Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 13:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, हा दिवस स्मरणात ठेवा, याच दिवशी याहवेहने आपल्या पराक्रमी हाताने इजिप्त देशातून, गुलामगिरीतून तुम्हाला बाहेर आणले. खमीर असलेले तुम्ही काहीही खाऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मोशे लोकांना म्हणाला, “ह्या दिवसाची आठवण ठेवा; ह्याच दिवशी तुम्ही मिसरातून, दास्यगृहातून बाहेर निघालात; परमेश्वराने आपल्या बलवान हाताने तुम्हांला ह्या ठिकाणातून बाहेर आणले म्हणून ह्या दिवशी खमिराची भाकर खायची नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मोशे लोकांस म्हणाला, “आजच्या दिवसाची आठवण ठेवा. तुम्ही मिसर देशात गुलाम म्हणून होता; परंतु या दिवशी परमेश्वराने आपल्या हाताच्या बळाने तुम्हास गुलामगिरीतून सोडवून बाहेर आणले म्हणून तुम्ही खमीर घातलेली भाकर खाऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 13:3
58 Iomraidhean Croise  

चार पिढ्यानंतर तुझे वंशज या भूमीत परत येतील, कारण अमोर्‍यांचा अपराध अजून पूर्ण झालेला नाही.”


कारण त्यांनी आपले महान नाव आणि आपला पराक्रमी हात व आपला लांबविलेला बाहू याबद्दल ऐकले; व जेव्हा ते येऊन या मंदिराकडे वळून प्रार्थना करतील,


परमेश्वराने केलेली अद्भुत कार्ये, त्यांचे चमत्कार, आणि त्यांनी केलेले न्याय यांचे स्मरण करा.


“ते तुमचेच सेवक व लोक आहेत, ज्यांना तुम्ही आपल्या महान शक्तीने व समर्थ हाताने सोडविले आहे.


फारोह व त्याच्या अधिकाऱ्याविरुद्ध व त्याच्या प्रदेशातील सर्व लोकांविरुद्ध तुम्ही चिन्ह व चमत्कार केले, कारण ते लोक त्यांना किती कठोरपणाची वागणूक देत होते, हे तुम्हाला ठाऊक होते. तुमच्या नावाचा महिमा तुम्ही प्रकट केला आणि तो आजवर आहे.


परमेश्वराने केलेली अद्भुत कार्ये, त्यांचे चमत्कार आणि त्यांनी केलेले न्याय यांचे स्मरण करा.


जेव्हा इस्राएल इजिप्तमधून, परकीय भाषेच्या लोकातून याकोब बाहेर पडला,


त्यांनी इस्राएलास त्यांच्या तावडीतून सोडविले, त्यांची करुणा सनातन आहे.


ज्यांनी आपल्या सशक्त हातांनी व विस्तारलेल्या भुजांनी त्यांना सोडविले, त्यांची करुणा सनातन आहे.


तुमच्या राजासनाचा पाया नीती व न्याय आहे; करुणामय प्रीती व विश्वसनीयता सतत तुमच्यापुढे चालतात.


सात दिवस तुम्ही खमीर नसलेली भाकर खावी. पहिल्या दिवशी आपल्या घरातून खमीर काढून टाकावे, कारण जे कोणी या सात दिवसात खमीर घातलेल्या वस्तू खाईल, त्याला इस्राएलातून बेदखल करण्यात यावे.


“बेखमीर भाकरीचा सण पाळावा, कारण याच दिवशी मी तुमच्या सैन्यांना इजिप्तमधून बाहेर आणले. पिढ्यान् पिढ्यांपर्यंत सर्वकाळच्या नियमाने तो पाळावा.


या सात दिवसात तुमच्या घरात खमीर सापडू नये. आणि कोणीही, तो परदेशी असो वा देशात जन्मलेला असो, जो खमीर घातलेले पदार्थ खाईल तर त्याला इस्राएलाच्या समाजातून वाळीत टाकले जावे.


“हा महिना तुमच्यासाठी पहिला महिना, वर्षाचा पहिला महिना असेल.


चारशेतिसाव्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी याहवेहच्या सैन्यांनी इजिप्त देश सोडला.


ही रात्र याहवेहने इस्राएली लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणण्यासाठी वेगळी करून ठेवली, ही रात्र इस्राएल लोकांनी पिढ्यान् पिढ्या याहवेहला सन्मान म्हणून पाळावी.


त्या रात्री प्रत्येकाने त्या कोकर्‍याचे विस्तवावर भाजलेले मांस, बेखमीर भाकर व कडू भाजी यांच्याबरोबर खावे.


“भविष्यकाळात तुमची मुले तुम्हाला विचारतील, ‘याचा अर्थ काय आहे?’ तेव्हा त्यांना सांगा, ‘याहवेहने आपल्या पराक्रमी हाताने आम्हाला इजिप्तमधून, त्यांच्या गुलामगिरीतून बाहेर आणले.


हे तुम्हाला तुमच्या हातावरील खूण व कपाळावर स्मरणचिन्हासारखे असणार. याहवेहचा हा नियम तुमच्या मुखात असावा. कारण याहवेहने आपल्या पराक्रमी हाताने तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले.


“ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून व दास्यातून बाहेर आणले, तो मीच याहवेह, तुमचा परमेश्वर आहे.


शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळून त्याची आठवण ठेवा.


“बेखमीर भाकरीचा सण पाळावा; मी तुम्हाला आज्ञापिल्याप्रमाणे, सात दिवस बेखमीर भाकर खा. अवीव महिन्यात नेमलेल्या वेळेत असे करावे, कारण त्या महिन्यात तुम्ही इजिप्त देशातून बाहेर आला. “माझ्यासमोर कोणीही रिकाम्या हाताने येऊ नये.


म्हणून मी आपला हात लांब करेन व माझ्या चमत्कारांनी इजिप्तवर प्रहार करेन. मग शेवटी तो तुम्हाला जाऊ देईल.


“बेखमीर भाकरीचा सण पाळा. मी तुम्हाला आज्ञापिल्याप्रमाणे, सात दिवस बेखमीर भाकर खा. अबीब महिन्यात नेमीत वेळी ते करावे, कारण त्या महिन्यात तुम्ही इजिप्तमधून बाहेर निघाला होता.


तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “आता मी फारोहला काय करतो, ते तू पाहशील: कारण माझ्या पराक्रमी हातामुळे तो लोकांना जाऊ देईल; कारण माझ्या बलवान हातामुळे तो त्यांना आपल्या देशाबाहेर घालवून देईल.”


म्हणून इस्राएली लोकांना सांग, “मी याहवेह आहे आणि मी तुम्हाला इजिप्तच्या लोकांच्या ओझ्याखालून बाहेर आणेन, त्यांच्या कष्टप्रद गुलामगिरीतून मी तुम्हाला मुक्त करेन आणि माझ्या लांब केलेल्या बाहूने व न्यायाच्या महान कृत्यांनी तुमची सुटका करेन.


मी तुम्हाला माझे लोक म्हणून स्वीकारेन आणि मी तुमचा परमेश्वर होईन, मग तुम्हाला कळून येईल की, तुम्हाला इजिप्तच्या ओझ्याखालून सोडविणारा परमेश्वर याहवेह मीच आहे.


तरीही फारोह तुझे ऐकणार नाही. मग मी इजिप्तवर माझा हात उगारेन आणि मोठ्या पराक्रमी कृत्यांच्या न्यायाने मी माझे सैन्य, माझे इस्राएली लोक यांना बाहेर काढेन.


“इस्राएलचे परमेश्वर, याहवेह असे म्हणतात: मी तुमच्या पूर्वजांना इजिप्तमधून बाहेर काढले, त्यांच्या गुलामगिरीतून बाहेर आणले, त्यावेळी मी त्यांच्याशी एक करार केला होता. मी म्हटले,


“आणि आता याहवेह आमच्या परमेश्वरा, तुम्ही आपल्या महान हातांनी तुमच्या लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणले आणि आपल्या नावाची महिमा प्रस्थापित केली, जी आजपर्यंत आहे. आम्ही पाप केले आणि आम्ही चूक केली.


एखाद्या घरात प्रवेश करताना शुभेच्छा द्या.


नंतर येशूंनी भाकर घेतली, आभार मानले आणि ती मोडली आणि ती त्यांना देत असताना म्हणाले, “हे माझे शरीर असून ते तुमच्याकरिता दिले जात आहे; माझ्या स्मरणार्थ हे करा.”


आणि आभार मानून ती मोडली आणि ते म्हणाले, “हे माझे शरीर तुमच्याकरिता दिले जात आहे; माझ्या स्मरणार्थ हे करा.”


आपण सण साजरा करू या, जुन्या भाकरीच्या खमिराने, द्वेष आणि दुष्टपणाने नव्हे तर त्याऐवजी प्रामाणिकपणाने व सत्याने अखमीर भाकरीने साजरा करू या.


जे विश्वास ठेवतात, त्यांना अमर्याद सामर्थ्य आहे. हे तेच महापराक्रमी सामर्थ्य आहे


त्यांना मरेपर्यंत धोंडमार करावी, कारण ज्यांनी तुम्हाला इजिप्त देशाच्या गुलामगिरीतून बाहेर काढले, त्या याहवेह तुमच्या परमेश्वरापासून तुम्हाला फूस लावून दूर नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.


तेव्हा संपूर्ण इस्राएल ऐकेल व भयभीत होईल आणि तुमच्यामध्ये असा दुष्टपणा करण्यास कोणी धजणार नाही.


जो संदेष्टा किंवा स्वप्नदर्शी तुम्हाला बहकवील त्याला अवश्य जिवे मारावे, कारण ज्या याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला इजिप्त देशातील गुलामगिरीतून बाहेर काढले, त्यांच्याविरुद्ध बंड करण्यास त्याने तुम्हाला प्रवृत्त केले. तुम्ही स्वतःला या दुष्टाईपासून मुक्त केले पाहिजे.


जर तुमचा स्वतःचा बंधू किंवा तुमचे पुत्र किंवा कन्या किंवा तुमची प्रिय पत्नी किंवा जिवलग मित्र तुम्हाला गुप्तपणे भुरळ पाडेल व म्हणेल, “चल, आपण जाऊ आणि इतर दैवतांची उपासना करू” (ज्यांना तुम्ही वा तुमचे पूर्वज ओळखत नाहीत,


स्मरण ठेवा, तुम्हीही इजिप्त देशामध्ये गुलाम होता आणि याहवेह तुमच्या परमेश्वराने तुमची सुटका केली. म्हणूनच मी आज तुम्हाला ही आज्ञा देत आहे.


अवीव हा महिना पाळावा आणि याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी वल्हांडण सण साजरा करावा, कारण त्यांनी अवीव महिन्यात तुम्हाला इजिप्त देशामधून रात्रीच्या वेळी बाहेर काढले.


तुम्ही इजिप्त देशामध्ये गुलाम होता, याचे तुम्हाला स्मरण राहावे आणि म्हणून या विधीचे तुम्ही काळजीपूर्वक पालन करावे.


ते खमीर असलेल्या भाकरीबरोबर खाऊ नये, परंतु सात दिवस तुम्ही बेखमीर भाकर खावी, ही तुमच्या क्लेशाची भाकर होय, कारण इजिप्त देश घाईघाईने सोडताना तुम्हाला खावी लागली होती—इजिप्तमधून तुमची सुटका झाली त्या वेळेची आठवण तुम्हाला आयुष्यभर राहील.


तुम्ही इजिप्त देशात गुलाम होता आणि याहवेह तुमच्या परमेश्वराने त्यातून तुमची सुटका केली, याची तुम्ही सतत आठवण ठेवावी. म्हणूनच मी तुम्हाला हे करण्याची आज्ञा देत आहे.


इजिप्त देशामध्ये तुम्ही गुलाम होता याची आठवण ठेवावी म्हणून मी तुम्हाला हे करण्याची आज्ञा देत आहे.


मग याहवेहने महान चमत्कारांनी, सामर्थ्यशाली बाहुबलाने व पसरलेल्या हातांनी आणि भयावह चिन्ह व चमत्कार करून आम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले.


कोणत्या दैवताने एका राष्ट्रातून दुसर्‍या राष्ट्राला गुलामगिरीतून बाहेर काढण्याकरिता भयानक पीडा पाठविल्या, चिन्हे, चमत्कार केले, युद्ध व अद्भुत कृत्ये केली, जसे इजिप्त देशातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी याहवेह तुमच्या परमेश्वराने पराक्रमी बाहू आणि उगारलेल्या हाताने चमत्कार केले, असे एक तरी उदाहरण इतरत्र तुम्हाला सापडेल का?


तुम्ही इजिप्त देशात गुलाम होता याचे स्मरण करा. याहवेह तुमच्या परमेश्वराच्या सामर्थ्यवान व विस्तारित हातांनी तुम्हाला तिथून बाहेर काढले. यास्तव याहवेह तुमच्या परमेश्वराने शब्बाथ दिवस पाळण्याची आज्ञा केली आहे.


“ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून व दास्यातून बाहेर आणले तो मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.


ज्या याहवेहने तुम्हाला इजिप्त देशातून, दास्यगृहातून बाहेर आणले त्यांना तुम्ही विसरू नये याची खबरदारी घ्या.


तेव्हा तुम्ही त्यांना सांगा: “आम्ही इजिप्त देशात फारोहचे गुलाम होतो, परंतु याहवेहने आपल्या पराक्रमी हाताने आम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले.


पण याहवेहची तुमच्यावर प्रीती असल्यामुळे आणि त्यांनी तुमच्या पूर्वजांना दिलेली शपथ पाळावयाची होती, म्हणून त्यांनी तुम्हाला सामर्थ्यशाली हाताने बाहेर काढले आणि इजिप्तचा राजा फारोहच्या दास्यगृहातून तुम्हाला सोडविले.


तेव्हा तुमचे अंतःकरण उन्मत्त होईल आणि ज्यांनी तुम्हाला इजिप्त देशाच्या गुलामगिरीतून काढून बाहेर आणले, त्या याहवेह तुमच्या परमेश्वराला तुम्ही विसरून जाल.


मग याहवेह मला म्हणाले, “ताबडतोब येथून उतरून खाली जा, कारण तुझे लोक, ज्यांना तू इजिप्त देशातून बाहेर काढून आणले, ते भ्रष्ट झाले आहेत. मी त्यांना जे करण्याची आज्ञा दिलेली होती, त्यापासून बहकून त्यांनी स्वतःसाठी ओतीव मूर्ती तयार केली आहे.”


याहवेह आमच्या परमेश्वरांनी आम्हाला व आमच्या पूर्वजांना इजिप्तमधून, त्या गुलामगिरीच्या देशातून बाहेर काढले आणि आमच्या डोळ्यांपुढे ते महान चमत्कार केले. आमच्या संपूर्ण प्रवासात आणि ज्या प्रदेशातून आम्ही प्रवास केला त्या सर्व प्रवासात आमचे संरक्षण केले.


त्यांच्या पूर्वजांच्या ज्या याहवेह परमेश्वराने त्यांना इजिप्तमधून बाहेर आणले होते, त्यांनी त्यांचा त्याग केला. त्यांच्या सभोवतालच्या लोकांच्या अन्य दैवतांचे अनुसरण केले आणि त्यांची उपासना केली. त्यांनी याहवेहचा क्रोध भडकाविला


त्यांनी एक संदेष्टा पाठवला, तो म्हणाला, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर म्हणतात, मी तुम्हाला इजिप्तमधून, गुलामगिरीच्या देशातून बाहेर काढले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan