Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इफिसकरांस 1:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 त्यांच्या प्रिय पुत्राद्वारे आपल्याला मुक्तपणे दिलेल्या गौरवयुक्त कृपेची स्तुती व्हावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 त्याने हे सर्व देवाच्या गौरवी कृपेची स्तुती व्हावी म्हणून केले. ही कृपा त्याने त्याच्या प्रिय पुत्राद्वारे आम्हास भरपूर केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 त्याच्या ह्या वैभवशाली कृपेबद्दल आपण त्याची स्तुती करू या. त्याच्या प्रिय पुत्रामध्ये त्याने आपल्याला हे अनमोल वरदान दिले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इफिसकरांस 1:6
41 Iomraidhean Croise  

तलवारीपासून मला सोडवा, कुत्र्यांच्या आक्रमणापासून माझे मोलवान प्राण वाचवा.


आम्हाला वाचवा आणि तुमच्या उजव्या हाताने मदत करा म्हणजे तुम्ही ज्यांच्यावर प्रीती करता त्यांचे तारण होईल.


याहवेह सर्व कार्ये योग्य रीतीने सिद्धीस नेतात. दुष्टांच्या विनाशासाठी देखील त्यांनी एक दिवस नेमला आहे.


“पाहा, हा माझा सेवक! याला माझे पाठबळ आहे! माझा निवडलेला, ज्याच्याविषयी मी संतुष्ट आहे; माझा आत्मा मी त्याच्या ठायी ठेवेन. राष्ट्रांना तो न्याय आणेल.


ज्या लोकांना मी माझ्यासाठी निर्माण केले ते माझ्या प्रशंसेची घोषणा करतील.


जशी माती अंकुराला उगविते आणि बाग बीज वाढविते तसे सार्वभौम याहवेह नीतिमत्व आणि प्रशंसा सर्व राष्ट्रासमोर अंकुरित करतील.


सीयोनातील जे सर्व शोक करतात त्यांना— राखेऐवजी सौंदर्याचा मुकुट, विलापाऐवजी आनंदाचे तेल, निराशेच्या आत्म्याऐवजी स्तुतीचे वस्त्र बहाल करण्यासाठी. कारण त्यांचे गौरव प्रकट करण्यासाठी ते नीतिमत्तेचे एला वृक्ष याहवेहने स्वतः रोपलेले असे संबोधले जातील.


तेव्हा यहूदीयाचे रक्षण होईल आणि इस्राएल सुरक्षिततेने जगेल. याहवेह आमचे नीतिमान तारणकर्ता या नावाने त्यांना संबोधित करण्यात येईल.


मग पृथ्वीवरील जी सर्व राष्ट्रे मी त्यांच्यासाठी केलल्या सर्व चांगल्या गोष्टी ऐकतील, त्यांच्यापुढे हे नगर मला बहुमानास्पद, आनंददायक, प्रशंसा व आदर देणारे होईल; माझ्या लोकांना मी प्रदान केलेली विपुल समृद्धी व शांती पाहून, त्या राष्ट्रांना दरारा व आदरयुक्त भीती वाटेल.’


याजकाने त्यातील एका पक्ष्याचे पापार्पण व दुसर्‍याचे होमार्पण करावे. अशाप्रकारे याजकाने त्याच्या स्त्रावासाठी याहवेहसमोर प्रायश्चित करावे.


“अगे तलवारी, माझ्या मेंढपाळाविरुद्ध जागी हो, माझ्या घनिष्ठ सोबत्याविरुद्ध ऊठ!” सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, “मेंढपाळावर प्रहार कर, म्हणजे मेंढरांची पांगापांग होईल, आणि मी माझा हात कोकरांविरुद्ध उगारेन.”


पण तो हे बोलत असतानाच, तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून वाणी ऐकू आली, “हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. याचे तुम्ही ऐका!”


“तेव्हा संध्याकाळी पाच वाजता आलेल्या मजुरांना एक दिनार मजुरी मिळाली.


आणि स्वर्गातून वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र; त्याच्यावर मी संतुष्ट आहे.”


“सर्वोच्च स्वर्गामध्ये परमेश्वराला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्यांची कृपादृष्टी झाली आहे, त्यांना शांती असो.”


पिता मजवर प्रीती करतात, याचे कारण हे आहे की, मी आपला जीव देतो, तो केवळ परत घेण्याकरिता देतो;


पिता पुत्रावर प्रीती करतात आणि त्याने प्रत्येक गोष्ट त्यांच्या हाती सोपविली आहे.


यास्तव, जे आता ख्रिस्त येशूंमध्ये आहेत त्यांना दंडाज्ञा नाही.


हे सर्व तुमच्या भल्यासाठी आहे, जितके अधिक लोक त्यांच्या कृपेने त्यांच्याजवळ येतील, तितके त्यांच्या अपार दयेबद्दल त्यांचे आभार मानतील आणि परमेश्वराचे अधिक गौरव होईल.


ज्यांच्या ठायी पाप नव्हते, त्यांना आपल्यासाठी पाप असे केले, म्हणजे त्यांच्याशी आपण संयुक्त होऊन, परमेश्वराचे नीतिमत्व व्हावे.


यात उद्देश असा होता की, आपण ज्यांनी ख्रिस्तावर प्रथम आशा ठेवली होती, त्यांनी त्यांच्या गौरवाच्या स्तुतीचे साधन व्हावे.


आणि हा आत्मा परमेश्वराच्या लोकांसाठी खंडणी व आपल्याला वतनाचा विसार म्हणून त्यांच्या गौरवाच्या स्तुतीसाठी दिला आहे.


मी प्रार्थना करतो की तुमच्या अंतःकरणाचे डोळे प्रकाशित केले जावेत, आणि पवित्र जनांमध्ये असलेल्या गौरवशाली वतनाच्या संपत्तीच्या आशेसाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे, हे तुम्ही ओळखून घ्यावे.


यासाठी की ख्रिस्त येशूंमध्ये त्यांची आपल्यावरील दया व येणार्‍या युगांमध्ये त्यांची कृपा किती अतुलनीय आहे हे आपणास दाखवावे.


येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त होणार्‍या नीतिमत्वाच्या फळांनी भरले जावे व त्याद्वारे परमेश्वराची स्तुती आणि गौरव व्हावे.


आणि मी त्यांच्यामध्ये सापडावे आणि नियमांद्वारे प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे, परंतु ख्रिस्तामधील विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व परमेश्वरावरील विश्वासाने प्राप्त होते.


त्यामुळे परमेश्वर स्वतः ख्रिस्त येशूंमध्ये तुमच्या सर्व गरजा आपल्या गौरवी संपत्तीतून पुरवतील.


कारण अंधकाराच्या सत्तेतून सोडवून त्यांनी आपल्याला त्यांच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणले आहे,


तुम्ही सुद्धा, जिवंत दगडांसारखे आत्मिक मंदिर म्हणून बांधले जात आहात, यासाठी की येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराने स्वीकारण्यास योग्य असे आत्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे.


परंतु तुम्ही निवडलेले लोक, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, परमेश्वराचे विशेष धन आहात, यासाठी की ज्यांनी तुम्हाला अंधारातून काढून त्यांच्या अद्भुत प्रकाशात आणले त्यांच्या स्तुतीची घोषणा करावी.


जर कोणी संदेश देतो तर त्याने असा संदेश द्यावा की, तो परमेश्वराचेच शब्द बोलत आहे. जर कोणी सेवा करतात, तर परमेश्वर जशी शक्ती पुरवितात त्याप्रमाणे करावी, म्हणजे सर्व गोष्टीमध्ये येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराचे गौरव होईल. त्यांना गौरव आणि सामर्थ्य सदासर्वकाळ असो. आमेन!


Lean sinn:

Sanasan


Sanasan