Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 1:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 परंतु जेवढा त्यांच्यावर अत्याचार केला गेला, तेवढे ते जास्त बहुगुणित झाले आणि पसरले; म्हणून इजिप्तच्या लोकांना इस्राएली लोकांचे भय वाटू लागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 पण जितके अधिक त्यांनी त्यांना जाचले, तितके अधिक ते वाढून बहुगुणित झाले व त्यांचा चोहोकडे विस्तार झाला. त्यांना इस्राएलवंशजांचा तिटकारा वाटू लागला;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 पण मिसऱ्यांनी त्यांना जसजसे जाचले तसतसे ते संख्येने अधिकच वाढत गेले व अधिकच पसरले, म्हणून इस्राएल लोकांची त्यांना भीती वाटू लागली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 1:12
17 Iomraidhean Croise  

परमेश्वराने म्हटले, “मी परमेश्वर, मी तुझ्या पित्याचा परमेश्वर आहे; खाली इजिप्त देशात जाण्यास भिऊ नको, कारण तिथे मी तुझे एक मोठे राष्ट्र करेन.


तुम्ही त्यांचे वंशज ताऱ्यागत बहुगुणित केले आणि त्यांच्या पूर्वजांना जा व काबीज करा असे वचन दिलेल्या देशात तुम्ही त्यांना आणले.


क्रोध मूर्खाचा घात करतो, आणि सामान्य मनुष्याचा मत्सराने घात होतो.


याहवेहने इस्राएली लोकांना अत्यंत समृद्ध केले; त्यांच्या शत्रूपेक्षाही त्यांची लोकसंख्या अधिक झाली,


त्यांनी त्यांना मोठा आशीर्वाद दिला, त्यांची संख्या अनेक पटीने वाढली, तिथे त्यांच्या गुरांचीही हानी होऊ दिली नाही.


म्हणून परमेश्वराने त्या सुइणींना आशीर्वाद दिला आणि इस्राएली लोक बहुगुणित झाले व संख्येने फार अधिक झाले.


परंतु इस्राएली लोक अत्यंत फलद्रूप झाले; ते बहुगुणित होऊन त्यांना पुष्कळ संतती झाली आणि त्यांची संख्या वाढून, लवकरच ते इतके असंख्य झाले की संपूर्ण देश त्यांनी व्यापून टाकला.


त्याने आपल्या लोकांना सांगितले, “पाहा, इस्राएली लोक संख्येने आपल्यापेक्षा जास्त आहेत.


मनुष्याचे कोणतेही सुज्ञान, बुद्धिमत्ता, कोणत्याही योजना याहवेहविरुद्ध यशस्वी होऊ शकत नाहीत.


क्रोध क्रूर असतो आणि राग पूरासमान असतो; पण मत्सरापुढे कोण उभा राहू शकेल?


इस्राएली लोक पुष्कळ आहेत हे पाहून मोआब फार घाबरला. इस्राएलमुळे मोआब हादरून गेला.


यास्तव परूशी एकमेकांना म्हणू लागले, “आपण काहीच साध्य केले नाही. पाहा, सारे जग कसे त्याच्यामागे जात आहे!”


आणि आपल्याला माहीत आहे की, परमेश्वरावर प्रीती करणारे आणि जे त्याच्या संकल्पनेप्रमाणे बोलावलेले आहेत, त्यांच्या कल्याणार्थ सर्वगोष्टी सहकारी ठरतात.


नंतर तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर म्हणावेः “आमचे पूर्वज अरामी, हे निर्वासित होऊन आश्रयासाठी इजिप्त देशास गेले. ते संख्येने अगदी थोडे होते, पण इजिप्त देशात ते एक विशाल, बलाढ्य आणि थोर राष्ट्र बनले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan