Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 11:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 मग याहवेह मोशेला म्हणाले, “मी फारोह व इजिप्तवर आणखी एक पीडा आणेन. त्यानंतर तो तुम्हाला या ठिकाणाहून जाऊ देईल आणि जेव्हा तो हे करेल तेव्हा तो तुम्हाला अक्षरशः देशातून घालवून देईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी फारोवर आणि मिसर देशावर आणखी एक पीडा आणीन, त्यानंतर तो तुम्हांला येथून जाऊ देईल; आणि तो जाऊ देताना तुम्हांला येथून कायमचे घालवून देईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “मी फारोवर व मिसरावर आणखी एक पीडा आणीन. त्यानंतर फारो तुम्हास येथून जाऊ देईल; तो तुम्हास जाऊ देईल तेव्हा तो तुम्हास सर्वस्वी ढकलून काढून लावील,

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 11:1
11 Iomraidhean Croise  

परंतु ज्या राष्ट्रात त्यांनी गुलाम म्हणून सेवा केली त्याला मी शिक्षा करेन. त्यानंतर तुझे वंशज त्या देशातून पुष्कळ धन घेऊन बाहेर पडतील.


तुम्ही माझ्याविरुद्ध नवीन साक्षीदार आणता, आणि आपला क्रोध माझ्याविरुद्ध वाढविता; तुमचे सामर्थ्य माझ्याविरुद्ध लाटांप्रमाणे एका पाठोपाठ येतात.


मध्यरात्रीत याहवेहने इजिप्त देशातील प्रथम जन्मलेले सर्व मारून टाकले. सिंहासनावर बसणार्‍या फारोहच्या प्रथम पुत्रापासून तुरुंगात असलेल्या कैद्याच्या प्रथम जन्मलेल्या पुत्रापर्यंत, जनावरांचे प्रथम जन्मलेले वत्स देखील मारून टाकले.


म्हणून मी आपला हात लांब करेन व माझ्या चमत्कारांनी इजिप्तवर प्रहार करेन. मग शेवटी तो तुम्हाला जाऊ देईल.


तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “आता मी फारोहला काय करतो, ते तू पाहशील: कारण माझ्या पराक्रमी हातामुळे तो लोकांना जाऊ देईल; कारण माझ्या बलवान हातामुळे तो त्यांना आपल्या देशाबाहेर घालवून देईल.”


नाहीतर यावेळी मी तुम्हा सर्वांवर म्हणजेच तू व तुझे अधिकारी व तुझे लोक या सर्वांवर भयानक पीडा पाठवेन, ज्यामुळे तुझी खात्री होईल की, सर्व पृथ्वीवर माझ्यासारखा इतर कोणी नाही.


“ ‘इतके झाल्यानंतरही तुम्ही माझ्याविरुद्ध वागाल व माझे ऐकले नाही, तर मी तुमच्या पापांच्या मानाने तुमच्यावर सातपट पीडा आणेन.


कोणत्या दैवताने एका राष्ट्रातून दुसर्‍या राष्ट्राला गुलामगिरीतून बाहेर काढण्याकरिता भयानक पीडा पाठविल्या, चिन्हे, चमत्कार केले, युद्ध व अद्भुत कृत्ये केली, जसे इजिप्त देशातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी याहवेह तुमच्या परमेश्वराने पराक्रमी बाहू आणि उगारलेल्या हाताने चमत्कार केले, असे एक तरी उदाहरण इतरत्र तुम्हाला सापडेल का?


माणसे तीव्र उष्णतेने करपून गेली, तेव्हा या पीडांवर ज्यांचे नियंत्रण आहे त्या परमेश्वराच्या नावाला शाप दिला, परंतु त्यांनी पश्चात्ताप केला नाही आणि परमेश्वराचे गौरव केले नाही.


पलिष्ट्यांनी विचारले, “जे दोषार्पण आम्ही त्यांच्याकडे पाठवावे ते काय असावे?” त्यांनी उत्तर दिले, “पलिष्टी अधिकार्‍यांच्या संख्येप्रमाणे पीडेच्या गाठींच्या पाच व उंदरांच्या पाच सोन्याच्या प्रतिमा; कारण तुम्हाला व तुमच्या अधिकार्‍यांना त्याच पीडांनी पीडले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan