Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 13:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 जेव्हा तुम्हाला कनानी, हिथी, अमोरी, यबूसी आणि हिव्वी यांचा देश, ज्यात दूध व मध वाहतो, ते तुम्हाला देतील अशी तुमच्या पूर्वजांशी शपथ वाहिली, त्यात याहवेह तुम्हाला नेतील; तेव्हा या महिन्यात हा विधी तुम्ही पाळावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 कनानी, हित्ती, अमोरी, हिव्वी आणि यबूसी ह्यांच्या देशात, म्हणजे जेथे दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत असा जो देश तुला देण्यास परमेश्वराने तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिली त्या देशात तुला आणल्यावर ह्या महिन्यात तू हा सण पाळावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 परमेश्वराने तुमच्या पूर्वजांशी शपथपूर्वक करार केला होता की कनानी, हित्ती, अमोरी, हिव्वी व यबूसी ह्याच्या देशात, जेथे दुधामधाचे प्रवाह वाहतात त्या देशात आणल्यानंतर तुम्ही या महिन्यात ही सेवा करावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 13:5
31 Iomraidhean Croise  

या प्रांतात काही काळ राहा आणि मी तुझ्यासह असेन व तुला आशीर्वादित करेन. तुझा पिता अब्राहाम याला मी दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी हा सर्व प्रदेश तुला आणि तुझ्या वंशजाला देईन.


नंतर योसेफ आपल्या भावांस म्हणाला, “लवकरच माझा अंत होईल, पण खात्रीने परमेश्वर तुमची भेट घेतील आणि तुम्हाला इजिप्त देशाबाहेर अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना वचन दिलेल्या देशात घेऊन जातील,”


हिव्वी, आर्की, सीनी,


“तुमच्यासाठी व तुमच्या वंशजांसाठी हा सर्वकाळचा नियम असावा.


दरवर्षी हा सण तुम्ही ठराविक वेळी पाळावा.


“तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिलेल्या शपथेनुसार याहवेह तुम्हाला कनानी लोकांच्या देशात घेऊन जातील व तो देश तुम्हाला देतील,


आणि इजिप्तमधील तुमच्या या दुःखातून तुम्हाला बाहेर काढून कनानी, हिथी, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी लोक राहत असलेल्या दूध व मध वाहत्या देशात तुम्हाला घेऊन जाण्याचे मी वचन दिलेले आहे.


त्यांना इजिप्तच्या गुलामगिरीतून सोडवून चांगल्या व विस्तीर्ण देशात, दूध व मध वाहत्या देशात घेऊन जाण्यासाठी मी खाली आलो आहे. त्या देशात कनानी, हिथी, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी हे लोक राहतात.


आपले सेवक अब्राहाम, इसहाक व इस्राएल यांची आठवण करा, ज्यांच्याशी आपण स्वतःच्या नावाने शपथ घेतलीः ‘मी तुझे वंशज आकाशातील तार्‍यांइतके करेन, आणि त्यांना अभिवचन दिल्याप्रमाणे हा सर्व देश मी त्यांच्या वंशजांना देईन, आणि तो सदासर्वकाळासाठी त्यांचे वतन राहील.’ ”


नंतर याहवेह मोशेला म्हणाले, “तू आणि ज्या लोकांना तू इजिप्तमधून बाहेर आणले त्यांना घेऊन या ठिकाणातून नीघ आणि मी अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना शपथ घेऊन अभिवचन दिले, ‘हा देश मी तुझ्या वंशजांना देईन’ त्या देशाकडे घेऊन जा.


मी तुला आज जे आज्ञापितो ते तू पाळावे. मी तुमच्यापुढून अमोरी, कनानी, हिथी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी यांना घालवून देईन.


ज्या कनान देशात ते पूर्वी परदेशी म्हणून राहत होते, तो देश मी त्यांना देईन, असा मी त्यांच्याशी करार स्थापित केला.


आणि जो देश अब्राहाम, इसहाक व याकोब यांना देण्यास मी हात उंच करून शपथ वाहिली, त्यात मी तुम्हाला आणेन आणि तो तुम्हाला वतन म्हणून देईन. मीच याहवेह आहे.”


तेव्हा मी तुमच्या पूर्वजांना वाहलेली शपथ पूर्ण करेन, आणि दूध व मध वाहणारा देश’ ज्यात आज तुम्ही राहत आहात तो मी तुम्हाला देईन.” मी उत्तर दिले, “याहवेह, आमेन.”


आमच्या पूर्वजांना दिलेल्या शपथपूर्वक वचनाप्रमाणे, तुम्ही इस्राएलला दूध व मध वाहता देश दिला.


त्या दिवशी मी त्यांच्याशी शपथ वाहिली की मी त्यांना इजिप्तमधून जो देश मी त्यांच्यासाठी शोधला आहे, जिथे दूध व मध वाहते अशा देशात मी त्यांना आणेन, जो सर्व देशांपेक्षा अति सुंदर आहे.


परंतु मी तुम्हाला म्हणालो, “तुम्ही त्यांच्या देशाचे मालक व्हाल; मी तुम्हाला तो वारसाप्राप्त संपत्ती असे देईन, दुधामधाचे प्रवाह वाहणारा असा तो देश आहे.” तुम्हाला इतर राष्ट्रांपासून वेगळे राखणारा, मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.


मी या सर्व लोकांचे गर्भधारण केले काय? त्यांना मी जन्म दिला काय? आई आपल्या तान्ह्या बाळाला घेते तसे मी यांना माझ्या उराशी घेऊन तुम्ही त्यांच्या पूर्वजांना शपथ घेऊन वचन दिलेल्या देशात मी घेऊन जावे असे तुम्ही मला का सांगता?


त्यांनी मोशेला अहवाल दिला तो असा: “जो देश हेरण्यास तुम्ही आम्हाला पाठविले तिथे आम्ही गेलो, त्यात खरोखरच दूध व मध वाहतात! ही पाहा तेथील फळे.


‘याहवेहने या लोकांना शपथ देऊन जो देश देऊ केला होता, त्यात त्यांना नेण्यास याहवेह असमर्थ होते म्हणून त्यांनी लोकांना रानातच मारून टाकले.’


ज्या देशाविषयी मी हात उंच करून म्हटले की त्यात मी तुम्हाला वसवेन, त्या देशात तुमच्यापैकी यफुन्नेहचा पुत्र कालेब आणि नूनाचा पुत्र यहोशुआ यांच्याशिवाय कोणीही जाणार नाही.


‘कारण त्यांनी पूर्ण अंतःकरणाने मला अनुसरले नाही, म्हणून इजिप्तमधून बाहेर येताना ज्यांचे वय वीस वर्षे व त्याहून अधिक होते त्यातील एकही, जो देश मी अब्राहाम, इसहाक व याकोबाला शपथ घेऊन देऊ केला तो पाहणार नाही;


ज्या भूमीत तुम्ही राहणार आहात तेथील राष्ट्रांचा याहवेह तुमचे परमेश्वर नाश करतील. मग त्यांना तिथून घालवून दिल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी वस्ती करावी,


याहवेह तुमचे परमेश्वर जी भूमी तुम्हाला देणार आहेत, तेथील राष्ट्रांचा ते नाश करतील व जेव्हा तुम्ही त्यांना त्या भूमीतून घालवून द्याल आणि त्यांच्या शहरात व घरात वस्ती कराल,


जेव्हा तुम्ही याहवेह तुमचे परमेश्वराने वतन दिलेल्या देशात प्रवेश कराल, तो जिंकून त्याचा ताबा घ्याल आणि तिथे वस्ती कराल,


जेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला त्या देशात घेऊन जातील, ज्याचा ताबा मिळविण्यासाठी तुम्ही जात आहात आणि तुमच्यापुढून—हिथी, गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी या तुमच्यापेक्षा मोठ्या आणि बलाढ्य सात राष्ट्रांना हाकलून देतील—


“ ‘नंतर तुम्ही यार्देन नदी ओलांडून यरीहोकडे आला. यरीहोचे रहिवासी तुमच्याविरुद्ध लढले, तसेच अमोरी, परिज्जी, कनानी, हिथी, गिर्गाशी, हिव्वी आणि यबूसी हे सुद्धा लढले, परंतु मी त्यांना तुमच्या हाती दिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan