Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 1:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 या सुइणींनी परमेश्वराचे भय धरल्यामुळे परमेश्वराने त्यांची कुटुंबे स्थापित केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 त्या सुइणी देवाचे भय बाळगणार्‍या होत्या म्हणून त्याने त्यांची घराणी स्थापित केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 त्या सुइणी देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या म्हणून त्याने त्यांची घराणे वसवली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 1:21
14 Iomraidhean Croise  

मी तुला दिलेल्या आज्ञांनुसार जर तू करशील, माझा सेवक दावीदाने केले त्याप्रमाणे माझ्या आज्ञेत चालशील व माझे विधी व आज्ञा पाळून माझ्या दृष्टीत जे योग्य ते करशील, तर मी तुझ्याबरोबर राहीन. दावीदाचे जसे मी कायमचे राज्य स्थापले आहे, तसेच तुझी व तुझ्या राज्याची स्थापना मी करेन व इस्राएल तुझ्या हाती देईन.


तर आता, ज्यांनी मला माझे पिता दावीदाच्या राजासनावर स्थापित केले आहे आणि त्यांनी वचन दिल्याप्रमाणे माझे घराणे स्थापित केले आहे, ते याहवेह जिवंत आहेत; आज अदोनियाहला जिवे मारले जाईल!”


याहवेहचे स्तवन करा. याहवेहचे भय बाळगणारे, आणि त्यांच्या आज्ञापालनामध्ये आनंद मानणारे आशीर्वादित आहेत.


याहवेहने घर बांधले नाही, तर बांधकाम करणार्‍यांचे श्रम व्यर्थ आहेत; याहवेहने शहराचे रक्षण केले नाही, तर पहारेकर्‍यांचे जागणे व्यर्थ आहे.


मुले, ही याहवेहकडून मिळालेला वारसा आहे, प्रसवशील कूस, हे याहवेहकडून लाभणारे प्रतिफळ आहे.


याहवेहवर भरवसा ठेव आणि चांगले ते कर; की तू सुरक्षित कुरणाचा आनंद उपभोगून देशात वसती करू शकशील.


पण त्या सुइणी परमेश्वराचे भय धरणार्‍या होत्या, म्हणून त्यांनी इजिप्तच्या राजाने सांगितल्याप्रमाणे केले नाही; तर मुलांनाही जिवंत राहू दिले.


सुज्ञानाद्वारे घर बांधले जाते, आणि समंजसपणामुळे ते स्थिर राहते;


जर एखादा दुष्ट मनुष्य शंभर गुन्हे करतो तरी तो दीर्घायुष्य जगतो, तरी मला माहीत आहे की जे परमेश्वराचे भय बाळगतात व जे त्यांचा आदर करतात त्यांचे अधिक हित होईल.


“रेखाबी लोकांच्या घराण्याकडे जा आणि त्यांना याहवेहच्या मंदिरातील एखाद्या आतील खोलीत ने आणि द्राक्षारस प्यावयास दे.”


मी माझ्यासाठी एक विश्वासू याजक पुढे आणेन, जो माझ्या अंतःकरणात आणि माझ्या मनात जे आहे त्यानुसार करेल. मी त्याचे याजकीय घराणे स्थिर स्थापित करेन आणि ते निरंतर माझ्या अभिषिक्तासमोर सेवा करतील.


“तुमच्या दासीच्या उद्धटपणाची कृपा करून क्षमा कर. याहवेह तुमचा परमेश्वर खचितच माझ्या धन्याचे राजघराणे कायमचे स्थापित करेल, कारण आपण याहवेहच्या लढाया लढत आहात आणि तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुमच्या ठायी दुष्टता आढळणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan