एस्तेर 7:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तेव्हा एस्तेर राणीने उत्तर दिले, “महाराज, जर मी तुमची कृपा संपादन केली असेन, आणि महाराजांच्या मर्जीला येत असेन, तर माझे प्राण वाचवा—हीच माझी विनंती आहे, आणि माझ्या लोकांचे—ही माझी मागणी आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मग एस्तेर राणी म्हणाली, “महाराज, माझ्यावर आपली कृपादृष्टी झाली असून आपल्या मर्जीस आल्यास मला व माझ्या लोकांना प्राणदान द्यावे हाच माझा अर्ज व विनंती आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तेव्हा एस्तेर राणी म्हणाली, “राजा, माझ्यावर आपली कृपादृष्टी झाली असून आपली मर्जी असेल तर मला व माझ्या लोकांसही जिवदान द्यावे. एवढेच माझे मागणे आहे. Faic an caibideil |
मर्दखयाने त्याला शूशनमध्ये जाहीर करण्यात आलेली, सर्व यहूद्यांचा नायनाट करण्याच्या राजाज्ञेची एक प्रतही दिली आणि ती प्रत एस्तेरला दाखवून त्यासंबंधी सर्वकाही सविस्तर कळविण्यासही सांगितले. तसेच एस्तेरला तिने राजाकडे जावे आणि तिच्या लोकांसाठी तिने राजाजवळ दयेसाठी रदबदली करावी आणि त्याला विनवणी करावी, अशा सूचनेचा निरोपही त्याने त्याच्याजवळ दिला.