Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 11:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 मग मोशे म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: ‘मध्यरात्रीच्या सुमारास मी इजिप्तमधून फिरेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 मग मोशे म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो की, आज मध्यरात्रीच्या सुमारास मी मिसर देशामधून फिरेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मोशे लोकांस म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, मध्यरात्री मी मिसरातून फिरेन

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 11:4
12 Iomraidhean Croise  

तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून सैन्य चालत येण्याचा आवाज येताच, त्वरित पुढे निघा, त्यावरून पलिष्टी सैन्याचा नाश करण्यासाठी याहवेह तुमच्यापुढे गेले आहेत असे समज.”


मध्यरात्री, एका क्षणात त्यांचा अंत होतो; लोक डळमळतात आणि नाहीसे होतात; मानवी मदतीशिवाय बलवान काढून टाकले जातात.


परमेश्वरा, तुम्हीच आम्हाला नाकारले आहे ना, आणि आता तुम्ही आमच्या सैन्याबरोबरही जात नाही?


जेव्हा परमेश्वराने इजिप्त देशाचा प्रतिकार केला, तेव्हा त्यांनी योसेफाला हे नियम नेमून दिले. मी एक अज्ञात वाणी ऐकली व ती म्हणाली:


“कारण त्याच रात्री मी संपूर्ण इजिप्त देशामधून संचार करेन व सर्व मनुष्यांचे व जनावरांचे प्रथमवत्स मारून टाकेन आणि त्यांच्या सर्व दैवतांवर न्याय आणेन; मी याहवेह आहे.


कारण याहवेह या देशात संचार करतील व इजिप्तवासियांचा संहार करतील. पण ज्या दरवाजाच्या बाजूंवर व कपाळपट्टीवर रक्त दिसेल, याहवेह त्या घराला ओलांडून पुढे जातील व विनाशकाला तुम्हाला मारण्यास तुमच्या घरात येऊ देणार नाहीत.


मध्यरात्रीत याहवेहने इजिप्त देशातील प्रथम जन्मलेले सर्व मारून टाकले. सिंहासनावर बसणार्‍या फारोहच्या प्रथम पुत्रापासून तुरुंगात असलेल्या कैद्याच्या प्रथम जन्मलेल्या पुत्रापर्यंत, जनावरांचे प्रथम जन्मलेले वत्स देखील मारून टाकले.


याहवेह एखाद्या लढवय्याप्रमाणे आघाडीवर निघतील, एखाद्या योद्ध्याप्रमाणे ते आपला आवेश चेतवतील; ते गर्जना करून युद्धाची नांदी देतील आणि त्यांच्या शत्रूंवर विजयी होतील.


“इजिप्तमध्ये पाठविल्या तशा पीडा मी तुमच्यामध्ये पाठविल्या. मी तुमच्या तरुणांना तुमच्या लुटलेल्या घोड्यांसहित तलवारीने मारून टाकले. तुमच्या छावणीतील दुर्गंध तुमच्या नाकात भरला, तरीही तुम्ही माझ्याकडे वळला नाही,” असे याहवेह जाहीर करतात.


प्रत्येक द्राक्षमळ्यामध्ये आक्रंदन होईल, कारण मी तुमच्यामधून जाईन,” असे याहवेह म्हणतात.


जे कुंपण तोडून मार्ग उघडणारे त्यांच्या पुढे जातील; ते द्वार तोडून त्यातून बाहेर जातील. त्यांचा राजा त्यांच्या पुढे जाईल, याहवेह त्यांचे पुढारी असतील.”


“मध्यरात्री, ‘वर येत आहे; त्याच्या स्वागतासाठी बाहेर यावे!’ अशी हाक त्यांच्या कानी आली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan