Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 8:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 आता पुन्हा एकदा एस्तेर राजाच्या पायांवर पडून व अश्रू ढाळून तिने राजाजवळ विनवणी केली. यहूद्यांच्या विरुद्ध अगागी हामानाने केलेली दुष्ट योजना स्थगित करावी, अशी तिची मागणी होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मग एस्तेरने पुन्हा राजाचे आर्जव केले; ती त्याच्या पाया पडली आणि रडून त्याची मोठी काकळूत करून तिने म्हटले, “यहूद्यांचा नायनाट करण्याविषयी हामान अगागी ह्याने केलेली अनर्थावह योजना रद्द करण्यात यावी.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 एस्तेर मग राजाशी पुन्हा बोलली. ती त्याच्या पाया पडून रडू लागली. अगागी हामानाने यहूद्यांचा नायनाट करण्याची आखलेली दुष्ट योजना राजाने रद्द करावी म्हणून त्यास विनंती करु लागली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 8:3
10 Iomraidhean Croise  

जेव्हा ती परमेश्वराच्या मनुष्याच्या डोंगरावर पोहोचली, तेव्हा तिने त्याचे पाय धरले. जेव्हा गेहजी तिला दूर लोटू लागला, पण परमेश्वराच्या मनुष्याने म्हटले, “तिला सोड! ती फार दुःखात आहे, पण याहवेहने त्याचे कारण मला कळविले नाही आणि ते माझ्यापासून गुप्त ठेवले.”


त्यानंतर अहश्वेरोश राजाने अगागी हम्मदाथाचा पुत्र हामानाचा बहुमान करून त्याची इतर प्रतिष्ठितांपेक्षा सर्वश्रेष्ठ म्हणून नेमणूक केली.


कारण मी व माझे लोक, आमचा नाश, कत्तल व नामशेष करणार्‍यांना विकले गेलो आहोत. स्त्री व पुरुषांची केवळ गुलाम म्हणून विक्री झाली असती, तर कदाचित मी गप्प राहिले असते. त्यामुळे राजास कष्ट देण्याची गरज पडली नसती.”


तेव्हा राजाने हामानापासून परत घेतलेली आपली मुद्रा मर्दखयाला दिली. व एस्तेरने त्याला हामानाच्या मालमत्तेचा कारभारी नेमले.


राजाने पुन्हा आपली सोनेरी राजदंड एस्तेरपुढे धरला, तेव्हा ती उठली आणि त्याच्यासमोर उभी राहिली.


हे ऐकताच हिज्कीयाहने आपले तोंड भिंतीकडे वळविले आणि याहवेहकडे प्रार्थना केली,


तो स्वर्गदूताशी झगडला आणि त्याच्यावर विजयी झाला; तो रडला आणि त्याची मेहेरबानी व्हावी म्हणून त्याने भीक मागितली. बेथेलला ते त्याला भेटले आणि तिथे तो त्यांच्याशी बोलला—


येशू त्या दिवसात पृथ्वीवर देहामध्ये असताना, स्वतःला मृत्यूपासून वाचविण्यास जे समर्थ आहेत, त्यांच्याजवळ त्यांनी अश्रू गाळीत आणि आत्म्यात मोठ्या आक्रोशाने विनवणी करीत प्रार्थना केली आणि त्यांची प्रार्थना त्याच्या आदरयुक्त अधीनतेमुळे ऐकण्यात आली.


ती त्याच्या पायावर पडली आणि म्हणाली, “माझ्या धन्या, आपल्या सेवकाच्या अपराधांची क्षमा करा, आणि मला तुमच्याशी बोलू द्या; तुमच्या दासीचे बोलणे ऐकून घ्या.


Lean sinn:

Sanasan


Sanasan