Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 15:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 नंतर मोशे व इस्राएली लोकांनी याहवेहप्रीत्यर्थ हे गीत गाईले: “मी याहवेहला गीत गाईन, कारण ते अत्युच्च आहेत. घोडे व त्यांचे स्वार त्यांनी समुद्रात फेकले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 तेव्हा मोशे आणि इस्राएल लोक ह्यांनी परमेश्वराला हे गीत गाईले; ते म्हणाले, “मी परमेश्वराला गीत गाईन, कारण तो विजयी होऊन उन्नत झाला आहे; घोडा व स्वार त्याने समुद्रात टाकून दिले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 नंतर मोशे व इस्राएल लोक यांनी परमेश्वरास हे गीत गाईले. ते म्हणाले, “मी परमेश्वरास गीत गाईन कारण तो विजयाने प्रतापी झाला आहे; घोडा व स्वार यांना त्याने समुद्रात उलथून टाकले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 15:1
27 Iomraidhean Croise  

तुम्ही त्यांच्यासमोर समुद्र दुभागला, म्हणजे त्यांनी कोरड्या जमिनीवरून चालत जावे. परंतु त्यांचा पाठलाग करणार्‍यांना असे खोलात फेकले, जणू प्रचंड जलाशयात एखादा दगड फेकला जावा.


ज्या कृत्यांबद्दल लोकांनी गीते गाऊन स्तुती केली, ती त्यांची कृत्ये आठवून त्यांची प्रशंसा कर.


त्यांनी त्यांच्या लोकांना आनंदाची गाणी गात, व आपल्या निवडलेल्यांना हर्षनाद करीत बाहेर आणले;


तेव्हा लोकांनी त्यांच्या वचनांवर विश्वास ठेवला, व त्यांचे स्तुतिगान केले.


याहवेहच्या या अक्षय प्रीतीबद्दल व त्यांनी सर्व मनुष्यास्तव केलेल्या अद्भुतकार्याबद्दल ते त्यांचे उपकारस्मरण करोत.


याहवेहच्या या अक्षय प्रीतीबद्दल व त्यांनी सर्व मनुष्यास्तव केलेल्या अद्भुतकार्याबद्दल ते त्यांचे उपकारस्मरण करोत.


माझे आश्रयस्थान तुम्ही आहात; संकटात तुम्हीच माझे रक्षण करणार आणि मुक्ततेच्या गीतांनी तुम्ही मला वेढणार. सेलाह


हे याकोबाच्या परमेश्वरा, तुम्ही फटकारल्यावर घोडे आणि स्वार गाढ झोपेत गेले आहेत.


तुम्हीच एकटेच भयास योग्य आहात. जेव्हा आपण रागावता, तेव्हा आपल्यासमोर कोण उभा राहू शकतो?


मग याहवेह मोशेला म्हणाले, “आपला हात समुद्रावर लांब कर म्हणजे समुद्राचे पाणी पूर्ववत होऊन इजिप्तचे सर्व सैन्य, त्यांचे रथ व घोडेस्वार यांच्यावर येईल.”


मोशेने आपला हात समुद्रावर लांब केला आणि पहाटेच्या वेळी समुद्र त्याच्या ठिकाणी परत गेला. इजिप्तचे लोक त्याच्याकडे धावत असताना याहवेहने त्यांना समुद्रात बुडवून टाकले.


मिर्यामने त्यांच्यासाठी गाईले: “याहवेहप्रीत्यर्थ गीत गा, कारण ते अत्युच्च आहेत. घोडे व त्यांचे स्वार त्यांनी समुद्रात बुडवून टाकले आहेत.”


आता मला समजले की, याहवेह सर्व दैवतांपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण ज्यांनी इस्राएली लोकांना क्रूरतेने वागविले होते त्यांचा त्यांनी नाश केला आहे.”


दुष्ट कृत्ये करणारे स्वतःच्या पापामुळेच सापळ्यात अडकतात, परंतु नीतिमान आनंदाने गर्जना करतात आणि हर्षित असतात.


याहवेहसाठी एक नवे गीत गा, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्याची स्तुतिस्तोत्रे गा, तुम्ही जे सागराच्या खोलात जाऊन राहता आणि त्यात असलेले सर्वकाही, तुम्ही बेटांनो व त्यावर राहणारे सर्वजण गीत गा.


तुझ्याद्वारे मी घोडा आणि घोडेस्वाराचा संपूर्ण नाश करेन, तुझ्याद्वारे मी रथ आणि सारथी यांचा संपूर्ण नाश करेन,


मी तिच्या मुखातून बआलची नावे काढून टाकीन; यापुढे त्यांची नावे कधीही घेतली जाणार नाही.


तरी मी याहवेहच्या ठायी आनंद करेन; मला तारण देणार्‍या परमेश्वराच्या ठायी मी हर्ष करेन.


मग इस्राएलने हे गीत गाईले: “हे विहिरी, उफाळून ये! त्याविषयी गा,


आणि सत्तांना आणि अधिकारांना हाणून पाडले व त्यांचे उघड प्रदर्शन करून क्रूसाद्वारे त्यांच्यावर विजय संपादन केला.


ते परमेश्वराचा सेवक मोशेचे आणि कोकर्‍याचे गीत गात होते: “हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा! तुमची कृत्ये थोर आणि अलौकिक आहेत! हे राष्ट्रांच्या राजा, तुमचे मार्ग नीतीचे आणि सत्याचे आहेत!


Lean sinn:

Sanasan


Sanasan