एस्तेर 4:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 साम्राज्यातील सर्व प्रांतांत जिथेही राजाज्ञा जाहीर झाली, तेथील यहूदी लोक उपवास व अत्यंत विलाप करीत, रडून आक्रोश करू लागले. अनेकजण गोणपाट नेसून राखेत पडून राहिले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 राजाचा हुकूम व फर्मान ज्या ज्या प्रांतात जाऊन पोहचले तेथे तेथे यहूदी लोकांत मोठा विलाप, उपोषण व रडारड चालू झाली; बहुतेक लोक गोणपाट नेसून राखेत पडून राहिले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 राजाचा हुकूम ज्या ज्या प्रांतात पोचला तेथे तेथे यहूद्यांमध्ये शोककळा पसरली आणि ते आक्रोश करु लागले. उपवास करून आणि मोठयाने ते आकांत करु लागले. डोक्यात राख घालून आणि गोणताटाची वस्त्रे घालून बहुतेक यहूदी राखेत पडून राहिले. Faic an caibideil |
नंतर पहिल्या महिन्याच्या तेराव्या दिवशी राजाच्या चिटणीसांना हजर राहण्याचा हुकूम करण्यात आला. त्यांनी साम्राज्यातील प्रत्येक प्रांतात व सर्व भाषेतून निरनिराळ्या राज्यपालांना आणि अधिकार्यांना हामानाच्या राजाज्ञेचा मजकूर लिहून घेतला. जी पत्रे लिहिलेली होती त्यांच्यावर अहश्वेरोश राजाच्या नावाने राजमुद्रेची मोहर लावण्यात आली.