन्हा आणि पुन्हा त्यांनी परमेश्वराची परीक्षा पाहिली; इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराला त्यांनी चिथविले.


तरी त्यांनी परमेश्वराची परीक्षा पाहिली आणि त्यांनी सर्वोच्च परमेश्वराविरुद्ध बंड केले; त्यांच्या आज्ञा पाळण्याचे नाकारले.


“मरीबाह येथे असताना केली तशी, जसे मस्सा च्या दिवशी तुम्ही रानामध्ये केले तसे, तुमची अंतःकरणे कठीण करू नका.


माझे अनेक चमत्कार पाहिलेले असतानाही, तुमच्या पूर्वजांनी माझी परीक्षा घेऊन मला कसोटीस लावले.


“आम्ही काय प्यावे?” असे म्हणत लोकांनी मोशेविरुद्ध कुरकुर केली.


मोशे म्हणाला, “संध्याकाळी जेव्हा याहवेह तुम्हाला मांस आणि सकाळी जी भाकर तुम्हाला पाहिजे ती खायला देतील, कारण त्यांनी त्यांच्याविरुद्ध केलेली तुमची कुरकुर ऐकली आहे. आम्ही कोण आहोत? तुम्ही आमच्याविरुद्ध नाही, तर याहवेहच्या विरुद्ध कुरकुर करीत आहात.”


मोशेने त्या ठिकाणाचे नाव मस्सा व मरीबाह असे ठेवले; कारण इस्राएली लोकांनी भांडण केले आणि याहवेह आमच्यामध्ये आहेत की नाहीत? असे म्हणून याहवेहची परीक्षा घेतली.


ते त्यांना म्हणाले, “याहवेह तुम्हाकडे पाहो व तुमचा न्याय करो! तुम्ही दोघांनी फारोह व त्याच्या अधिकार्‍यांसमोर आम्हाला किळसवाणे असे केले आहे आणि आम्हाला मारून टाकण्यासाठी त्यांच्या हाती तलवार दिली आहे.”


परंतु आहाज म्हणाला, “मी विचारणार नाही; मी याहवेहची परीक्षा घेणार नाही.”


पण आता, आपण जे उद्धट ते धन्य असे म्हणू. कारण दुष्टाई करणाऱ्यांची निश्चितच भरभराट होते आणि ते परमेश्वराची परीक्षा पाहतात, तरी ते निर्दोष ठरतात.’ ”


सर्व इस्राएली लोकांनी मोशे व अहरोन यांच्याविरुद्ध कुरकुर केली आणि सर्व समुदाय त्यांना म्हणाला, “आम्ही इजिप्त देशात किंवा या रानातच मेलो असतो तर किती बरे असते!


ज्यांनी माझे वैभव आणि मी इजिप्तमध्ये व रानात केलेले चमत्कार पाहिले आहेत आणि तरीही माझा आज्ञाभंग केला व दहा वेळा माझी परीक्षा पाहिली;


ते परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध कुरकुर करीत बोलू लागले व म्हणाले, “तुम्ही आम्हाला या रानात मरावे म्हणून इजिप्तमधून का आणले? येथे भाकर नाही! पाणी नाही! आणि हे बेचव अन्न आम्हाला नकोसे झाले आहे.”


तेव्हा येशूंनी प्रत्युत्तर दिले, “असेही लिहिले आहे: ‘प्रभू तुमच्या परमेश्वराची परीक्षा पाहू नका.’ ”


त्यातील धाकटा आपल्या वडिलांना म्हणाला, ‘बाबा, मालमत्तेतील माझा वाटा मला द्या’ त्यावेळी त्याच्या वडिलांनी आपली मालमत्ता त्यांच्यामध्ये वाटून दिली.


येशूंनी उत्तर दिले, “असे म्हटले आहेः ‘प्रभू तुमच्या परमेश्वराची परीक्षा पाहू नका.’ ”


तेव्हा आता, जे जू आपल्याला व आपल्या पूर्वजांना वाहवयास अशक्य होते, ते गैरयहूद्यांना वाहवयास लावून तुम्ही जणू परमेश्वराची परीक्षा पाहता काय?


मग पेत्र तिला म्हणाला, “प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यासाठी तुम्ही कट का केला? ऐक, ज्या पुरुषांनी तुझ्या पतीला नुकतेच पुरले आहे त्यांचे पाय दारातच आहेत आणि ते तुलादेखील उचलून बाहेर नेतील.”


आपण ख्रिस्ताची परीक्षा पाहू नये, जशी त्यांच्यातील काहीजणांनी पाहिली आणि ते सर्पदंशाद्वारे मरण पावले.


मस्सा येथे पाहिली तशी तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराची परीक्षा पाहू नका.


पुन्हा तबेरा येथे, मस्सा येथे आणि किब्रोथ-हत्ताव्वा येथेही तुम्ही याहवेहला संतप्त केले.


जरी त्यांनी माझी कृत्ये चाळीस वर्षे पाहिली होती तरी तुमच्या पूर्वजांनी माझी परीक्षा घेऊन मला कसोटीस लावले.


परंतु जेव्हा ते म्हणाले, “आमचे नेतृत्व करण्यासाठी आम्हाला एक राजा नेमून द्या,” त्यामुळे शमुवेल दुःखी झाला; आणि त्याने याहवेहकडे प्रार्थना केली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan