Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इफिसकरांस 3:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 यासाठी की आता मंडळीद्वारे, आकाशमंडळातील शासक आणि अधिकार्‍यांना परमेश्वराचे विविध ज्ञान कळावे हाच त्यांचा उद्देश होता,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10-11 ह्यासाठी की, जो युगादिकालाचा संकल्प त्याने ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये सिद्धीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती व अधिकारी ह्यांना मंडळीच्या द्वारे आता कळावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 यासाठी की आता मंडळीद्वारे सत्ताधीश आणि आकाशातील शक्ती यांना देवाचे पुष्कळ प्रकारचे असलेले ज्ञान कळावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10-11 ह्यासाठी की, जो युगादिकालचा संकल्प त्याने आपल्या ख्रिस्त येशूमध्ये सिद्धीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे बहुरूपी ज्ञान अंतराळातील अधिपती व अधिकारी ह्यांना ख्रिस्तमंडळीद्वारे आता कळावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इफिसकरांस 3:10
23 Iomraidhean Croise  

अहो प्रतापशाली स्वर्गदूतांनो, त्यांची आज्ञा अंमलात आणणारे, व त्यांच्या वचनाचे पालन करणारे, याहवेहचे स्तवन करा.


हे याहवेह! तुमचे कार्य किती विविध आहे: अद्भुत ज्ञानाने तुम्ही सर्व घडविले आहे; तुमच्या रचनेने संपूर्ण पृथ्वी संपन्न झाली आहे.


मग आत्म्याने मला वर उचलले आणि माझ्या पाठीमागून मोठ्या गर्जनेचा मी आवाज ऐकला, जेव्हा धन्य याहवेहचे वैभव आपल्या स्थानातून उठले.


अहाहा, परमेश्वराचे गहन ज्ञान आणि बुद्धीची संपत्ती किती अगम्य आहे! त्यांचे न्याय गहन आहेत, त्यांचे मार्ग किती दुर्गम आहेत!


कारण माझी खात्री आहे की ना मरण ना जीवन, ना देवदूत ना भुते, ना वर्तमान ना भविष्यकाळ, ना कोणती शक्ती,


परंतु परमेश्वराने ज्यांना बोलाविले आहे, त्या यहूदी आणि ग्रीक, या दोघांनाही ख्रिस्त हे परमेश्वराचे सामर्थ्य आणि ज्ञान आहे.


आम्ही परमेश्वराचे ज्ञान आणि रहस्य जे गुप्त होते, ते जाहीर करतो आणि ते रहस्य परमेश्वराने युगानुयुगा पूर्वी आपल्या गौरवासाठी सिद्ध केले आहे.


जे स्थान सर्व शासन आणि अधिकार, सामर्थ्य आणि प्रभुत्व व सध्याच्या युगात व येणार्‍या युगातील कोणत्याही नावांपेक्षाही सर्वोच्च आहे,


मंडळी जे त्यांचे शरीर, तिला त्यांच्या परिपूर्णतेने सर्वकाही सर्वप्रकारे पुरवितात.


परमेश्वर आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पिता यांची स्तुती असो, ज्यांनी आपल्याला स्वर्गामधील सर्व आत्मिक आशीर्वादाने ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे.


आपल्यावर कृपेची वृष्टी केली आहे. सर्व ज्ञान व बुद्धीने,


कारण आपले युद्ध मांस आणि रक्त यांच्याविरुद्ध नाही, तर सत्ताधारी, अधिपतींविरुद्ध, अंधकाराच्या शक्तीविरुद्ध, आणि आकाशमंडळातील दुष्ट आत्मे यांच्याविरुद्ध आहे.


त्यांच्यामध्ये सर्वगोष्टी निर्माण झाल्या: स्वर्गातील गोष्टी आणि पृथ्वीवरील, दृश्य आणि अदृश्य, मग ती सिंहासने किंवा अधिपत्य किंवा शासक किंवा अधिकारी असोत, प्रत्येक गोष्ट त्यांच्याद्वारे व त्यांच्यासाठी निर्माण करण्यात आली आहे.


आणि ख्रिस्तामध्ये तुम्ही परिपूर्ण केलेले आहात. ते सर्व सामर्थ्य आणि अधिकार यांचे मस्तक आहेत.


आणि सत्तांना आणि अधिकारांना हाणून पाडले व त्यांचे उघड प्रदर्शन करून क्रूसाद्वारे त्यांच्यावर विजय संपादन केला.


सुभक्तीचे रहस्य निर्विवाद गंभीर आहे: परमेश्वर मानव शरीरात प्रकट झाले, आत्म्यात नीतिमान ठरले; देवदूतांच्या पाहण्यात आले, राष्ट्रांमध्ये गाजविले गेले, जगात त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात आला आणि गौरवात पुन्हा वर घेतले गेले.


ते त्यांना यासाठी प्रकट केले होते की, ते स्वतःची सेवा नव्हे तर तुमची करीत होते. ते ज्या गोष्टींविषयी बोलले होते, त्या गोष्टी तुम्हाला स्वर्गातून पाठविलेल्या पवित्र आत्म्याद्वारे, ज्यांनी शुभवार्तेची घोषणा केली त्यांच्याद्वारे तुम्हाला आता सांगितल्या आहेत. स्वर्गदूतांना सुद्धा या गोष्टी जाणून घेण्याची इच्छा होती.


ते येशू आता स्वर्गात गेले आहेत आणि परमेश्वराच्या उजवीकडे असून सर्व स्वर्गदूत, अधिकार आणि सत्ता त्यांच्या अधीन आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan