Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इफिसकरांस 4:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 त्यांच्यापासून संपूर्ण शरीर प्रत्येक सांध्याशी एकत्र जोडून धरले जाते, प्रत्येक अवयव आपले कार्य करतो व प्रीतीमध्ये शरीराची वाढ व बांधणी होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 त्याच्यापासून पुरवठा करणार्‍या प्रत्येक सांध्याच्या योगे, सबंध शरीराची जुळवणूक व जमवाजमव होत असते, आणि प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाने कार्य करत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धी करून घेते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 ज्यापासून विश्वास ठेवणाऱ्यांचे सर्व शरीर जुळवलेले असते आणि ते प्रत्येक सांध्याने एकत्र बांधलेले असते आणि प्रत्येक भाग त्याने जसे कार्य करायला पाहिजे तसे करतो, आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीराच्या प्रत्येक भागाची वाढ होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 ख्रिस्ताच्या नियंत्रणाखाली सबंध शरीराची जुळवणूक व जमवाजमव शरीराच्या प्रत्येक सांध्यायोगे होत असते आणि प्रत्येक अंग आपापल्या स्वभावानुसार कार्य करीत असता संपूर्ण शरीर प्रीतीमध्ये वाढत राहते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इफिसकरांस 4:16
28 Iomraidhean Croise  

“मी द्राक्षवेल आहे; तुम्ही फांद्या आहात. जर तुम्ही मजमध्ये राहाल व मी तुम्हामध्ये, तर तुम्ही मुबलक फळ द्याल; कारण माझ्यापासून वेगळे राहून तुम्हालाही काही करता येणार नाही.


आपल्या प्रत्येकाला एक शरीर असून अनेक अवयव आहेत, आणि हे सर्व अवयव एकच कार्य करीत नाहीत.


कारण भाकर एक आहे, आम्ही पुष्कळजण असलो तरी एक शरीर आहोत, आपण सर्वजण एकाच भाकरीचे सहभागी आहोत.


विश्वास, आशा, प्रीती या तीन गोष्टी टिकून राहतात; परंतु त्यामध्ये प्रीती सर्वश्रेष्ठ आहे.


मूर्तींना अर्पण केलेले अन्न: आपल्याला माहीत आहे “आपल्या सर्वांना ज्ञान आहे.” ज्ञान फुगविते, परंतु प्रीती वृद्धी करते.


परंतु आत्म्याचे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वासूपणा,


ख्रिस्त येशूंमध्ये सुंता होणे किंवा न होणे याला काही महत्त्व नाही; फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे विश्वास प्रीतीद्वारे प्रकट व्हावा.


आम्ही त्यांच्या दृष्टीने पवित्र आणि निष्कलंक असावे म्हणून त्यांनी जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्तामध्ये प्रीतीमुळेच निवडले.


ज्यामुळे ख्रिस्त विश्वासाद्वारे तुमच्या हृदयात राहतील व तुम्ही प्रीतीमध्ये खोल मुळावलेले व स्थिर व्हावे अशी मी प्रार्थना करतो,


परमेश्वराच्या कृपेच्या वरदानाने व सामर्थ्याच्या कृतीने मी या शुभवार्तेचा सेवक झालो आहे.


हे यासाठी की त्यांच्या लोकांना सेवेच्या कार्यात सिद्ध करून ख्रिस्ताचे शरीर सुसज्ज व्हावे.


त्याऐवजी प्रीतीमध्ये सत्य बोलत असताना, आपण प्रत्येक गोष्टींमध्ये ख्रिस्त ज्यांचे मस्तक आहेत, त्यांचे परिपक्व शरीर होण्यासाठी वाढत जावे.


आणि ही माझी प्रार्थना आहे: तुमची प्रीती ही ज्ञानाने व विवेकाच्या खोलीने अधिकाधिक वाढावी.


त्या लोकांचा त्यांच्या मस्तकाशी संबंध तुटला आहे, ज्या मस्तकाला संपूर्ण शरीर बळकटपणे एकत्रित जोडले जाते, सांधे व बंधने त्यांच्यापासून पुरवठा पावते व त्याची परमेश्वरामध्ये वाढ होते.


माझा उद्देश हाच आहे की त्यांच्या अंतःकरणास उत्तेजन मिळून ते प्रेमाने बांधले जावे, आणि त्यांना विपुलतेने पूर्ण ज्ञान प्राप्त व्हावे, यासाठी की परमेश्वराची गुप्त योजना ख्रिस्त हे त्यांना समजावे,


आपले पिता परमेश्वरापुढे तुमचे विश्वासाचे कार्य व प्रीतीने केलेले श्रम आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरील आशेचा धीर यांची आम्ही निरंतर आठवण करतो.


परमेश्वराचे आम्ही निरंतर आभार मानतो, कारण जेव्हा तुम्ही आमच्याकडून परमेश्वराचे वचन ऐकले, तेव्हा तुम्ही ते मानवाचे म्हणून नाही, परंतु परमेश्वराचे सत्यवचन म्हणून स्वीकारले, जे वास्तविकतेचे आहे आणि तेच तुमच्यामध्ये कार्य करीत आहे.


प्रभू असे करो की जशी आम्ही तुमच्यावर करतो तशी तुमची प्रीती वाढावी आणि एकमेकांसाठी ओसंडून वाहावी.


बंधू आणि भगिनींनो, आम्ही सतत तुमच्यासाठी परमेश्वराचे आभार मानतो आणि तसे करणे योग्य आहे, कारण तुमचा विश्वास अधिकाधिक वाढत आहे आणि तुम्हा सर्वांचे जे एकमेकांवरील प्रेम आहे ते देखील वाढत आहे.


आज्ञेचा उद्देश हा आहे की, शुद्ध अंतःकरणातून, चांगल्या विवेकभावातून आणि निष्कपट विश्वासातून येणारी प्रीती तुम्हामध्ये असावी.


आता सत्याचे आज्ञापालन करून तुम्ही स्वतःला शुद्ध केले आहे यासाठी की, तुमची एकमेकांवर खरी प्रीती असावी आणि एकमेकांवर खोल अंतःकरणापासून प्रीती करावी.


परमेश्वराची प्रीती आपल्यावर आहे, ती आपण ओळखतो आणि तिच्यावर अवलंबून राहतो. परमेश्वर प्रीती आहेत. जे प्रीतीत राहतात ते परमेश्वरामध्ये राहतात आणि परमेश्वर त्यांच्यामध्ये राहतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan