Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 10:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तू जर त्यांना जाऊ दिले नाहीस, तर उद्या मी तुझ्या संपूर्ण देशावर टोळ आणेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तू माझ्या लोकांना जाऊ देण्याचे नाकारशील तर पाहा, मी उद्या तुझ्या देशात टोळ आणीन;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 जर तू माझ्या लोकांस जाऊ देण्याचे नाकारशील, तर उद्या मी तुझ्या देशावर टोळधाड आणीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 10:4
15 Iomraidhean Croise  

मग मोशे व अहरोन फारोहकडे गेले व त्याला म्हणाले, “इब्री लोकांचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात, ‘अजून किती काळ माझ्यासमोर नम्र होण्यास तू नाकारशील? माझ्या लोकांना जाऊ दे, म्हणजे ते माझी उपासना करतील.


ते तुझी भूमी आच्छादून टाकतील की, जमीन मुळीच दिसणार नाही, शेतात असलेल्या झाडांसह, गारांच्या व पावसाच्या मारातून जे पीक वाचले आहे त्याचा ते नाश करतील, एवढेच नव्हे तर वनात वाढणारी झाडेही ते खाऊन टाकतील.


आणि मी तुला सांगितल्याप्रमाणे, माझ्या पुत्राला माझी आराधना करण्यासाठी तू जाऊ द्यावेस. पण तू त्यांना पाठविण्यास नकार दिला; तर मी तुझा ज्येष्ठपुत्र मारून टाकीन.’ ”


नंतर मोशे व अहरोन फारोहकडे जाऊन त्याला म्हणाले, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘माझ्या लोकांना जाऊ दे, यासाठी की रानात जाऊन त्यांनी माझा उत्सव साजरा करावा.’ ”


फारोह मोशेला म्हणाला, “उद्या.” मोशेने उत्तर दिले, “तुझ्या सांगण्याप्रमाणे होईल, अशासाठी की तू जाणावे की याहवेह आमचे परमेश्वर यासारखे इतर कोणीही नाही.


माझे लोक व तुझे लोक यांच्यामध्ये मी फरक करेन. हे चिन्ह उद्याच घडेल.”


म्हणून उद्या याच वेळेला, इजिप्तची स्थापना झाली तेव्हापासून कधी झाला नाही अशा भयानक गारांचा वर्षाव मी करेन.


याहवेहने समय नेमून ठेवला व म्हणाले, “याहवेह हे उद्या देशभर घडवून आणतील.”


टोळांना त्यांचा राजा नसतो, तरी ते टोळीटोळीने एकत्र पुढे चाल करतात;


“मोठे टोळ व तरुण टोळ इतर टोळ व टोळांचे थवे, म्हणजेच माझे मोठे सैन्य जे मी तुमच्यामध्ये पाठवले होते; त्यांनी खाल्लेल्या तुमच्या वर्षांची मी भरपाई करेन.


तुम्ही पुष्कळ बी पेराल, पण थोडक्याच पिकांची कापणी कराल, कारण टोळ ते खाऊन टाकतील.


मग त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर उतरले. त्यांना पृथ्वीवर असणार्‍या विंचवाप्रमाणे सामर्थ्य देण्यात आले होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan