एस्तेर 1:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 भारतापासून कूशपर्यंत पसरलेल्या व एकशे सत्तावीस प्रांत असलेल्या या विस्तृत साम्राज्याचा बादशहा राजा अहश्वेरोश च्या कारकिर्दीत हे घडले: Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीत पुढील वृत्त घडले; त्याचे साम्राज्य हिंदुस्तानापासून कूशापर्यंत होते; ज्याचा अंमल एकशे सत्तावीस प्रांतांवर होता तोच हा अहश्वेरोश. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीत (अहश्वेरोश राजा भारत देशापासून कूश देशापर्यंतच्या एकशे सत्तावीस प्रांतांवर राज्य करत होता), Faic an caibideil |
तेव्हा ताबडतोब राजाच्या चिटणीसांना बोलाविण्यात आले—तो तिसऱ्या, म्हणजे सिवान महिन्याचा, तेविसावा दिवस होता. त्यांनी मर्दखयाने भारतापासून कूशपर्यंतच्या 127 प्रांतातील यहूद्यांना, प्रांतप्रमुखांना, राज्यपालांना, व प्रतिष्ठितांना पाठविण्यासाठी फर्मान लिहून घेतले. राज्यातील विविध लोकांच्या विविध भाषांमधून व लिप्यांमधून, तसेच यहूद्यास त्यांच्या भाषेत व लिपीत ते फर्मान लिहिण्यात आले. मर्दखयाने अहश्वेरोश राजाच्या नावाने पत्र लिहून, ते बंद करून त्यावर राजाच्या मुद्रेची मोहोर लावली. मग ती पत्रे राजाच्या निरोपासाठी वापरले जाणारे खास वाढविलेले वेगवान घोडे, यांच्या स्वारांबरोबर पाठविली.