Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इफिसकरांस 5:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 प्रभू कशाने प्रसन्न होतात याचा शोध घ्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 प्रभूला काय संतोषकारक2 आहे हे पारखून घेत जा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 प्रभूला कशाने संतोष होईल हे पारखून घ्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 प्रभू कशामूळे संतुष्ट होतो, हे समजून घ्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इफिसकरांस 5:10
16 Iomraidhean Croise  

याहवेह, माझे खडक आणि माझे तारणहार, माझ्या मुखातून निघालेले शब्द आणि माझ्या अंतःकरणातील मनन तुमच्या नजरेत संतोष देणारे होवोत.


अर्पणापेक्षा मनुष्याच्या न्याय्य व रास्त वागण्याने याहवेहला अधिक संतोष होतो.


असा उपास मी निवडला आहे काय, लोकांनी नम्र होण्याचा एक दिवस? केवळ वार्‍याने लवणार्‍या लव्हाळ्याप्रमाणे वाकण्याकरिता, आणि गोणपाट नेसून राख फासण्याकरिता? यालाच तुम्ही उपास म्हणता का, याहवेहला असा दिवस मान्य असेल काय?


शबाहून आणलेल्या सुगंधी धूपाचा मला काय उपयोग किंवा दूरदेशातील मोलाच्या द्रव्याचा काय उपयोग? तुमची होमार्पणे मला संतुष्ट करीत नाही; तुमचे यज्ञबली मला प्रसन्न करीत नाहीत.”


कारण जो अशाप्रकारे ख्रिस्ताची सेवा करतो तो परमेश्वराला संतोष देणारा व मनुष्यांनी पारखलेला आहे.


कारण जे उत्तम आहे ते तुम्हाला ओळखता यावे व ख्रिस्ताच्या दिवसासाठी तुम्ही शुद्ध व निर्दोष असावे,


मजजवळ सर्वकाही आहे आणि ते भरपूर प्रमाणात आहे! एपफ्रदीत आला, तेव्हा त्याच्याबरोबर पाठविलेल्या देणग्यांमुळे मी अगदी भरून गेलो आहे. त्या देणग्या म्हणजे परमेश्वराला मान्य, संतोष देणारा सुगंधी यज्ञच आहेत.


त्यामुळे प्रभूला आवडेल असे योग्य जीवन तुम्ही जगावे व प्रत्येक बाबतीत त्यांना प्रसन्न करावे. चांगल्या कृत्यांद्वारे फळ देणारे, परमेश्वराच्या ज्ञानात वाढणारे,


परंतु त्या सर्वांची परीक्षा करा; जे चांगले आहे ते धरून ठेवा,


असे करणे चांगले आहे आणि यामुळे परमेश्वर आपल्या तारणार्‍याला संतोष होतो.


परंतु विधवेला मुले अथवा नातवंडे असतील, तर त्यांनी प्रथम आपल्या कुटुंबीयांशी सुभक्तीने वागून व आपल्या पितरांचे उपकार फेडण्यास शिकावे, यामुळे परमेश्वराला अतिशय संतोष होतो.


आपल्याला असे अविचल राज्य प्राप्त होणार आहे, तेव्हा कृतज्ञ अंतःकरणांनी आणि आदरयुक्त भय बाळगून आपण परमेश्वराची उपासना करू या.


परंतु चूक केल्याबद्दल मिळालेली शिक्षा तुम्ही सहन केली तर त्यात काय मोठेपणा आहे? परंतु जर चांगले केल्याबद्दल तुम्ही दुःख भोगले आणि ते सहन केले तर हे परमेश्वराच्या दृष्टीने प्रशंसनीय आहे.


तुम्ही सुद्धा, जिवंत दगडांसारखे आत्मिक मंदिर म्हणून बांधले जात आहात, यासाठी की येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराने स्वीकारण्यास योग्य असे आत्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे.


दावीदाने त्याच्या चिलखतावर तलवार बांधली, त्याला याचा आधी सराव नसल्यामुळे, त्याने चालण्याचा प्रयत्न केला. तो शौलाला म्हणाला, “मी यामध्ये चालू शकत नाही, मला याचा सराव नाही.” म्हणून दावीदाने तो पोशाख उतरविला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan